आजचा विद्यार्थी व त्याच्या समोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय

आजचा विद्यार्थी व त्याच्या समोरील आव्हाने

 आणि त्यावरील उपाय... 


आभासी दुनियेतील आव्हाने.. 

अत्याधुनिक साधने वापरण्या सोबतच नैसर्गिक साधने संवर्धित करण्याचं आव्हान.. 

व्यवसाय किंवा करिअर निवडण्याचे आव्हान.. 

स्वतःचा छंद/आवड जोपासण्याचे आव्हान...

सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेण्याचे आव्हान.. 

शाळेतील परिस्थितीशी जुळवून घेण्याचे आव्हान.. 

पालकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचे आव्हान.. 

 इतर बदलती आव्हाने..


चार्वाक या थोर तत्वज्ञाच्या मते ही जग क्षणभंगुर आहे. येथील प्रत्येक गोष्ट प्रत्येक क्षणाला नवीन निर्माण होते. मग जर असे असेल तर जग हे क्षणाक्षणाला बदलत असते हे आपण मान्य करायला हवे आणि ह्या बदलत्या जगात सोबतच आजच्या विद्यार्थ्यांच्या समोरील आव्हाने देखील बदललेली आहेत. ती आव्हाने कोणती याचा आपण सविस्तर विचार करून त्यावर कोणकोणत्या उपाययोजना विद्यार्थी हा पालक शिक्षक व तज्ञांच्या  मदतीने करू शकतो, यावर सविस्तर विचार करूया. सर्वप्रथम विद्यार्थ्यां समोरील बदलत्या आव्हाना बद्दल पाहूया... 


आभासी दुनियेतील आव्हाने.. 

काळानुसार वेळेनुसार आपल्या समोरील आव्हाने ही बदलत  असतात. इंटरनेट मुळे निर्माण होणारी आभासी आव्हाने या अगोदर नव्हती आणि पालकांना शिक्षकांना शाळांना विद्यार्थ्यांसाठीची ही आव्हाने नवीन आहेत याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून नेमकी आव्हाने कशी आहेत आणि त्यावर कोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात ही आव्हाने निर्माणच होऊ नये यासाठी कोणतीही पूर्व काळजी आपण घेऊ शकतो या संदर्भात विचार करणे ही काळाची गरज होऊन बसली आहे.

      वाढत्या इंटरनेट वापरामुळे आणि समाज माध्यमांच्या वापरामुळे विद्यार्थी आभासी जगामध्ये गुरफटून गेले आहेत.

विद्यार्थ्यांना खरी मित्र खूप कमी आणि आभासी जगातील मित्र खूप जास्त प्रत्यक्ष त्यांच्या आसपास उपस्थित असलेल्या कुटुंबातील सदस्यांसोबत त्यांचा संवाद कमी होत चालला आहे आणि आभासी जगातील मित्रांसोबत त्यांचा वेळ जास्त जातो.

प्रत्यक्ष मैदानावर खेळले जाणारे खेळ खूप कमी विद्यार्थी खेळतात परंतु मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मधील आभासी खेळ मात्र ते रात्रंदिवस खेळत असतात. 

 यामधून सायबर गुन्हेगारी अशा समस्यांचा उद्भव होत आहे.

प्रत्यक्ष संवाद कमी झाल्यामुळे मुलेही मानसिकरीत्या सक्षम होण्यासाठी होणाऱ्या आंतरक्रिया कमी झाले आहे आहेत किंबहुना त्या होत नाही त्यामुळे या प्रक्रियेतूनच मुले न गेल्या मुळे त्यांची मानसिक जडणघडण होण्याची प्रक्रियाच थांबली आहे मग आभासी दुनियेत जे पाहतो वाचतो ऐकतो हेच सत्य मानून मुले त्यांचे जीवन जगू लागली आहेत आणि मग जेव्हा प्रत्यक्ष एखाद्या संकटाला सामोरे जायचे असते तर मग त्यांची घाबरगुंडी उडते त्यांना ती परिस्थिती हाताळता येत नाही आणि मग टोकाचे निर्णय घेऊन विद्यार्थी मोकळे होतात अशी महत्त्वाची समस्या विद्यार्थ्यांसमोर व पालकांसमोर आजच्या घडीला उभी आहे.

अगदी सगळेच अनुभव विद्यार्थी आजच्या घडीला आभासी दुनियेतून घेत आहे या मागच्या पिढीने जे प्रत्यक्ष अनुभव त्यांच्या जीवनात घेतले त्या अनुभवांना आजचे विद्यार्थी मुकले आहेत.

