13 ते 15 ऑगस्ट 2022 या तीन दिवसात ध्वजारोहण करताना नागरिकांनी काय करावे व काय करू नये.

 13 ते 15 ऑगस्ट 2022 या तीन दिवसात ध्वजारोहण करताना नागरिकांनी काय करावे व काय करू नये.


सुजाण नागरिकांनी काय करावे....? 


1) राष्ट्रीय ध्वज सन्मानपूर्वक फडकविला जाईल याची दक्षता घ्यावी.

2) राष्ट्रीय ध्वज हाताने कात्रीला हाताने बनवलेला किंवा मशीन द्वारे तयार केलेल्या सूत पॉलिस्टर लोकर अथवा सिल्क व खादी कपड्यापासून तयार केलेला असावा.

3) राष्ट्रीय ध्वजाचा आकार आयताकृती असेल व झेंड्याची लांबी व रुंदी 3:2 या प्रमाणात राहील.

4) 20 जुलै 2022 च्या शासनाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय ध्वज दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 हे तीन दिवस घरोघरी फडकवताना दररोज सायंकाळी खाली उतरवण्याची आवश्यकता नाही.

5) राष्ट्रीय ध्वज फडकवताना केशरी रंग आकाशाकडे वर असावा तर हिरवा रंग जमिनीच्या दिशेने खाली असावा.

6) राष्ट्रीय ध्वज चढवितांना लवकर चढवावा व उतरवितांना सावकाश उतरवावा.

7) जेव्हा ध्वज फाटला असेल किंवा मळल्यामुळे खराब झाला असेल तेव्हा विशेषतः जाळून किंवा त्याची प्रतिष्ठा राखली जाईल अशा अन्य कोणत्याही पद्धतीने तो खाजगीरित्या संपूर्णपणे नष्ट करावा.

8) राष्ट्रीय ध्वजाच्या दोन्ही बाजूस समान पांढऱ्या पट्टीच्या पूर्णतः मध्यभागी 24 आऱ्याचे नेव्ही ब्लू रंगाचे अशोक चक्र दिसेल असा ध्वज असावा.


सुजाण नागरिकांनी काय करू नये....? 


1) राष्ट्रीय ध्वजावर कोणतेही प्रकारचे अक्षर लिहू नये व ध्वजाचा केशरी रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल अशा प्रकारे जाणीवपूर्वक ध्वज लावता येणार नाही.

2) राष्ट्रीय ध्वज जाणून-बुजून जमिनीवर अथवा पाण्यात पडणार नाही अशा पद्धतीने फडकवावा.

3) राष्ट्रीय ध्वजाचा वापर इमारत टेबल अथवा कोणतीही वस्तू झाकण्यासाठी करता येणार नाही.

4) राष्ट्रीय ध्वजाचा वापर व्यवसायासाठी करता येणार नाही.

5) खराब झालेला फाटलेला मळलेला चुरगळलेला ध्वज फडकविता येणार नाही.

6) राष्ट्रीय ध्वजाचा वापर कोणत्याही सजावटीसाठी करू नये.

7) तिरंगा च्या ध्वज स्तंभावर अन्य कोणताही ध्वज किंवा ध्वजा सोबत एकाच काठीवर फडकविता येणार नाही. तसेच राष्ट्रीय ध्वजाच्या उंचीवर अथवा समान उंचीवर अन्य कोणताही ध्वज फडकविता येणार नाही.

8) राष्ट्रीय ध्वजाचा वापर हातपुसणी वाहन पुसणे हात रुमाल उशी पोशाख म्हणून करता येणार नाही.

9) राष्ट्रीय ध्वजावर किंवा समान स्तरावर कोणतीही पताका बोधचिन्ह फुलांचा हार व इतर ध्वज एकाच काठीवर लावता येणार नाही.

10) राष्ट्रीय ध्वज फाटेल अशा पद्धतीने लावू अथवा बांधू नये. 

11)राष्ट्रीय ध्वज फडकवताना काठीच्या वरील बाजूस टोकावर फडकविणे मध्यभागी किंवा खाली फडकवू नये.

12)राष्ट्रीय ध्वजापेक्षा उंच किंवा राष्ट्रध्वजाच्या वर किंवा त्याच्या बरोबरीने अन्य कोणताही ध्वज किंवा पताका लावू नये.

राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये यासाठी राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 कलम दोन नुसार जी कोणी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही अन्य ठिकाणी लोकांच्या देखत राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे अपमान करतील त्याला तीन वर्षापर्यंत मुदतीचा कारावास अथवा द्रव्य दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
वरील काय करावे व काय करू नये यासंदर्भातील संपूर्ण पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.