Mahabocw scholarship scheme बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना

 Mahabocw scholarship scheme. 

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना. 


पूर्वी पासून मिळत असणाऱ्या योजना

बांधकाम कामगारांच्या मुला किंवा मुलीकरिता इयत्ता १ पासून पदव्युत्तर शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य.

कामगारांचा मुलगा जर अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण घेत असेल तर त्यासाठी विशेष सहाय्य केले जाते.

बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो म्हणजेच घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

कामगार आजारी पडला किंवा बांधकाम कामगाराची पत्नी बाळंतीण झाली तर अशावेळी देखील महाराष्ट्र कामगार मंडळाकडून आर्थिक सहाय्य दिले जाते.

बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजेच safety kit दिली जाते.

ज्या भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे त्या भागामध्ये त्या भागातील कामगारांना मध्यान्ह भोजनासह रात्रीचे भोजन देखील पुरविले जाते.


बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना म्हणजेच mahabocw scholarship scheme संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात व इतर महत्वाची माहिती तपशीलवारपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे हि संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

Maharashtra building and other construction works ज्याला मराठीमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळ देखील म्हणतात. या वेबसाईटवर जावून बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी करावी लागते.

तुम्ही बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी Construction worker online registration केले असेल तर शासनाच्या विविध ३२ योजनांचा लाभ तुम्हाला घेता येईल.

बांधकाम कामगार यांच्या कल्याणासाठी सुरु असलेल्या विविध ३२ योजना नेमक्या आहेत तरी कोणत्या यांची बांधकाम कामगार यांना माहिती असायला हवी.


Mahabocw scholarship scheme बांधकाम कामगार

Mahabocw scholarship scheme आवश्यक कागदपत्रे.

बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करताना काही कागदपत्रे ऑनलाईन अर्ज करतांना अपलोड करावी लागतात ती खालीलप्रमाणे आहेत.

  • ज्या विद्यार्थ्याचा अर्ज सादर करणार आहात त्याच्या शाळेतील उपस्थिती ७५ टक्के असल्याचे उपस्थिती प्रमाण पत्र ज्याला attendance certificate असे म्हणतात. शाळेतील उपस्थिती प्रमाणपत्र नमुना हवा असेल तर लगेच ओरिजिनल नमुना डाऊनलोड करा. 


  • शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र Bonafied Certificate. तुम्हाला ह्या बोनाफाईड प्रमाणपत्राचा नमुना हवा असेल तर तो देखील उपलब्ध आहे. 


  • मुलाचे किंवा मुलीचे आधार कार्ड.
  • स्वयंघोषणापत्र Self Declaration. स्वयंघोषणापत्राचा नमुना डाऊनलोड करा. 

वरील प्रकारची सर्व कागदपत्रे बांधकाम कामगार ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज करतांना अपलोड करावे लागतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्रे तुमच्याकडे स्कॅन करून ठेवा.


मोबाईलवरून असा करा बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज

या ठिकाणी आपण मोबाईल फोन वरून बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील माहिती जाणून घेणार असलो तरी अशाच पद्धतीने तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवरून अर्ज करता येणार आहे.


दोन्हीकडे अर्ज करण्याची पद्धत सारखीच आहे. त्यामुळे खालील पद्धतीचा अवलंब करा. ( या लेखाच्या शेवटी एक व्हिडीओ लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तो व्हिडीओ पाहून घ्या जेणे करून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यास अतिशय सोपे जाईल )


तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळाची वेबसाईट ओपन करा किंवा डायरेक्ट वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

वेबसाईट ओपन झाल्यावर construction worker apply online for claim हा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक किंवा टच करा.

जसे हि तुम्ही वरील सांगितलेल्या बटनावर क्लिक कराल त्यावेळी एक चौकट तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी दोन पर्याय तुम्हाला दिसतील New Claim व Update claim त्यापैकी New Claim या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाका ( सुरुवातीला बांधकाम कामगार यांची ऑनलाईन नोंदणी करावी लागते आणि मग रजिस्ट्रेशन नंबर मिळत असतो. )

75 टक्के शाळेची उपस्थितीचे प्रमाणपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट, आधार कार्ड, स्वयंमघोषणापत्र व शिधापत्रिका हि सर्व कागदपत्रे अपलोड करा.

कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कागदपत्रे पडताळले या बटनावर क्लिक करा आणि सर्वात शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करा.

जसे हि तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुम्हाला एक पोच पवती क्रमांक मिळेल तो पुढील कार्यवाहीसाठी सांभाळून ठेवा.

वरीलप्रमाणे तुम्ही बांधकाम कामगार शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज मोबाईलवरून सादर करता येते. हि माहिती अधिक चांगल्या पद्धतीने समजावी यासाठी खालील व्हिडीओ लिंकवर क्लिक करून व्हिडीओ पहा आणि त्याप्रमाणे कृती करून तुमचा अर्ज सादर करून द्या.


Mahabocw scholarship scheme 


बांधकाम कामगारांचे दोन्ही पाल्य शाळेत असतील तर इयत्ता १ ली ते ७ वी साठी प्रत्येक वर्षाला मिळणार २ हजार पाचशे रुपये किंवा ८ वी ते १० वी साठी प्रतिवर्षी ५००० रुपये मिळतील.
दोन पाल्यांना इयत्ता १० वी किंवा १२ वी मध्ये ५० टक्के किंवा अधिक गुण मिळाल्यास रुपये १०,००० रुपये मिळतील.
पाल्य किंवा कामगार यांची पत्नी शिक्षण घेत असे तर अशावेळी त्यांना २०,००० रुपयापर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते.
बांधकाम कामगार यांचा पाल्य किंवा पत्नी वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेत असेल तर त्यांना प्रतिवर्ष १,००,००० तर अभियांत्रिकी पदवी शिक्षणासाठी ६०,००० एवढे अनुदान मिळेल.

अशा प्रकारे आपण या लेखामध्ये जाणून घेतलेले आहे कि बांधकाम कामगार यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळ यांच्याकडे नोंदणी केली असेल तर आपल्या पाल्यांना किंवा पत्नीला २५०० रुपयांपासून ते १०००० लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती कशी मिळवून द्यावी.


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏




Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.