शिक्षण विभागाचे महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रके

शिक्षण विभागाचे महत्त्वाचे

 शासन निर्णय व परिपत्रके. 


1) भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 चाव्या जयंतीनिमित्त दिनांक 14 एप्रिल रोजी राज्यात सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळा आणि अध्यापक महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करणेबाबत दिनांक अकरा एप्रिल दोन हजार बावीस महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पुढील प्रमाणे शासन आदेश निर्गमित केला आहे. 

सदर शासन निर्णयानुसार प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गांसाठी वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे उपक्रम आणि स्पर्धा आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे कोणत्या वर्गासाठी कोणता उपक्रम किंवा स्पर्धा घ्यायची यासाठी सदर शासन निर्णय आपणास उपलब्ध करून देण्यात येत आहे. वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


2) केंद्र शासनाचा बालका जमिनीचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क 2009 व त्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्याकरिता वसतिस्थाने घोषित करणेबाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक अकरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी निर्गमित केला आहे. 

या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील फक्त काही वसतिस्थाने विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा देण्यासाठी अनुज्ञेय असतील असे ठरवले आहेत व ती वस्ती स्थाने कोणती हे देखील या शासन निर्णय सोबत नावा सकट दिलेली आहे. सदर शासन निर्णय व वसतिस्थाने अर्थात गावांची नावे आपण संपूर्ण शासन निर्णय डाऊनलोड करून पाहू शकता. वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


3) शंभर दिवस वाचन अभियान समारोप प्रसंगी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करणेबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे च्या सहसंचालकांनी एक परिपत्रक निर्गमित केले आहे. 

सदर परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास सर्जनशीलता चिकित्सक विचार इत्यादी विविध कौशल्ये विकसित होण्यासाठी शालेय व्यवस्थापनाने वाचनाची संबंधित कृती आणि उपक्रम पुस्तक परिचय, पुस्तक मेळावा, शाब्दिक खेळ, शब्दकोडे,  कथा-कथन, नाटिका सादरीकरण, कविता वाचन, गायन इत्यादी अशा प्रकारचे विविध उपक्रम व कृती यांचा समावेश असणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शालेय स्तरावर करण्यात यावे. तसेच शिक्षक पालक आणि समाजाचा सक्रिय सहभाग असणाऱ्या वाचन अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या विविध कृती व उपक्रम यामुळे झालेला आनंद आणि विविध अनुभव व्यक्त करण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात यावी असे म्हटले आहे. 

संपूर्ण परीपत्रक पुढील प्रमाणे वरील परिपत्रक पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Downloadदररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.