दाखल खारिज वर धर्मांतरित बौद्ध यांचे जात व धर्माचे नोंदी बाबत अतिशय महत्त्वाचे पत्र..

 दाखल खारिज वर धर्मांतरित बौद्ध यांचे 

जात व धर्माचे नोंदी बाबत 

अतिशय महत्त्वाचे पत्र.. 


सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी श्रीमती वंदना कृष्णा, अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांना लिहिलेले अर्धशासकीय पत्र लिहिले आहे आणि या पत्राला अनुसरून त्यासोबत महाराष्ट्र गृह विभागाने अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध नागरिकांच्या पाल्यांना धर्म व जातीच्या नोंदी बाबत पत्र पाठवले व या सोबत सामाजिक न्याय व विशेष विभागाचे 22 जानेवारी 2019 च्या शासकीय प्रकराची प्रत सोबत पाठवलेली आहे. सदर पत्रात नमूद केल्याप्रमाणे सूचना आपल्या तसेच आपल्या अधिपत्याखालील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणाव्या ही विनंती देखील गृह विभागाचे कक्ष अधिकारी हरेश्वर सहाणे यांनी केली आहे.


वरील पत्रात सामाजिक न्याय न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तोडगे विनंती करतात महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेत विशेषता अनुसूचित जातीतून धर्मांतरीत बौद्ध नागरिकांच्या मुलांची नावे पहिल्या वर्गात दाखल करताना त्यांच्या धर्म व जातीची नोंदणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने केली जात असल्याची तसेच धर्म बौद्ध सांगितला तर जात लिहिता येणार नाही आणि अनुसूचित जाती लिहायचे असेल तर धर्म हिंदूच लिहावा लागेल अशा प्रकारे पालकांना आग्रह केला जात असल्याची तक्रार प्राप्त झाली असून त्या त्या अनुषंगाने सर्व सरकारी अनुदानित विनाअनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांनी बालवाडी पहिल्या वर्गात मुलांचा प्रवेश किंवा नाव नोंदणी करताना विशेषतः अनुसूचित जातीतून धर्मांतरीत बौध्द पालकांनी सांगितलेल्या धर्माचे नाव धर्माच्या रकान्यात नोंद करावे व अनुसूचित जातीचे नाव जातीच्या राखण्यात नोंद करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.

भारतीय घटनेच्या कलम 321 नुसार अनुसूचित जाती संबंधी घटना अध्यक्ष 1950 च्या परीक्षेत तीन नुसार केवळ हिंदू किंवा वैदिक धर्मियांना अनुसूचित जातीचे समजले जाऊ शकत होते तथापि अनुसूचित जाती मधून बौद्ध धर्मांत तरी त्यांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा या हेतूने केंद्र शासनाने घटना आदेश कायदा 1990 दिनांक 13 जून 1990 अन्वये घटना अनुसूचित जाती आदेश 1950 मध्ये सुधारणा करून अनुसूचित जाती संबंधित घटना आदेश बौद्ध धर्मियांना ही लागू करण्यात आला आहे त्यानुसार अनुसूचित जाती ची यादी हिंदू शीख आणि बौद्ध धर्मियांना लागू झालेली आहे त्यानुसार अनुसूचित जाती मधून बौद्ध धर्मात धर्मांतर केलेल्या लोकांना अनुसूचित जातीचे समजण्या बाबत 8 नोव्हेंबर 1990 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता अनुसूचित जातीची यादी हिंदू शीख आणि बौद्ध धर्मियांना लागू झालेल्या असल्याने बालवाडी किंवा पहिल्या वर्गात मुलांचे प्रवेश किंवा नाव नोंदणी करताना विशेषता अनुसूचित जातीतून धर्मांतरीत बौध्द पालकांनी सांगितलेल्या धर्माचे नाव धर्माच्या रकान्यात व अनुसूचित जातीचे नाव जातीच्या राखण्यात नोंद करणे बाबत सर्व सरकारी अनुदानित विनाअनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना आपल्या स्तरावरून आवश्यक सूचना करण्यात याव्यात.


सदर पत्र हे शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णा यांना उद्देशून लिहिलेले असून इतर सर्व प्रशासकीय कार्यालय यांनादेखील हे पत्र पाठवण्यात आले आहे.


हे संपूर्ण पत्र पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.. 

Download



अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.