महाराष्ट्रात उभे राहणार देशातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय - शिक्षण मंत्री मा. वर्षा गायकवाड

 महाराष्ट्रात उभे राहणार देशातील 

पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय -

 शिक्षण मंत्री मा. वर्षा गायकवाड. 


काय तुम्हाला तुम्ही शाळेत असतानाची प्रत्येक वर्गाची सर्व पाठ्यपुस्तके वाचायची आहेत? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण नुकत्याच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक संशोधन आणि निर्मिती मंडळ येथे महाराष्ट्र राज्याच्या माननीय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रात देशातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली व त्यासाठी पाच कोटी एवढा निधी देखील महाराष्ट्र शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

अशी अधिकृत माहिती महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री माननीय वर्षा गायकवाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून वीट करून दिली आहे. 

सदर ट्विट नुसार "बालभारती मार्फत देशात पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय निर्माण करण्यात येणार आहे बालभारतीच्या ग्रंथालयात 1837 पासून दुर्मिळ अशी पाठ्यपुस्तके जपून ठेवली आहे. तसेच भारतातील अन्य राज्यातील पाठ्यपुस्तके ही एकत्र करता येतील. याद्वारे पाठ्यपुस्तकांचा उद्देश रचना व वैशिष्ट्ये स्वरूप आणि इतिहास यांचा अभ्यास करता येणे शक्य होईल."

यासोबतच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड असे म्हणतात              "वाचनप्रेमी साठी एक आनंदाची बातमी! देशातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय हे राज्यात उभारण्यात येणार आहे यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या बैठकीत येत्या आर्थिक वर्षासाठी रुपये पाच कोटी तरतूद करण्यात आली."

जर सदर संग्रहालय डिजिटल स्वरूपात राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच बालभारतीच्या वेबसाईटवर उपलब्ध झाली तर प्रत्येकाला म्हणजेच प्रत्येक पिढीला आपण वर्गात शिकत असतानाची पाठ्यपुस्तके पुन्हा वाचण्याचा आनंद घेता येणार आहे. 

आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्यांच्या वेळी त्यांच्या पाठ्यपुस्तकात असलेल्या कविता तोंडपाठ आहेत. 
परंतु ज्यांना ह्या कविता तोंडपाठ नाही त्यांनादेखील आता काळजी करण्याची गरज नाही कारण त्यांच्या वेळी त्यांच्या पाठ्यपुस्तकात असलेल्या कविता धडे गोष्टी पुन्हा वाचण्याचा आनंद आता तीदेखील महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि संशोधन मंडळ यांनी स्थापन केलेल्या पाठ्यपुस्तक संग्रहालयात जाऊन आपल्या वेळी असलेल्या आपल्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकाच्या वाचनाचा आनंद पुन्हा घेऊ शकतात. 
इतकेच नव्हे तर आपल्या वडिलांना कोणती पाठ्यपुस्तके होती आपल्या आजोबांना कोणती पाठ्यपुस्तके होती हीदेखील वाचण्याची संधी नवीन पिढीला उपलब्ध होणार आहे. 
त्यासोबतच ही पाठ्यपुस्तके वाचतांना आपल्या शालेय जीवनातील घडलेल्या गोष्टींना आपसूकच उजाळा मिळणार आहे. 

ही गोष्ट शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी देखील उपयोगी आहे कारण आतापर्यंत महाराष्ट्रात आणि भारतातील इतर राज्यात कशा पद्धतीची पाठ्यपुस्तके निर्माण करण्यात आली व त्यामध्ये हळूहळू कसा बदल होत गेला सदर पाठ्यपुस्तकातील चांगल्या गोष्टी नवीन पाठ्यपुस्तकात वापरता येतील का? ह्या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी ही सर्व पाठ्यपुस्तके एकाच ठिकाणी यामुळे उपलब्ध होऊ शकणार आहे. 

म्हणजेच महाराष्ट्रात पाठ्यपुस्तक संग्रहालय उभारले गेले तर. . 
आज पर्यंत ची सर्व पाठ्यपुस्तके ही काही ठिकाणी वाचायला मिळणार... 

प्रत्येक पिढीला आपल्या या काळातील पाठ्यपुस्तके पुन्हा वाचायला मिळणार... 

प्रत्येक पिढी आपली पाठ्यपुस्तके वाचून पुन्हा शालेय जीवनाच्या आठवणीत रममाण होणार. . 

पाठ्यपुस्तकांचा इतिहास समजून घेण्यास मदत पुन्हा. . 

सर्व जुनी पाठ्यपुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध होणार व जुन्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करण्याची संधी अभ्यासकांना उपलब्ध होणार. . 

कदाचित एखादी बॅच त्यांचे री-युनियन या पाठ्यपुस्तक संग्रहालय आतच आयोजित करणार आणि सर्व मिळून त्यांच्या शालेय जीवनात उजाळा देणार.. 



दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.