दैवी आवाजच्या, गाणसम्राज्ञी, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर..

 दैवी आवाजच्या गाणसम्राज्ञी गानकोकिळा लता मंगेशकर


शब्दातीत दैवी देन लाभलेल्या, गानसम्राज्ञी, गाणकोकिळा, भारतरत्न, अनेक पिढ्यांना आपल्या आवाजाची भुरळ घालणाऱ्या लता मंगेशकर यांचे आज दिनांक 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले.


जर कोणी प्रश्न विचारला covid 19 आजारामुळे भारताने काय गमावले किंवा भारताची सर्वात मोठी हानी कोणती झाली? तर त्याचे उत्तर देताना प्रथम क्रमांकावर 'लता मंगेशकर यासारखं रत्न भारताला गमवावं लागलं' असं असेल.

गायक म्हणून तर त्यास उद्दिष्ट आहेच परंतु एक व्यक्ती एक माणूस म्हणून देखील त्या अद्वितीय अशा होत्या. अतिशय स्वच्छ अस मन निखळ नितळ हास्य आवाज यामुळे त्या सर्वांच्या आवडत्या होत्या भारतात त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण भारतभर दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे.

त्यांच्या जाण्यामुळे भारतीय संगीत क्षेत्रात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

पु. ल. देशपांडे म्हणतात "या जगात एकमेव अद्वितीय असं काही असेल तर ते चंद्र सूर्य आणि लतादीदींचा स्वर." त्यापुढे जाऊन ते असेही म्हणाले होते की जगात असा एकही एक क्षण नाही ज्या क्षणाला जगभरातील एखाद्या कानाकोपऱ्यात लतादीदींचा स्वर घुमत नसेल. आणि हे त्यांनी बोललेले बोल शब्दन शब्द खरे आहे याचा अनुभव आपण नेहमीच घेतो.

लतादीदींनी सर्वाधिक मराठी आणि हिंदी या भाषांमध्ये गायन केले व इतर भारतीय पस्तीस भाषांमध्ये सुद्धा त्यांनी गायन केले सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम देखील त्यांच्याच नावावर आहे. तब्बल 70 वर्ष सतत उच्च कोटीची गाणी भारतीय चित्रपटांसाठी जर कुण्या गायकांनी गायली असेल तर त्या लता मंगेशकर या होय.

एखाद्या क्षेत्रात तब्बल सत्तर वर्ष टिकून राहणे हे सोपे नाही. त्यासाठी तुमची त्या क्षेत्रासाठी असलेली त्याग वृत्ती, नित्य नवीन काहीतरी करण्याची तयारी, बदलणाऱ्या काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवून, नवीन गोष्टी शिकून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लागणारे प्रयत्न या सर्वांची आवश्यकता असते आणि लता दीदी मध्ये ते होते. म्हणून त्या सत्तर वर्ष एवढ्या दीर्घ कालावधीसाठी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवू शकल्या. त्या आपल्याला सोडून गेल्या असल्या तरी त्यांची गाणी ही नित्य आपल्या सोबत असतील आणि त्यामुळे त्या अजरामर आहेत.

अशा या संगीतकार संगीत निर्देशक आणि थोर अशा गायिका लता मंगेशकर यांना आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली!! धन्यवाद! 

pradipjadhao.com


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.