चला शिकूया इंग्रजी भाषा - Part of Speech - Pronoun

आज आपण चला शिकूया इंग्रजी भाषा अंतर्गत (Pronoun) सर्वनामा विषय अधिक माहिती घेणार आहोत.

2) Pronoun - सर्वनाम

नाम किंवा नाम म्हणुन वापरलेल्या शब्दसमुहा ऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. उदा. तो, ती, मी, तू, तुम्ही, ते, त्या ई.

A word that is used instead of a noun or noun phrase is called Pronoun. For example. He, she, it, you, they etc.

जर नामाचा उल्लेख अथवा ओळख आगोदरच झालेला असेल अशा वेळी ते संपुर्ण नाम/नाम म्हणुन वापरलेला शब्दासमुह पुन्हा पुन्हा न वापरता त्याऐवजी आणि त्याबद्दल सर्वनाम वापरले जाते

Pronouns refer to either a noun that has already been mentioned or to a noun that does not need to be named specifically.

सर्वनामाची तीन विभागात विभागणी केली जाते.

१) प्रथम पुरुषी  - First Person

I आणि We हे इंग्रजीतील प्रथम पुरुषी सर्वनामे आहे कर्ता म्हणुन ते जसेच्या तसे येतात परंतु जर ते कर्म म्हणून आले तर त्यांची द्वितीया me व us हे वापरले जातात.

I हे प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे तर we हे प्रथम पुरुषी अनेकवचनी सर्वनाम आहे.

२) द्वितीय पुरुषी - Second Person

You हे सर्वनाम द्वितीय पुरुषी सर्वनाम आहे ते एकवचनी आणि अनेक वचनी दोन्ही साठी वापरले जाते, कर्म म्हणून वापरण्यासाठी देखील त्याची द्वितीया देखील you हीच आहे.

३) तृतीय पुरुषी - Third Person

He, she, it ही एकवचनी तृतीय पुरुषी सर्वनामे आहेत, वाक्यात कर्म म्हणून त्यांच्या द्वितीया him, her, it ह्या वापरल्या जातात तर they हे तृतीय पुरुषी अनेकवचनी सर्वनाम आहे, ते वाक्यात कर्म म्हणून वापरण्यासाठी त्याची द्वितीया them ही वापरली जाते.

या व्यतिरिक्त प्रश्नार्थक सर्वनामे म्हणून which, what, who, whose, whom हे सर्व ओळखली जातात. प्रश्न विचारण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. यांना इंग्रजीत Introgative pronoun असे म्हणतात.

दर्शक सर्वमनामे म्हणून this, that, these आणि those ही आहेत.  यांना इंग्रजीत demonstrative Pronoun असे म्हणतात.

Possessive pronouns म्हणुन mine, ours, his, hers, theirs, ही सर्वनामे ओळखली जातात.


Everybody, either, none, and something हे अनिश्चित सर्वनामे आहेत यांना इंग्रजीत Indefinite pronouns असे म्हणतात.

Reflexive pronouns हे possessive pronouns यांना self किंवा selves जोडून तयार होतात उदा. myself, herself, ourselves, and itself.

वरील प्रमाणे सर्वनाम आणि त्याचे प्रकार आहेत.

यानंतरच्या पोस्ट मध्ये आपण verb ह्या सर्वात महत्वाच्या part of speech बद्दल सविस्तर माहिती पाहू.....


धन्यवाद!

Post a Comment

3 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.