शेतातील रानमेवा खाने मुक्तपणे कुठेही संचार करणे पोहायला जाणे झाडावर चढणे जंगलात जाऊन त्या-त्या ऋतूतील फळे खाणे एकमेकांशी भांडणे परत जुळवून घेणे असे अनेक अनुभव या मागच्या पिढीने घेतले आहे परंतु आताची पिढी मात्र टीव्ही मोबाइल कम्प्युटर लॅपटॉप या दुनियेत रममान झाली आहेत. आणि यामधून बऱ्याच नवीन समस्या त्यांच्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत. 

उपाय.... 

प्रत्यक्ष जीवन आणि आभासी जग यात मधील फरक शिक्षक व पालकांनी वेळीच विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यावे. 

प्रत्येक मित्र यांच्या सोबत राहण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे.

मैदानावर खेळण्याच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात याव्या.

सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस यांचा वापर मर्यादित प्रमाणात गरज असेल तेव्हाच करण्यात येईल याची दक्षता घ्यावी.

इंटरनेटवर कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नये याची सुस्पष्ट जाणीव शाळेत शिक्षकांनी आणि घरी पालकांनी विद्यार्थ्यांना करून द्यावी.

पालकांनी देखिल मुलां सामोर ही साधने कमी वापरावे.


अत्याधुनिक साधने वापरण्या सोबतच नैसर्गिक साधने संवर्धित करण्याचं आव्हान.. 

अत्याधुनिक साधने वापरण्यामुळे मनुष्याला शारीरिक श्रम कमी करावे लागतात जशी अगोदर आपण वाटण वाटण्यासाठी साठी पाटा-वरवंटा चा उपयोग केला जायचा परंतु आता प्रत्येक घरी मिक्सर किंवा फूड प्रोसेसरने त्याची जागा घेतली आहे. अर्थात या सर्व आधुनिक साधनांमुळे मानवी श्रम कमी झाले आहेत अतिशय कमी वेळात आपल्याला अपेक्षित काम पूर्ण होऊ शकते परंतु याचा वेगळा दुष्परिणाम म्हणजे श्रमाची कामे करण्याची सवय नसल्यामुळे शारीरिक क्षमता कमी झाली आहे. आणि हेच विद्यार्थ्यांसाठी देखील लागू होते या अगोदरच्या पिढीतील विद्यार्थी त्यांच्या आई-वडिलांना शेतात घरी ही श्रमाची कामे करण्यासाठी मदत करायची त्यामुळे त्यांची कार्य करण्याची शारीरिक क्षमता देखील टिकून राहायची परंतु आता ही सर्व कामे अत्याधुनिक साधनांच्या मदतीने अतिशय कमी वेळात आणि जलद गतीने होतात आणि यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेण्याची गरज पालकांना भासत नाही मग या कामांसाठी लागणारा वेळ पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा ही वाचतो. परंतु ही अत्याधुनिक साधने बनवण्यासाठी मनुष्य अतोनात निसर्गाची हानी करत आहे आणि मग निसर्गात झालेल्या बदलांमुळे मनुष्याला वेगवेगळ्या अनपेक्षीत नैसर्गिक संकटांना देखील तोंड द्यावे लागत आहे ही गोष्ट विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवी आणि कमीत कमी नैसर्गिक साधने वापरून किंवा नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करून त्या प्रमाणातच ही अत्याधुनिक साधने बनवणे कसे शक्य होईल याबद्दल विचार करूनच अत्याधुनिक साधने बनवावी याबद्दल देखील विद्यार्थ्यांनी विचार करणे गरजेचे आहे.

उपाय....

नैसर्गिक साधनांचा कमीत कमी वापर अत्याधुनिक साधने कशी निर्माण करता येतील याबद्दल विचार करावा.. 

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर यासारख्या उपाययोजना दिल्या जाऊ शकतात.

अत्याधुनिक साधने इको फ्रेंडली कसे बनवता येतील याकडे लक्ष देता येईल.

व्यायाम करणे प्रत्यक्ष मैदानावर घेणे यासारख्या गोष्टी शारीरिक क्षमता टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांकडून करून घेता येईल.



व्यवसाय किंवा करिअर निवडण्याचे आव्हान.. 

