प्रबोधण पंढरीचा क्रान्तिकारी संत गाडगेबाबा - संतोष अरसोड

 प्रबोधन पंढरीचा क्रान्तिकारी संत गाडगेबाबा 

- संतोष अरसोड 


लोकांच्या गावातील आणि नंतर डोक्यातील घान साफ़ करणारे, स्वतः निरक्षर असून लोकांना शिक्षणासाठी समजाऊन सांगणारे, अंधश्रद्धा, सावकारी पाश, अनिष्ट रूढी, परंपरा या विषयांवर आपले अतिशय परखड असे मत कीर्तनाच्या माध्यमातून मांडणारे, निरक्षर असून ज्यांचे नाव एका विद्यापीठाला दिले जाते असे थोर क्रांतिकारी कृतिशील संत गाडगेबाबा.. 

संत गाडगेबाबा यांचे जीवन चरित्र प्रत्यक्ष ज्या ज्या ठिकाणी संत गाडगे बाबांनी वास्तव्य केलेले किर्तन केली ज्याच्या ठिकाणचा आणि माणसांची त्यांचा संबंध आला अशा सर्व व गोष्टी शोधून तिथे प्रत्यक्ष जाऊन गाडगेबाबा विज्ञाननिष्ठ पणे समजून घेऊन त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही चमत्काराची जोड न देता खरे गाडगेबाबा समजावून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले आहे. असे पुस्तक वाचनात आले पुस्तकाचं नाव आहे प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा लेखक - संतोष अरसोड पुस्तक वाचताना संत गाडगेबाबा यांचे पुरोगामी विचार समाजाला आजही कसे तारक आहे हे अतिशय साध्या सोप्या आणि सर्वसामान्य माणसाला कळेल अशा भाषेत लेखकाने मांडले आहे.


संत गाडगेबाबा यांना आधुनिक युगाचे संत म्हटले तरी वावगे ठरणार नाही कारण अतिशय विज्ञाननिष्ठ विचार ते आपल्या कीर्तनातून लोकभाषेत पोचवत.  

त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा यांचे जीवन चरित्र अतिशय विज्ञाननिष्ठ भाषेत मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला गेला आहे.

 गाडगेबाबा समजून घेण्यासाठी सर्वांनाच हे पुस्तक उपयोगी पडेल.

आज संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त जर आपण हे पुस्तक वाचले तर त्यांना आपली खरे अभिवादन ठरेल.. 

09623191923 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करून आपण हे पुस्तक सशुल्क घरपोच मागवू शकता.. 


धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.