उच्चशिक्षित शिक्षकांकडे सोपवला जाणार केंद्रप्रमुख/विस्तार अधिकारी पदाचा प्रभार..

 उच्चशिक्षित शिक्षकांकडे सोपवला जाणार

 केंद्रप्रमुख/विस्तार अधिकारी पदाचा प्रभार. 


राज्यभरातील परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांची बहुतांश पदे रिक्त आहे त्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. एखादी पद रिक्त असेल तर त्या पदाचा प्रभार त्यानंतर सेवा जेष्ठ असलेल्या व्यक्तीकडे सोपवला जातो असा प्रशासनाचा पायंडा व त्यानुसार शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी ह्या पदांचा प्रभार सोपविला जातो. किंवा समकक्ष अधिकाऱ्याकडे देखील हा अधिकचा प्रभार सोपवण्याची पद्धत आहे. परंतु असे केल्यास सदर व्यक्ती वर कामाचा कधीचा तान येतो केंद्रप्रमुख बाबत अशी परिस्थिती आहे की की ज्या ठिकाणी 10 केंद्र प्रमुखाची पदे आहेत अशा ठिकाणी फक्त दोन केंद्रप्रमुख आहे व काम चालले आहे. 

अशा परिस्थितीत अमरावती जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी एक पत्र निर्गमित केले आहे ते पुढील प्रमाणे. 


महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाणे निर्गमित केलेल्या दिनांक 23 डिसेंबर 2021 पत्राचा संदर्भ देत माननीय इ झेड खान शिक्षणाधिकारी प्रार्थमिक जिल्हा परिषद अमरावती यांच्या स्वाक्षरीचे या पत्रात नेट/सेट पीएचडी धारक प्राथमिक शिक्षकांना वर्ग दोनच्या प्रशासकीय सेवेत समावून घेण्याबाबत शासनाची माहिती मागवली आहे त्या त्याअर्थी अमरावती जिल्हा परिषदेत वर्ग 3 च्या विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख यांची बरीच पदे रिक्त आहेत तरी शासनाच्या उक्त धोरणाच्या पार्श्वभूमीवर नेट-सेट पीएचडी धारक प्राथमिक शिक्षकांच्या गुणवत्ता आणि कौशल्याचा परिपूर्ण लाभ घेता जिल्ह्यातील रिक्त असलेल्या विस्ताराधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख पदाचे अतिरिक्त प्रभार संबंधितास सोपवल्या प्रशासनच उत्तम आणि कौशल्यपूर्ण सेवा प्राप्त होईल सोबतच अशा गुणी आणि कार्यक्षम शिक्षकांना प्रत्यक्ष प्रशासनाचा अनुभव घेता येईल. 

तरी आपणास सूचित करण्यात येते की आपल्या पंचायत समिती अंतर्गत नेट-सेट पीएचडी धारक प्राथमिक शिक्षकांना रिक्त असलेल्या विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख या पदांची तात्पुरते अतिरिक्त प्रभार सोपवून याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल या कार्यालयात सादर करावा नेट सेट व पीएचडी धारक प्राथमिक शिक्षक उपलब्ध होत नसतील तर उच्चशिक्षित एम ए बी एड m.ed इत्यादी शिक्षकांना प्राधान्य द्यावे. 

वरील आशयाचे पत्र शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती यांनी निर्गमित केले आहे जर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांनी ग्रामविकास विभागाच्या सदर पत्राचा संदर्भ घेऊन अशी कार्यवाही केल्यास जोपर्यंत केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी पदे भरली जात नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्वच नेट सेट पीएचडी धारक शिक्षकांना केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी शिक्षण पदाचा प्रभार सोपवण्यात येऊ शकतो. 


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.