दीर्घ सुट्टी विभागातील कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा रोखीकरण बाबत शिक्षण संचालक यांचे पत्र व शासन आदेश

 दीर्घ सुट्टी विभागातील कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा रोखीकरण बाबत शिक्षण संचालक यांचे पत्र व शासन आदेश.

संचालनालयाचे पत्रांमधील दीर्घ सुट्टी विभागातील कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा रोखीकरण याबाबत स्पष्टता नसल्याने शासन आदेश होण्याची शासनास विनंती करण्यात आली होती त्यानुसार शासन स्तरावरून निर्देश प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवा शर्ती नियमावली 1981 मधील नियम 13 एक नुसार शाळेतील मुख्याध्यापक, प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक, शिक्षक संवर्गातील सर्व कर्मचारी यांना मोठी दीर्घ सुट्टी मिळण्याचा हक्क आहे.

मोठ्या सुट्ट्यांचा असलेल्या कर्मचाऱ्यांचे एखाद्या वर्षात पूर्ण मोठ्या सुट्ट्यांचा किंवा त्याच्या एखाद्या भागाचा लाभ देण्यास प्रतिबंध झाल्यास त्याला नियम 16 नुसार पूर्ण दिवसांच्या अर्जित रजेशी प्रमाणशीर असलेल्या संख्येएवढे अर्जित रजा अनुज्ञेय आहे तसेच नियम 16 नुसार च्या तरतुदी लागू असलेल्या कर्मचाऱ्यास सेवा निवृत्तीच्या वेळी त्याच्या हाती शिल्लक पैकी कमाल अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय आहे. वित्त विभागाने 15 जानेवारी 2001 रोजी शासन निर्णयान्वये अर्जित रजा साठवण्याची तसेच शिवणार सेवा निवृत्तीच्या वेळी अर्जित रजेचे रोखीकरण करण्याची 240 दिवसाची मर्यादा 300 दिवसा पर्यंत वाढवली असून वित्त विभागाने सदर सुधारणा होऊन  दिनांक एक एप्रिल 2001 रोजी च्या शासन निर्णयान्वये खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे. तथापि नियम 16 19 नुसार मोठ्या सुट्ट्यांचा हक्क असलेल्या कर्मचाऱ्यां च्या बाबतीत सुट्टी किंवा काही  भागाचा लाभ घेण्यास मुख्याध्यापकाने शिक्षण अधिकाऱ्यान पूर्वपरवानगीशिवाय प्रतिबंध केला असणे आवश्यक आहे तसेच शासन निर्णय दिनांक 4 ऑगस्ट 1995 अर्ध पगारी ऐवजी मंजूर अर्जित रजा रोखीने ठेवता येणार नसल्याबाबत तरतूद आहे.

मान्यताप्राप्त खाजगी शाळांमध्ये दिन सुट्टी विभागातील कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा रोखीकरण याबाबत फक्त तर तुम्ही अतिशय सरळ आणि स्पष्ट आहे त्यानुसार सुट्टी विभागातील कर्मचाऱ्यांना दीर्घसूत्री किंवा तिचा लाभ घेण्यास वरिष्ठ प्राधिकरणाचा अथवा विशेष आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आला असल्यास अशा सुट्टी न उपभोगलेल्या दिवसांच्या प्रमाणात नियमानुसार अर्जित रजा अनुज्ञेय असून रजा खाती जमा केवळ अशा अर्जित रजेचे कमाल मर्यादेत रोखीकरण आहे. त्यामुळे दीर्घ सुटी विभागातील कर्मचाऱ्यांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण, जनगणना इत्यादी काम करता करता नियमातील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकारी यांनी दीर्घ सुटी किमतीचा काही भाग उपभोगण्यास प्रतिबंध केला असल्यास अथवा दीर्घ सुटी कालावधीत कामकाजाच्या अनुषंगाने अर्जित रजा अनुज्ञप्ती बाबत शासन आदेश असल्यास अशा अर्जित रजेचे रोखीकरण सदर कर्मचाऱ्यांना देय राहणार असून त्याव्यतिरिक्त अर्जित रजा खाती जमा उर्वरित रजा रोखीकरण आस ठरणार नाही सबब सुट्टी विभागातील कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा रोखीकरण या बाबत वरील प्रमाणे नमूद नियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात यावी व आपल्या स्तरावरून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा असे निर्देश शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिले आहेत.






वरील शिक्षण संचालकांचे पत्र व शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.