शिक्षकांचे पगार वेळेवर करण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याबाबत दि. ५ मे २०२२ रोजी प्रधान सचिव, वित्त विभाग यांनी लावली विशेष बैठक.

शिक्षकांचे पगार वेळेवर करणे बाबत दि. ५ मे २०२२ रोजी प्रधान सचिव, वित्त विभाग यांनी लावली विशेष बैठक. 

शिक्षकांचे वेतन १ तारखेला करणे बाबत अनेक वेळा शासन निर्देश, आदेश, सूचना निर्गमित झाल्या आहेत परंतु परिस्थिती मात्र बदललेली नाही शिक्षकांच्या पगारासाठी जो उशीर अगोदर व्हायचा तो होतोच परंतु १२ एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित दादा पवार यांनी शिक्षण विभाग व वित्त विभाग यांना शिक्षकांचे पगार वेळेवर करण्यासाठी आवश्यक त्या त्या सूचना दिल्या आहेत त्याचे परिणाम म्हणून वित्त विभागाने त्यावर उपाय योजना ठरवण्यासाठी व वेतन उशिरा होण्याचे कारण जाणून घेण्‍यासाठी दिनांक 5 मे 2022 रोजी शिक्षण आयुक्तालयातील संबंधित अधिकारी यांना बोलून बैठक सदर बैठकीमध्ये.. 

 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मागणी तीन महिन्यांमध्ये वेतन कधी झाले याबाबतचे तपशील. 

माहे एप्रिल 2022 चा वेतनाची देवकाची सद्यस्थित. 

वित्तं वेळेवर होण्यासाठी केलेल्या किंवा करावयाच्या उपाययोजना व सूचना. 

 अशी तपशीलवार माहिती घेऊन उपस्थित राहण्याचे सांगितले आहे. 

शिक्षकांचे वेळेवर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयातील सहाय्यक संचालक लेखा यांनी माननीय शिक्षण संचालक शिक्षण संस्था माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांना ला पत्र लिहून सदरची माहिती दिनांक 2 मे 2022 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ई-मेल द्वारे पाठवण्यास सांगितली आहे. 

सदर माहिती प्रधान सचिव वित्त विभाग यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे दिनांक पाच मे दोन हजार बावीस रोजी सकाळी अकरा वाजता बैठकीत सादर करावयाची आहे असा देखील उल्लेख सदर पत्रात करण्यात आला. 


सदर बैठक ही संपूर्णपणे प्रशासकीय स्तरावरील असल्यामुळे या बैठकीमध्ये काही ठोस उपाय योजना करण्यात येऊन शिक्षकांचे पगार दर महिन्याला वेळेवर होतील अशी अपेक्षा आहे. 

नेहमीप्रमाणे फक्त आश्वासन न राहता कायमस्वरूपी या प्रश्नावर तोडगा निघून इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महिन्याच्या एक तारखेला शिक्षकांचे पगार झाले तर त्यांना सहन करावा लागणारा आर्थिक भुर्दंड यापुढे सहन करावा लागणार नाही. 

व पगाराबाबत शिक्षक संवर्गातून होणारी नेहमीची तक्रार येणे देखील बंद होईल. 



दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.