आता शिक्षकांना जिल्हा आयसीटी पुरस्कार? (ICT AWARDS)

 केंद्र शासनाच्या धर्तीवर जिल्ह्यात देखील शिक्षकांना

 आय सी टी पुरस्कार? 


शिक्षणात नाविन्यपूर्ण पद्धतीने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शिक्षकांना भारत सरकारची शिक्षण मंत्रालय दरवर्षी राष्ट्रीय आय सी टी पुरस्कार (National ICT Awards)देऊन गौरवते. 

या धरतीवर रत्नागिरी जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी एक परिपत्रक काढून जिल्हा आयसीटी पुरस्कार दिली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. 

त्याची निवड पद्धती देखील सदर पत्रात नमूद आहे. 

हे पत्र पुढील प्रमाणे. 


वरील पत्र पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


 आयसीटी पुरस्काराची उद्दिष्टे. 


उत्कृष्ट तंत्रस्नेही शिक्षकांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे. 

तंत्रस्नेही शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण व सृजनशील कामकाजाची दखल घेणे. 

राष्ट्रीय आय सी टीप शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांची पूर्व तयारी करून घेणे. 

जिल्हा तालुका केंद्र व शाळा स्तरावर आय सी टी कक्षाचे सक्षमीकरण करणे. 

शंभर टक्के शिक्षक तंत्रस्नेही व्हावे यासाठी तंत्रस्नेही चळवळ विकसित करणे. 


निवडीची पद्धत ही चार टप्प्यात असेल. 

पात्रता परीक्षा तीस गुणांची. 

केंद्रप्रमुख शिफारस वीस गुण. 

शिक्षणाधिकारी शिफारस 20 गुण. 

मुलाखत 30 गुण. 

अशा चार टप्प्यात मूल्यमापन केल्यानंतर हा जिल्हा आयसीटी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 


प्राथमिक शिक्षक पुरुष, 

प्राथमिक शिक्षक महिला, 

माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय स्तर पुरुष शिक्षक. 

माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय स्तर महिला शिक्षक. 

अशा चार विभागात हे आयसीटी पुरस्कार देण्यात येत आहे पिया पुरस्कारांमध्ये प्रमाणपत्र सन्मानचिन्ह व आय सी टी किट असे प्रत्येकाला मिळणार आहे. 


सदर जिल्हा आयसीटी पुरस्काराचा कित्ता इतरही जिल्ह्यांनी अनुसरला तर महाराष्ट्रातील आयसीटी चळवळीला अधिक बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे. 


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.