नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! - Happy New Year!!

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! 

 Happy New Year!! 


बघता बघता 2021 हे वर्ष कोरोना च्या सावटाखाली आणि लसीकरणाच्या आशावादाने हे वर्ष सुरू झालं या वर्षात बरेच चढउतार होत बऱ्यापैकी लसीकरण देखील पूर्ण झाले परंतू पुन्हा ओमीक्रोन या COVID च्या नवीन विषाणू देखील या वर्षाने आपल्या समोर वाढुन ठेवला आहे. आत वेळच ठरवेल की तो पुन्हा जग ठप्प करतो की, पुन्हा जनजीवन सुरळीत सुरू होते..

पुढे काहीही वाढुन ठेवले तरी आपण कोणत्याही परस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहणे हेच आपल्या हातात आहे.

कुठल्याही उन्माद साजरा करण्यापेक्षा आपण सर्वांचे जीव सर्वात महत्वाचे आहेत हे लक्षात ठेवूनच आपले वर्तन असेल हीच आपण सर्वांकडून अपेक्षा.

मानव जातीचा इतिहास पाहता मानवाने आजपर्यंत आलेल्या सर्व संकटांना परतवून लावले आहे आणि हे संकटही आपण सर्व मिळून परतवून लावूया!

अनंत अमुची ध्येयासक्ती! अनंत अमुच्या आशा!! 

किनारा तुला रे पामरा!

ही काव्यपंती नक्किच पुन्हा पुन्हा आठवते..


सरते शेवटी असे म्हणावे वाटते...

सरत्या वर्षाच्या गोड कडू आठवणीची शिदोरी घेवून,

काय मिळवले; काय गमावले; 

मिळवताना साठीचे अथक प्रयत्न तर का गमवावे लागले त्याची कारणमीमांसा तून मिळालेली शिकवण,

यांची आठवण ठेवून पुढील वर्षात आनंदाने पाऊल ठेवूया ...

"नवीन वर्ष सुख समृध्दी आनंदाचे भरभराटीचे आरोग्यदायी जावो ही प्रभूचरणी प्रार्थना !!!"

नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ..!


आपलाच...

प्रदिप जाधव

pradipjadhao.comPost a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.