ऑनलाईन बदली पोर्टल संदर्भात शिक्षकांनी आज तातडीने करावयाची कार्यवाही :- (12.06.2022 )

 📌 ऑनलाईन बदली पोर्टल संदर्भात शिक्षकांनी आज तातडीने करावयाची कार्यवाही :-

(12.06.2022 )


विषय :- लॉगिन करून पाहणे व माहिती तपासणे.


प्रति,

सर्व कार्यरत शिक्षक बांधव...

अंतर्गत जिल्हा परिषद, यवतमाळ.


याद्वारे आपणांस सुचित करण्यात येते की,


ग्रामविकास विभागामार्फत ऑनलाइन बदली प्रक्रिया पोर्टल सुरू करण्यात आले आहे.


सदरील पोर्टलचे अधिकृत संकेतस्थळ https://ott.mahardd.in हे आहे.


🚫 इतर कुठल्याही अनाधिकृत मेसेज - पोस्ट - ब्लॉग - फेसबुक ई. वरील लिंक वापरून लॉगिन करू नये..!🚫


या संकेतस्थळाचा उपयोग करून आपण बदली प्रक्रियेसाठी जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे...तो आपला Login ID म्हणून नमुद करून send OTP या बटणावर Clik करावे.


असे केल्यानंतर त्याच मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे आलेला OTP नमुद करावा...व CAPTCHA code टाकून लॉगीन करावे. याचवेळी आपल्या ई-मेल वर देखील सारखाच OTP प्राप्त होईल.


⏩ *टिप :- OTP चा SMS / Email येण्यासाठी काही मिनिटांचा कालावधी लागू शकतो.

कृपया घाई-घाईने अनेकवेळा OTP जनरेट करू नये.

तसेच आलेला OTP आपणांस 10 मिनिटांच्या आत नमूद करावा लागेल.


📛 महत्वाचे :- जर आपणास मोबाईल क्रमांकाने लॉगीन होत नसेल...किंवा OTP चा SMS अथवा Email प्राप्त होत नसेल...तर तात्काळ आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात तयार करण्यात आलेल्या "बदली नियंत्रण कक्ष" तील अधिकारी-कर्मचारी यांच्याशी संपर्क करावा. 📛


तथापि, आपले लॉगिन यशस्वी झाल्यास...

👇🏻👇🏻👇🏻

मुख्य पानावर दिसून येत असलेले वेळापत्रक तसेच सर्व सूचना, शासननिर्णय काळजीपूर्वक वाचून घ्यावे..


त्यानंतर...प्रत्येकाने आपल्या मोबाईल screen वरील डाव्या बाजूकडील वरच्या कोपऱ्यात असलेल्या Options मध्ये जाऊन Profile या बटणास Clik करून समोर दिसत असलेली Personal Details माहिती - जसे की,



1) आपले संपूर्ण नांव.

2) जन्म दिनांक.

3) लिंग.

4) मोबाईल क्रमांक.

 5) आधार व PAN क्रमांकाची शेवटचे अंक + अक्षरे.

6) ई- मेल.

7) शालार्थ ID.

8) वैवाहिक स्थिती.

 

इत्यादी संपूर्ण माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्यावी.आणि खालच्या बाजूला असलेल्या NEXT या बटणावर Clik करावे.


📛 वरील Personal Details च्या माहिती मध्ये काही तफावत असल्यास आजच आपल्या तालुका बदली नियंत्रण कक्षास संपर्क करून असलेला बदल कळवावा. 📛


यानंतर आपल्या व्यावसायिक माहितीचे (Employment Details) Page open होईल.


सदरील पानावरील दिसून येणारी संपूर्ण प्रशासकीय माहिती आणि संदर्भातील दिनांक इत्यादी माहिती अत्यंत कटाक्षाने पडताळून घ्यावी.


पैकी आपल्या सेवा कागदपत्रानुसार..ज्या मुद्द्याची माहिती चुकीची आहे... त्याची नोंद स्वतः कडे ठेवावी.


📛 आजरोजी त्यामध्ये आपणांस कसलाही बदल करता येणार नाही.📛


⏩ सदरील नमूद Employment Details च्या माहितीमध्ये...दिनांकांमध्ये काही चुक-तफावत असेल तर...आपले गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत सूचनेनुसार तसेच दिलेल्या कालावधी मध्येच आवश्यक त्या कागदपत्रासह बदली नियंत्रण कक्षात संपर्क करावा अथवा आपले लॉगिनवर प्रत्यक्ष दुरुस्तीची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर बदलाची कार्यवाही करावी.


📛 तूर्तास आपणांस केवळ आपले बदली पोर्टल लॉगिन यशस्वी होत आहे.. Personal Details मधील माहिती अचूक असल्याबाबतच खात्री करावयाची आहे.📛


बदली प्रक्रियेचा Phase 1 या टप्प्यामध्ये शिक्षकांनी त्यांची  प्रोफाईल भरण्यासाठी 13 जून ते 20 जून हा कालावधी दिलेला आहे त्यामुळे आपणास 13 जून नंतरच आपले Employment details मध्ये माहिती अद्यावत करून गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगीन ला फॉरवर्ड करता येईल.

करीता वरील सूचनेनुसार सर्वांना आज आपले लॉगिन करून बघावे.


सदरील लॉगिन करण्यापूर्वी खालील Link वापरून यासंदर्भातील मार्गदर्शक विडिओ काळजीपूर्वक बघावेत..

👇🏻👇🏻👇🏻 

https://youtu.be/2GNL4YtAK2A


https://youtu.be/5IWLaVofnyM


⏩ तालुका बदली नियंत्रण कक्षाकरिता सूचना : गटशिक्षणाधिकारी तथा तालुका बदली नियंत्रण कक्ष अधिकारी यांनी वरील सुचना आपले अधिनस्त केंद्रप्रमुख, शालेय मुख्याध्यापक यांचे मार्फत सर्व शिक्षक बांधावांपर्यंत निर्गमित कराव्यात.


सर्व 100% कार्यरत शिक्षकांचे दिलेल्या सूचनेप्रमाणे यशस्वीपणे लॉगिन झाल्याचा केंद्रप्रमुख - शालेय मुख्याध्यापक यांचे मार्फत सूक्ष्म आढावा घ्यावा.


📛 लॉगिन न झालेल्या शिक्षकांचे, Personal Details चुकलेल्या शिक्षकांचे तसेच लॉगिन करीता दिसून न येणाऱ्या शिक्षकांचे...वागळावयाच्या शिक्षकांचे तालुका संकलित माहिती जिल्हा कार्यालयास दिनांक-13.06.2022 दुपारी 01.00 वाजेपर्यंत प्रत्यक्ष सादर करावी.📛


याकामी दिरंगाई होणार नाही याची सर्वतोपरी खबरदारी घ्यावी.


अशा सूचना ग्रामविकास विभागाकडून देण्यात आल्या आहे.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.