बहुभाषिक वातावरणाचे विद्यार्थ्याच्या अध्ययनावर होणारे परिणाम.. (मातृभाषेतून शिक्षण काळाची गरज)

बहुभाषिक वातावरणाचे विद्यार्थ्याच्या 

अध्ययनावर होणारे परिणाम.. 

(मातृभाषेतून शिक्षण काळाची गरज)


या अगोदर वेगवेगळ्या लेखांमधून स्वतःची वेगळी भाषा असून त्यापेक्षा वेगळ्या माध्यमातून जर विद्यार्थी शिक्षण घेत असेल तर त्याला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते तसेच त्याच्या शिक्षकांना कोणत्या अडचणीला सामोरे जावे लागते हे समजून घेऊन त्यावरील उपाय यावर देखील आपण आपल्या ब्लॉगवर चर्चा केली आहे ती आपण वाचली असेल. 

आजच वातावरण हे भाषेच्या बाबतीत बहुभाषी झालेले आहे आपल्या घरातील टीव्ही मोबाईल कम्प्युटर ही सर्व साधने आणि बहुतांश घरांमध्ये उपलब्ध झाली आहेत आणि या साधनां द्वारे वेगवेगळ्या भाषा आपल्या कुटुंबाच्या कानावर नियमित पडत असतात. लहान मुले मोबाईलवर वेगवेगळ्या भाषेतील कार्टून्स पाहत असतात आयते पाहिल्या मुळे ते मराठी वाक्यात इंग्रजी आणि हिंदी अशा शब्दांचा वापर नेहमी करताना आपल्याला दिसून येतात जो शब्द त्याने त्या टीव्हीवरील कार्टून्स मध्ये किंवा मोबाईलवरील नर्सरी राइम्स मध्ये ऐकलेली असतात त्याचा अर्थ देखील त्याला माहित असतो आणि मग मराठी वाक्य बोलताना तू त्या इंग्रजी किंवा हिंदी शब्दांचा वापर त्या मराठी वाक्यात करतो जरी त्या वाक्यात इंग्रजी आणि हिंदी शब्द वापरलेले असतात तरी ते वाक्य अर्थपूर्ण असते ते एखाद्या वेळेला त्याला त्या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कदाचित माहीत नसेल परंतु इंग्रजी किंवा हिंदी शब्द वापरलेले वाक्य मात्र अर्थपूर्ण असते. 

वरील परिस्थितीचे कारण आपण जर समजून घ्यायला गेलो तर मोबाईल वर टीव्ही चा अधिकाधिक वापर व घरातील मातृभाषेचा पुरेसा न झालेला वापर यामुळे ही परिस्थिती निर्माण होते अर्थात वाक्य जरी अर्थपूर्ण असले तरी सहसा आपण एक वाक्य एका भाषेतून अपेक्षित करतो परंतु असे न होता की इतर भाषेतील शब्द नेहमी कानावर पडल्यामुळे कोणतीही एक भाषा पूर्णपणे शिकण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. 

घरातील मूल तीन वर्षाचे झाल्यानंतर त्याला लगेच इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक शाळेत दाखल केले जाते. आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी माध्यमात शिकलेल्या शिक्षका कडून त्याला इंग्रजी माध्यमातून शिकवले जाते. अगोदरच एक वाक्य तीन भाषेतील शब्द वापरून मुल बोलायला शिकलेले असते त्यानंतर इंग्रजी भाषेच्या शाळेत गेल्यावर मुलाला मिश्र भाषेतून शिक्षण मिळते अशावेळी त्याला इंग्रजी भाषेतून अंक ओळख करून दिली जाते. आणि मग जेव्हा घरी त्याला मराठीतून एखादा अंक वापरून एखादे काम सांगितले जाते तर ते त्याला न समजता तो अंक त्याला इंग्रजीतून सांगावा लागतो म्हणजेच मी त्याला जर शहीद 40 हा अंक मराठीतून सांगितला तर तू त्याला कळत नाही त्याला तू इंग्रजीतून सांगावा लागतो. 

एकूणच समाजाचा विचार केल्यास जेव्हा मूल बाहेर पडते तेव्हा त्याला वेगवेगळ्या भाषेची लोक भेटतात गुणी मराठीतून बोलतो तर कुणी हिंदीतून आणि बरीच लोक तोडक्या-मोडक्या इंग्रजीतून बोलताना त्याला दिसून येतात म्हणजेच बाहेर समाजात पडल्यानंतर देखील त्याला वेगवेगळ्या भाषेत बोलणारी लोक भेटतात. अशावेळी पूर्व ज्ञानाच्या आधारावर व तर्कावर तू वेगवेगळ्या भाषणांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि ही जी वेगवेगळ्या भाषेत बोलणारी लोक त्याला दिसतात त्या लोकांना किमान दोन भाषा तरी अवगत असतात ग तोच व्यक्ती त्याला एका वेळेला एक भाषा व दुसर्‍या वेळेला दुसरी भाषा बोलतांना दिसून येतो. 

अशावेळी विद्यार्थी कोणतीही एक भाषा पूर्णपणे न शिकता मिश्र भाषा शिकतो. परंतु जेव्हा तो शाळेत येतो तर त्याला कोणत्याही एका भाषेतून तूं माध्यम म्हणून शिकवले जाते मग अशावेळी ती एकच भाषा पूर्णपणे अवगत न झाल्यामुळे विद्यार्थ्याला संबंधित विषय आकलन होण्यासाठी अडचणी निर्माण होतात. 

