जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरखेड येथे उत्साहात शिवजयंती साजरी

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरखेड येथे 

उत्साहात शिवजयंती साजरी.. 

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरखेड तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली शिवजयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश भगत हे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनानंतर, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच शिवाजी महाराजांची आरती घेण्यात आली, वर्ग चौथीच्या विद्यार्थ्यांनी "दैवत छत्रपती" या गाण्यावर नृत्य सादर केली, वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांचे जीवनातील अफजलखान वध या प्रसंगावर आधारित पोवाडा सादर केला, वर्ग आठवीच्या विद्यार्थिनींनी शिवजयंतीनिमित्त पाळणा गीत सादर केले, 21 विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारे भाषणे केलीत. विद्यार्थी शिवजयंतीनिमित्त वेगवेगळ्या वेशभूषा करून शाळेत हजर होती. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवजयंती कार्यक्रमात अगदी उस्फुर्त सहभाग घेतला या सहभागासाठी त्यांना त्यांच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाच्या वेळी सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शाळेतील इतर कर्मचारी अंगणवाडी चे कर्मचारी व काही पालक उपस्थित होते.

दैवत छत्रपती या गाण्याची सादरीकरण पाहण्यासाठी

येथे क्लिक करा . 

विद्यार्थ्यांनी सादर केलेले इतर कार्यक्रम व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी भेट द्या आमच्या पुढील यूट्यूब चैनल ला.. 


अधिक माहितीसाठी गुगल सर्च करा pradipjadhao


धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.