चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत Tenses - Present Perfect Tense (पूर्ण वर्तमान काळ)

 Present Perfect Tense 

(पूर्ण वर्तमान काळ)

वर्तमान काळात क्रिया पुर्ण झाली हे दर्शवण्यासाठी वाक्यात पूर्ण वर्तमान काळ वापरला जातो..

Perfect present tense is used to show the complete action in present.


पूर्ण वर्तमान काळात क्रिया पुर्ण झाली हे दर्शवण्यासाठी वाक्यात क्रियापदाचे पूर्ण रुप perfect form किंवा त्यालाच क्रियापदाचे तिसरे रुप हे देखील म्हटले जाते आणि त्याला मदतीसाठी सहाय्यकारी क्रियापद म्हणुन Have/Has वापरले जाते.

Iwe या प्रथम पुरुषी कर्त्यासमोर व you या द्वातिय पुरुषी कर्त्या समोर आणि तृतीय पुरुषी अनेकवचनी कर्त्यासमोर have हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते.


तर तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यासमोर अर्थात he, she, it या व सर्व एकवचनी नामासमोर has हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते.


क्रियापदाची रूपे 👇

मुळ रुप           भुतकाळी रुप          पूर्ण रुप

Do                   did                 done 

Go                Went                 gone

Take                took                 taken

Drink              drunk            drunken

Read                 read                     read

जर आपण present perfect tense चे सूत्र तयार करायला गेलो तर ते पुढील प्रमाणे होइल

S + have/has + mv3 + o + c + .


उदा...

विशालने सकाळी दूध पिले आहे.

Vishal has drunken milk.


मी ते पुस्तक वाचलेले आहे.

I have read the book.


त्यांनी पत्र लिहिलेले आहे.

They have written a letter.


तुम्ही तयार झालेले आहे का?

Have you been ready?


त्याने त्याचा विचार केलेला आहे का?

Has he thought about that?


विजयने कधीच मांसाहार केलेला नाही.

Vijay has not eaten non veg ever.


वरील प्रमाणे पूर्ण वर्तमान काळात तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्या (नामां)समोर has हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते, तर इतर कर्त्यांसामोर have हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते.

पूर्ण काळात क्रिया पुर्ण झाली हे दर्शवण्यासाठी क्रियापदाचे पूर्ण रुप म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रुप वापरले जाते.


विद्यार्थ्यांसाठी सूचना..

वरीलप्रमाणे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य तयार करून पहा. व केलेली वाक्य अपल्या शिक्षकांना दाखवा अथवा मला फोटो काढून 9765486735 या whatsapp नंबर वर मेसेज करून पाठवा.

संपुर्ण इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून शिकण्यासाठी नियमीत भेट द्या pradipjadhao.com ला..


संपुर्ण tenses मराठी माध्यमातून शिकण्यासाठी Google search करा pradipjadhao.com  


धन्यवाद!!

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.