दहावी व बारावीच्या यावर्षीच्या विद्यार्थ्यांना मिळणार COVID-19 परिस्थितीमुळे अतिरिक्त गुण - शिक्षण मंत्री महाराष्ट्र.

 दहावी व बारावीच्या यावर्षीच्या विद्यार्थ्यांना मिळणार COVID-19 परिस्थितीमुळे अतिरिक्त गुण -

 शिक्षण मंत्री महाराष्ट्र. 




2020-21 व 2021-22 या शैक्षणिक वर्षात covid-19 मुळे शाळा बंद होत्या व त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिकता आले नाही त्यांचा अध्ययन तोटा झाला यासाठी महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री यांनी यावर्षी दहावी व बारावी ची बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक निर्णय घेतला आहे व या निर्णयानुसार दहावी व बारावीच्या बोर्डाला देखील सूचना दिल्या आहे काय आहे तो निर्णय समजून घेऊ या. 

या वर्षीच्या दहावीच्या व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड महाराष्ट्र राज्य यांनी क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. 

दहावीच्या बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी सातवी व आठवी मध्ये घेतलेल्या क्रीडा स्पर्धा मधील सहभाग आ वरून त्यांना दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत. 

बारावीच्या बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी नववी व दहावी मध्ये घेतलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागा नुसार त्यांना या वर्षीच्या त्यांच्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत अतिरिक्त गुण देण्यात येणार आहे. 

हा निर्णय या वर्षीच्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी covid-19 परिस्थितीचा विचार करता फक्त यावर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय लागू असणार आहे. 

या संदर्भातील सूचना माननीय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी व बारावीच्या बोर्डाला दिल्या आहेत लवकरच दहावी बारावीचे बोर्ड यासंदर्भात सविस्तर सूचना जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. 

सदर निर्णय covid-19 च्या पास पार्श्वभूमी वर घेतल्याचे वर्षा गायकवाड शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या दोन सत्रात विद्यार्थी शाळेत प्रत्यक्ष येऊन शिकू शकले नाही ऑनलाईन मध्ये काही मर्यादा असल्यामुळे आणि काही विद्यार्थी ऑनलाइन ऑफलाईन दोनही पद्धत पद्धतीने शिकू शकले नसल्यामुळे सदर निर्णय घेण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांचे नापास होण्याचे प्रमाण कमी होऊन क्रीडा क्षेत्रात निपुण विद्यार्थ्यांना याचा चा अधिक फायदा होणार आहे. 


अशाच महत्त्वाच्या शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी फॉलो करा आमच्या ब्लॉगला. 


अधिक माहिती जाणून घेण्यासाठी/ शिक्षण विभाग संदर्भातील शासन निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा

Join Whatapp Group


धन्यवाद! 



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.