जगातील ज्ञानाच्या कक्षा अमर्याद अशा रुंदावलेल्या आहे आणि जसजशा ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या माणसाच्या गरजा वाढत गेल्या आणि गरज आणि मधन निर्माण झाल्या वेगवेगळ्या आणि अमर्याद अशा रोजगाराच्या संधी. रोजगाराच्या संधी जरी अमर्याद वाढल्या तरी त्या लगेच बदलणाऱ्या आहेत..  काही दशकांपूर्वी टेप रेकॉर्डर सारख्या साधनांचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर पाहिजे आणि ते दुरुस्त करणारे कारागीर देखील परंतु या कारागिरांनी स्वतःला बदलत्या जगा नुसार बदलत्या गरजा नुसार बदलून घेतले नाही तर आज कुणीही त्यांच्याकडे टेपरेकॉर्डर दुरुस्त करण्यासाठी जाणार नाही कारण टेपरेकॉर्डर ही गोष्ट कालबाह्य झाली आहे. प्ले म्हणजे जरी तुम्हाला तात्पुरता रोजगार मिळाला परंतु तो टिकवून ठेवण्यासाठी जगरहाटी बरोबर नियमित स्वतःला अपग्रेड करणेही महत्त्वाचे आहे ही गोष्ट विद्यार्थ्यांनी समजून घ्यावी हे सर्व सांगण्याची गरज कशासाठी वाटते की सध्याच्या परिस्थितीला अनुसरून विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात तो अभ्यासक्रम पूर्ण करतात परंतु काही वर्षा नंतर काही दिवसानंतर सदर अभ्यासक्रम आता जेवढा महत्त्वाचा वाटेल तेवढाच महत्त्वाचा राहील असे नाही म्हणूनच पुढील काही दशकांचा विचार करून विद्यार्थ्यांनी आताच अभ्यासक्रम निवडावा.

 वर सांगितल्याप्रमाणे रोजगाराच्या अमर्याद संधी विद्यार्थ्यांसमोर आज उपलब्ध आहेत परंतु कोणता रोजगार निवडावा हा प्रश्न मात्र विद्यार्थ्यांच्या समोर आव्हान म्हणून उभा आहे.

जास्त संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत त्या संधीचे ज्ञान मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांना नाही.म्हणून इंटरनेटच्या माध्यमातून तज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ह्या वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी माहीत करून घ्याव्या व आपल्या मतानुसार आपल्या आवडीनुसार जी रोजगाराची संधी योग्य असेल ती निवडावी. 

उपाय....

विद्यार्थ्याचा कल त्याच्या क्षमता नुसार उपलब्ध अभ्यासक्रम निवडून व्यवसाय निवडला किंवा अभ्यासक्रम निवडला तर ते त्याच्यासाठी योग्य राहील हे पालकांनी समजून घ्यावे.

तज्ञ व्यक्ती कलचाचणी घेऊन आपणा साठी कोणता अभ्यासक्रम व कोणता व्यवसाय योग्य राहील याचा सल्ला देतात त्यांचा सल्ला पण घेऊ शकतो.

जरी अमर्याद संधी उपलब्ध असल्या तरी आपण कुठलाही एक व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतो आणि एकच व्यवसाय करून प्रगती साधता येते "एक ना धड भाराभर चिंध्या असे होऊ नये."

स्वतःचा छंद/आवड जोपासण्याचे आव्हान...

अनेक पर्याय उपलब्ध नसल्यामुळे नेमकी आपली स्वतःची आवड किंवा छंद कोणता आहे? हेच आजच्या पिढीला समजत नाही. नेमका आपली स्वतःची आवड, स्वतः मध्ये असलेल्या उपजत क्षमता विद्यार्थ्यांना स्वतः कळत नाही. हे देखील एक मोठे आव्हान विद्यार्थ्यांच्या समोर आहे. मग आपली आवड, छंद, क्षमता ओळखून तो छंद, आवड कशी जोपासावी? याची ची माहिती देखील बऱ्याच विद्यार्थ्यांना नाही. आपली आवड, आपला छंद, आपल्या क्षमता यानुसार आपण कोणती साधने वापरून, कोणता अभ्यासक्रम पूर्ण करून, आपल्यासाठी योग्य असा व्यवसाय उद्योग नोकरी आपण कशी निवडावी? हे देखील आव्हान आजच्या विद्यार्थ्यांसमोर आहे. 

उपाय....

 छंद आवड जोपासून त्यासोबतच एखादा व्यवसाय करू शकतो आपला शाळा-महाविद्यालयातील अभ्यास देखील पूर्ण करू शकतो किंवा त्याला अनुसरून एखादा अभ्यासक्रम निवडू शकतो या सर्व शक्यता समजून घ्याव्यात.

यासाठी आपण एखाद्या तज्ञ व्यवसाय मार्गदर्शकांची किंवा समुपदेशकाची मदत घेऊ शकता.


सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेण्याचे आव्हान.. 

जसा काळ बदलत आहे माणसाची वर्तन बदलत आहे आजूबाजूचा समाज देखील बदलत आहे समाजाच्या चालीरीती समाजाचे रहन सहन एकमेकांची वागण्याची पद्धत या सर्व गोष्टी काळानुसार बदलत आहे आणि या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे हे देखील मोठे आव्हान विद्यार्थ्यांच्या समोर आहे उदाहरण द्यायचे झाल्यास संयुक्त पद्धती संयुक्त कुटुंब पद्धती बदलून विभक्त कुटुंब पद्धती समाज स्वीकारत आहे मग संयुक्त कुटुंब पद्धतीत असलेले फायदे यापासून विद्यार्थी मुकला आहे आणि विभक्त कुटुंब पद्धतीत असलेले तोटे यांचा सामना आजच्या विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. यामुळे नात्यात असलेली जवळीकता लोप पाऊ लागली आहे जेव्हा एखाद्याशी आपले महत्त्वाचे काम आहे अशाच वेळी एखाद्याशी जवळीक साधने आणि आपले काम संपले की त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हा सामाजिक ट्रेंड आता रुड झाला आहे आणि या फ्रेंड ला सामोरे जाण्याचं आव्हान देखील आजच्या पिढीसमोर आहे. 