देवनागरी लिपी मधील हिंदी आणि मराठी भाषेचा विचार केला असता दोन्ही भाषा सारख्या पद्धतीने लिहिल्या जातात परंतु काही शब्दांचा अर्थ जो हिंदीमध्ये आहे तोच मराठी मध्ये नसून तो वेगळा अर्थ असत अश्यावेळी विद्यार्थ्याच्या मनात संभ्रम निर्माण होतो नेमका तो शब्द हिंदी की मराठी त्याचा हिंदीतील अर्थ घ्यायचा की मराठीतील अर्थ. 

विद्यार्थ्याला प्राथमिक स्तरावर भाषा अवगत होण्यासाठी कुटुंब ही संस्था खूप महत्त्वाची ठरते मुल जेव्हा जन्म घेते तेव्हापासून त्याच्या कानावर कुटुंबात बोलल्या जाणारी भाषा ऐकू येते आणि हळूहळू सहजगत्या ते मुल त्या कुटुंबाची भाषा शिकू लागते जर कुटुंब बहुभाषी असेल तर ते मुल देखील अनेक भाषा एकावेळी शिकू शकते परंतु तू जवळपास कुटुंब ही एक भाषी असतात म्हणजेच कुटुंबात एकच भाषा वापरली जाते आणि ती म्हणजे त्या मुलांची मातृभाषा होय. मुल कुटुंबात त्याची मातृभाषा बहुआयामी पद्धतीने शिकत हे भाषेचे अनेक आयाम बोलताना भावना व्यक्त करताना भांडताना हसतान अशा वेगवेगळ्या प्रसंगी त्याच्या लक्षात येतात आणि कोणत्या प्रसंगी कोणते सुयोग्य शब्द निवडायचे हे देखील त्याच्या सहज लक्षात येते. 

मातृभाषा व्यतिरिक्त दुसरी एखादी भाषा जर कुटुंबाने ठरवून शिकवण्याचा प्रयत्न केला तरी कुटुंबासाठी ते सहज साध्य नाही नाही जोपर्यंत घरातील एखादी व्यक्ती पूर्णपणे एखादी भाषा जाणतो आणि फक्त त्या आणि त्याच भाषेत त्या मुलाशी संवाद साधतो तेव्हाच त्याला ती भाषा अवगत करणे शक्य होईल जर एखादी व्यक्ती त्याच्याशी दोन भाषेत बोलत असेल तर मात्र मूल संभ्रमात पडू शकते. 

मग जर एखादं कुटुंब सुशिक्षित असेल त्याचे आई वडील दोघेही नेहमीसाठी इंग्रजीतून संवाद साधत असतील आणि ते विद्या मुलाशी देखील इंग्रजी मधून संवाद साधत असतील अशावेळी त्या मुलांची मातृभाषा ही इंग्रजी असेल आणि इंग्रजी भाषा तो सहज रीतीने आत्मसाद करू शकेल. परंतु असे किती कुटुंबात घडते? हा प्रश्न आहे. आणि आई-वडिलांची स्वतःची मातृभाषा सोडून त्या आईवडिलांनी इंग्रजी भाषेतच त्या मुलाशी का संवाद साधावा? हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जर स्वतःची मातृभाषा इंग्रजी नसेल तरीदेखील आई-वडील त्यांच्या मुलाशी इंग्रजी भाषेत संवाद साधत असतील तर त्या संवादात कृत्रिमता येण्याची शक्यता नाही का? असे अनेक प्रश्न जेव्हा आईवडिलांची स्वतःची मातृभाषा ही मुलाशी संवाद साधण्याची भाषा नसेल तेव्हा निर्माण होतात आणि ते अटळ आहे. कुटुंबात आपण जे सहज संवाद करतो ते जेव्हा मातृभाषेतून असतात तेव्हा हा त्यामधील गोडवा ओलावा आपलेपणा जसा जाणवतो तसा कुटुंबाची भाषा नसलेल्या भाषेतून जेव्हा आपण कुटुंबाशी संवाद साधून तेव्हा तो जाणवणार नाही. 

मग यावर पर्याय काय? यावर एक मात्र पर्याय हाच की आईवडिलांची ही असलेली मातृभाषा हीच मुलाशी बोलण्या ची भाषा असावी आणि जेव्हा हा मुलगा त्याची मातृभाषा विविध अंगाने समजून घेईल आणि त्याला एक भाषा चांगल्या पद्धतीने अवगत होईल. आणि हीच त्याची मातृभाषा त्याच्या शिक्षणाचे माध्यम असेल तरच त्याला येणारे अडथळे दूर होऊ शकतील. म्हणून मातृभाषेतून शिक्षण ही काळाची गरज होऊन बसली आहे तिला पर्याय नाही. सर्व संकल्पना यांचे आकलन जर विद्यार्थ्यांना करून द्यावयाचे असेल तर निदान प्राथमिक शिक्षण तरी त्यांचे स्वतःच्या मातृभाषेत व्हायला हवे हे निश्चित आहे. 


अधिक माहिती जाणून घेण्यासाठी/ शिक्षण विभाग संदर्भातील शासन निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा

Join Whatapp Group


धन्यवाद! 



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.