तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे शाळेच्या वेळेत बदल - शिक्षण आयुक्तांच्या सूचना

 तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे शाळेच्या वेळेत बदल -शिक्षण आयुक्तांच्या सूचना. 

 

राज्यभरात तीव्र उष्णतेची लाट लक्षात घेता संबंधित जिल्ह्याच्या स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या वेळी संदर्भात निर्णय घ्यावा अशा सूचना महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी दिल्या आहेत त्यानुसार अनेक जिल्ह्यातील  शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. 

यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाळांना भेटी देण्यासाठी गेले असता त्यांना तीव्र उष्णता जाणवली आणि सर्वप्रथम यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी शाळेची वेळ कमी करून सकाळी सात ते दहा या ही वेळ शाळेची ठेवण्यासंदर्भात पत्र देखील निर्गमित केले होते. 

ही बाब जेव्हा महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्या लक्षात आणून देण्यात आली तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शाळांच्या वेळेत बदल करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना दिले त्यानुसार वेगवेगळ्या जिल्ह्यात शाळेच्या वेळेत बदल करण्यात येत आहेत. 

आजचा बुलढाणा जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी शाळेच्या वेळेत बदल करून सकाळी 7 ते 11:30 ही बुलढाणा जिल्ह्यातील वर्ग नववी पर्यंत व 11 वी च्या वर्गाची वेळ असेल असे पत्र निर्गमित केले आहे. 

ते पुढील प्रमाणे. . 

वरील बुलढाणा जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी कार्यालयाने निर्गमित केलेल्या पत्राचा संदर्भ देखील माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांची दिनांक 9 एप्रिल 2022 ची सूचना असा आहे. 



दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.