उपाय....

पण बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतले नाही तर आयुष्य जगणे कठीण आहे. हे समजून द्यावे.

आयुष्यात वेगवेगळे प्रसंग येतात याप्रसंगी आपल्याला सामोरे जावे लागते हे देखील समजून घ्यावे.

आपल्याशी सलगी करणाऱ्या व्यक्तीचा उद्देश समजून घेऊन त्यानुसार त्याच्याशी वागणे योग्य असते हे देखील विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे.. 


शाळेतील परिस्थितीशी जुळवून घेण्याचे आव्हान.. 

बदलत्या काळानुसार शाळा देखील बदलल्या आहे. शाळेत नवनवीन आणि वेगवेगळे अभ्यासक्रम, नवीन साधने, नवीन विचारांचे शिक्षक, नवीन शिक्षण पद्धती, शाळांची वेगवेगळे माध्यम, शाळेतील वेगवेगळे शिक्षक, या सर्वांशी जुळवून घेण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर आहे.

उपाय....

पालक शिक्षक आपल्यासाठी काहीतरी योग्य करत आहे याची जाणीव ठेवावी.

 आपल्याला काही अडचण झाली तर पालक व शिक्षकांच्या मदतीने मनमोकळेपणाने बोलून ती अडचण सोडून घ्यावी. किंवा आपली नेमकी अडचण आहे हे त्यांना योग्य शब्दात समजून सांगा म्हणजेच ते उपाय करू शकतील.


पालकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचे आव्हान.. 

 आजचे पालक विद्यार्थ्यांना वेळोवेळी लागणाऱ्या सर्व गोष्टी कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध करून देतात त्यांच्या विचारामध्ये सर्वोत्तम शाळा अशी कोणती आहे त्या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी वाटेल ते करतात शाळांची अवास्तव वाढलेली  फी आटापिटा करून भरतात चांगल्यात चांगल्या शाळेमध्ये माझे पाल्य शिकेल यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न करतात आणि मग हे सर्व करत असताना मी माझ्या पाल्याने माझ्या मनात असलेले क्षेत्र निवडून त्यामध्ये यश प्राप्त करावे अशी देखील अपेक्षा पालकांची असते आणि या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांच्या समोर आहे.

काही पालक विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत टाकतात क्लासेस लावून देतात, त्यांना डान्स क्लासेस म्यूझिक क्लासेस चित्रकला क्लासेस स्पोर्ट /खेळ क्लासेस अशा वेगवेगळ्या क्लासेस फी भरून त्यांचा संपूर्ण दिवस धावपळीचा करून ठेवतात आणि या सर्व क्षेत्रात माझ्या पाल्याने काहीतरी केले पाहिजे अशी अपेक्षा ठेवतात आणि या अपेक्षांच्या ओझ्याखाली विद्यार्थी दबून जातात. अशा पालकांच्या अवास्तव इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचे आव्हान देखील विद्यार्थ्यांच्या समोर आहे.

उपाय....

पालकांनी विद्यार्थ्यांकडून अवास्तव नको त्या अपेक्षा न ठेवता त्यांची आवड त्याची क्षमता ओळखून त्याला अभ्यासक्रम आणि व्यवसाय निवडण्यासाठी मोकळीक द्यावी.

विद्यार्थी म्हणजे कच्चामाल की जो एखाद्या मशीन मध्ये टाकून त्याचा पक्का आपण तयार करून घेऊ शकतो अशी समज न बाळगता ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. हे पालकांनी समजून घ्यावे.

 इतर बदलती आव्हाने..

बदलत्या मित्रांचे आव्हान... 

बदलत्या स्पर्धात्मक युगाचे आव्हान.. 

सर्व साधने उपलब्ध नसल्याचे आव्हान.. 

 बदलत्या वयानुसार भावनात्मक आव्हाने.. 

अशा सर्व आव्हानांना सामोरे जाण्याचे आव्हान आजच्या विद्यार्थ्यांसमोर आहे.. 



अशा प्रकारची महत्त्वाची शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी गुगल सर्च करा www.pradipjadhao.com ला.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी भेट द्या आमच्या पुढील यूट्यूब चैनल ला.

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 

आपलाच

 प्रदिप जाधव 

राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.