या नियमानुसार वरिष्ठ निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यां शिक्षकांना मिळणार 10 दिवसांची अर्जित रजा. शिक्षण उपसंचालक यांचे पत्र

विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी 17 जून 2025 रोजी वरिष्ठ निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या खाती अर्जित रजा जमा करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम क्र. १६ (१८) (अ) नुसार एखादा स्थायी कर्मचारी मोठ्या सुट्यांचा हक्कदार असुनही एखाद्या वर्षात पुर्ण मोठया सुट्यांचा किंवा त्याच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यास प्रतिवर्षी झालेला असेल तर त्याबद्दल त्याला पुर्ण सुट्टीशी त्याने सुट्टीच्या न उपभोगलेल्या दिवसांच्या संख्येचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक ३० दिवसांच्या अर्जित रजेशी प्रमाणशीर असलेल्या संख्येएवढी अर्जित रजा अनुज्ञेय होईल अशी तरतुद आहे.

ज्या शिक्षकांनी वरिष्ठ वेतनश्रेणी/निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण (गृहपाठासह) पुर्ण केल्यामुळे त्यांना सुट्टी उपभोगण्यात प्रतिबंध झाला असेल त्यांच्या खाती अर्जित रजा जमा करण्याबाबत महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शती) नियमावली १९८१ मधील नियम क्र. १६ (१८) (अ) मधील वरील नियमानुसार कार्यवाही करावी.


(संदीप संगवे) 

विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग, मुंबई



विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांनी दिनांक 17 जून 2025 रोजी वरिष्ठ / निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पुर्ण झालेल्या प्राथमिक / माध्यमिक शिक्षकांच्या खाती अर्जित रजा जमा करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
वरिष्ठ / निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पुर्ण झालेल्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या खाती अर्जित रजा जमा करणेबाबत अध्यक्ष, शिक्षण संघर्ष संघटना, महाराष्ट्र राज्य यांचे निवेदन या कार्यालयास प्राप्त झाले आहे. सुलभ संदर्भासाठी निवेदनाची प्रत सलग्न केली आहे.

निवेदनातील मागणीबाबत प्रचलित नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही आपलेस्तरावरुन करण्यात यावी.

(निलिमा टाके -गुल्हाणे)
 शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती

वरिष्ठ/निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांच्या खाती अर्जित रजा जमा करणेबाबत  विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांनी दिनांक 16 जून 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
वरिष्ठ/निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांच्या खाती अर्जित रजा जमा करणेबाबत महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ यांनी विभागातील सर्व मुख्याध्यापक यांना आदेशित करणेबाबत निवेदन या कार्यालयास सादर केलेल आहे. सुलभ संदर्भासाठी निवेदनाची प्रत यासोबत जोडण्यात आली आहे.

सोबतचे निवेदन अवलोकनी घेऊन नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही आपलेस्तरावरुन करणेत यावी.

सोबत :- वरीलप्रमाणे

(महेश चौथ) 
विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग, कोल्हापूर





 वरिष्ठ/निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यां शिक्षकांना मिळणार 10 दिवसांची अर्जित रजा.

शिक्षण उपसंचालक यांचे पत्र.

मुंबई विभागाचे विभागीय उपसंचालक यांनी दिनांक 21 सप्टेंबर 2017 रोजी काढलेल्या एका पत्रानुसार वरिष्ठ अथवा निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेल्या कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या खाती दहा दिवसांची अर्जित रजा जमा करणे बाबत सूचना दिले आहेत ते पत्र पुढील प्रमाणे.

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवाशर्ती नियमावली 1981 मधील नियम क्रमांक 16/18 अनुसार स्थायी कर्मचारी मोठ्या सुट्ट्यांचा हक्कदार असूनही हे एखाद्या वर्षात पूर्ण मोठ्या सुट्ट्यांचा किंवा त्याच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यास प्रतिवर्षी झालेला असेल तर त्याबद्दल त्याला पूर्ण सुट्टी शी त्याने सुट्टीच्या न उपभोगलेल्या दिवसांच्या संख्येचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक तीस दिवसांची अर्जित रजेशी प्रमाणशीर असलेल्या संख्येएवढे अर्जित रजा अनुज्ञेय राहील.

ज्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी 21 दिवसाचे वरिष्ठ अथवा निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण गृहपाठ आसह पूर्ण केल्यामुळे त्यांना सुट्टीचा उपभोग घेण्यास प्रतिबंध झाला असेल त्यांच्यासाठी दहा दिवसांची अर्जित रजा जमा करावी व तशी नोंद संबंधिताच्या सेवा पुस्तकात करावी अशा सूचना मुंबई विभागाचे उपसंचालक  माननीय बी बी चव्हाण यांनी दिल्या आहेत.

अर्थात अशा प्रकारच्या रजा फक्त कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना ला लागू नसून सर्वच दीर्घ सुट्टी असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू आहेत.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

2 Comments

  1. पुणे विभागाचे पत्र कधी येणार सर

    ReplyDelete
    Replies
    1. उपसंचालकांना निवेदन द्यावा लागेल

      Delete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.