निपुण भारत अभियान केंद्रस्तरीय शिक्षक उद्बोधन सत्र आयोजित करणे बाबत एस सी ई आर टी चे सहसंचालक यांचे पत्र.

 निपुण भारत अभियान केंद्रस्तरीय शिक्षक उद्बोधन सत्र आयोजित करणे बाबत एस सी ई आर टी चे सहसंचालक यांचे पत्र.


केंद्रस्तरावरून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत वय वर्ष तीन ते नऊ वयोगटातील बालकांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यावर विशेष भर देण्यात आला आहे त्यासाठी केंद्रमार्फत पाच जुलै 2021 रोजी भारत अभियान सुरू करण्यात आले आहे. निपुण भारत अभियानांतर्गत पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व व संख्याज्ञान विकसित होण्यासाठी राज्यातील विविध उपक्रम कार्यक्रम राबविण्यात येत आहे.


निपुण भारत अभियाना बाबत मुख्याध्यापक तथा शिक्षक तथा पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी यांच्यात जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. या अभियान अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने शिक्षकांना त्यांची भूमिका स्पष्ट होण्यासाठी समूह साधन केंद्रातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या प्राथमिक शिक्षकांसाठी इयत्ता पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी, अंगणवाडी सेविकांसाठी दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी निपुण भारत अभियान एक दिवसीय केंद्रस्तरीय शिक्षक उद्बोधन सत्र सोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रत्यक्षपणे घेण्यात यावे. जिल्हास्तरावरून प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रशासन अधिकारी महानगरपालिका यांच्या समन्वयाने संपूर्ण नियोजन करावे.


निपुण भारत अभियानांतर्गत केंद्रस्तरीय शिक्षक उद्बोधन सत्र याच कामाच्या पूर्वतयारीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत दिनांक 29 जुलै 2022 रोजी दुपारी साडेतीन वाजता राज्यस्तरीय ऑनलाईन उत्पादन बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या ऑनलाईन कार्यशाळेसाठी प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सर्व जिल्हे,  शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका निपून भारत जिल्हा नौदल अधिकारी यांनी उपस्थित राहणे बाबत आपल्या स्तरावरून उचित आदेश देण्यात यावे. सदर ऑनलाईन बैठकीची झूम लिंक आपणास मेलद्वारे कळवण्यात येईल.


केंद्रस्तरीय उद्बोधन 17 पूर्वी जिल्हास्तरावर तालुकास्तरीय सुलभकांचे तसेच तालुकास्तरावर केंद्रस्तरीय सुलभकांचे प्रत्यक्ष उद्बोधन बैठकीचे आयोजन करावे. सदर बैठकीमध्ये राज्यस्तरावरून करण्यात आलेले मार्गदर्शन तसेच सूचनाचे प्रसारण योग्य पद्धतीने करण्यात यावे. आपल्या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे नियोजन असल्यास त्यासाठी वेगळे नियोजन न करता हेच उद्बोधन सत्र इयत्ता पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद म्हणून गृहीत धरावे. इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षकांसाठी शिक्षण परिषदेबाबत स्वतंत्रपणे सूचना देण्यात येतील. या संदर्भात आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही करण्यात यावी ही विनंती.





तिनी पण भारत अभियान केंद्रस्तरीय शिक्षक उद्बोधन सत्राची वेळापत्रक व नियोजन पुढील प्रमाणे असेल.

निपुण भारत अभियान पार्श्वभूमी गरज महत्व शासन स्तरावरील प्रयत्न यासाठी वीस मिनिटे मार्गदर्शन.
निपुण भारत अभियान स्वरूप तीन ध्येय अध्ययन निष्पत्ती शिक्षकाची भूमिका यासंदर्भात तीस मिनिटे मार्गदर्शन.
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान एफ एल एन हेतू भाषा आणि गणित घटक व लक्ष यासाठी 25 मिनिटे मार्गदर्शन.
शाळा पूर्वतयारी पहिले पाऊल विद्या प्रवेश स्वरूप व अंमलबजावणी यासाठी दहा मिनिटे मार्गदर्शन.
अध्ययन अध्यापन साहित्याचा परिणामकारक वापर मराठी उर्दू इंग्रजी गणित कृतिपुस्तिका शिक्षक हस्तपुस्तिका मार्गदर्शिका चार्ट पोस्टर्स ही साहित्य दीक्षा यासाठी 25 मिनिटे मार्गदर्शन.
विविध भागधारकांची भूमिका पालक व समाज सहभाग यासाठी वीस मिनिटे मार्गदर्शन.
एफ एल एन मूल्यमापन राष्ट्र व राज्यस्तरावरील मूल्यमापन NAS FLN BESELINE SLAS. 

यानंतर प्रतिज्ञा होऊन समारोप होईल.

वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


 

 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.