आता महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी/अधिकाऱ्यांना करावी लागणार दरवर्षी आरोग्य तपासणी.

महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी/अधिकाऱ्यांना करावी लागणार दरवर्षी आरोग्य तपासणी. 


महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या प्रेस नोट द्वारे राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत वय वर्ष चाळीस ते पन्नास या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची दोन वर्षांतून एकदा व वय वर्षे 51 व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी व त्याकरता रुपये पाच हजार प्रमाणे अनुक्रमे 38.56 कोटी व 66.58 कोटी खर्च अपेक्षित असल्याने त्यानुसार प्रति वर एकूण 105.43 कोटी इतका खर्च मान्यता मिळाली आहे. 

त्यानुसार चाळीस वर्षांवरील वयाच्या सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या वैद्यकीय तपासण्या ठरवून दिलेल्या नमुन्यात त्या त्या आर्थिक वर्षात करून घ्याव्यात व संबंधित रुग्णालयात त्यासाठी आवश्यक रक्कम प्रथम स्वतःला करावी व त्याची प्रतिकृती आपल्या कार्यातून मिळवावी. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संबंधित रुग्णालयाला लाभार्थीने भरलेली रकमेचा विनियोग प्रचलीत नियमानुसार करण्याची मुभा आहे त्यास मान्यता देण्यात आली आहे. 

वैद्यकीय तपासणी साठी लागणारा खर्च कर्मचाऱ्यास प्रथम स्वतः करावा लागणार.... 

त्यानंतर कार्यालय त्याची प्रतिपूर्ती देणार... 


प्रति आरोग्य तपासणी साठी मिळणार रुपये 5000..

राज्यातील वय वर्ष 40 पुढील कार्यरत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना प्राप्त होत असलेल्या विधीप्रमाणे समान वैद्यकीय चाचण्या व सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त आरोग्य संस्थान मार्फत उपलब्ध नसून सदर चाचण्या तालुकास्तरावर बाई यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील त्यासाठी आवश्यक कार्यपद्धती वेगळ्याने विहित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 


सदर प्रेस नोट ही डॉ. प्रदीप व्यास अप्पर सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सहीने निर्गमित करण्यात आली आहे. 


 दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.