चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत - Present Progressive/Continues Tense
(अपूर्ण/चालू वर्तमान काळ)
वर्तमान काळात क्रीया किंवा एखादी घटना घडत आहे..
घटना/क्रिया प्रक्रियेत आहे. पूर्ण झाली नाही असे दर्शवण्यासाठी अपूर्ण/चालू वर्तमान काळ Progressive/Continues Present Tense वापरला जातो.
क्रिया घडत आहे असे दर्शविण्यासाठी इंग्रजी वाक्यात to be च रुप आणि क्रियापदाला ing प्रत्यय लागतो.
वर्तमान काळात am, is, are ही to be ची रूपे आहेत.
I या कर्त्यासमोर am हे वापरले जाते.
एकवचनी सर्व कर्त्यांसमोर is तर..
अनेकवचनी कर्त्यांसमोर are हे to be चे रुप सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते.
जर आपण present progressive tense चे सूत्र तयार करायला गेलो तर ते पुढील प्रमाणे होइल
S + am/is/are + mv+ing + o + c + .
उदा.
१)मी दूध पित आहे.
1)I am drinking water.
२)प्रमोद बस ने कार्यालयात जात आहे.
2)Pramod is going to office by bus.
३)सर्व विद्यार्थी गाणे गात आहे.
3)All students are singing song.
काही विद्यार्थी अभ्यास करत नाही आहे.
Some students are not studying.
वरील पहिल्या वाक्यात I समोर am हे सहाय्यकारी क्रियापद वापरले आहे व drink ला ing प्रत्यय लागला आहे.
दुसऱ्या वाक्यात Pramod या एकवचनी कर्त्यासमोर is हे सहाय्यकारी क्रियापद वापरले आहे.
तिसऱ्या वाक्यात All students या अनेकवचनी कर्त्यासामोर are हे सहाय्यकारी क्रियापद वापरले आहे.
वरील सर्व वाक्य हे विधानात्मक वाक्य आहे...
१)मी दूध पित आहे का?
1)Am I drinking water?
२)प्रमोद बस ने कार्यालयात जात आहे का?
2)Is Pramod going to office by bus?
३)सर्व विद्यार्थी गाणे गात आहे का?
3)Are all students singing song?
वरील वाक्य ही प्रश्नार्थक वाक्य आहेत..
महत्वाचे...
क्रियापदाला ing प्रत्यय लावतांना जर क्रियापदाचा शेवट व्यांजनाने झाला तर त्यानंतर लगेच लागून ing प्रत्यय लागतो.
उदा. Drink - drinking, sing - singing
क्रियापदाचा शेवट e ने झाला तर e वगळून त्या क्रियापदाला ing प्रत्यय लागतो.
उदा. Make - making, take - taking, bake - baking etc.
विद्यार्थ्यांसाठी सूचना..
वरीलप्रमाणे अपूर्ण वर्तमान काळातील वाक्य तयार करून पहा. व केलेली वाक्य अपल्या शिक्षकांना दाखवा अथवा मला फोटो काढून 9765486735 या whatsapp नंबर वर मेसेज करून पाठवा.
सर्व tenses सविस्तर शिकण्यासाठी नियमीत भेट द्या pradipjadhao.com ला..
किंवा Google search करा pradipjadhao.com
धन्यवाद!

7 टिप्पण्या
Thanks sir
उत्तर द्याहटवाWelcome 🙏
हटवाShailesh jadhav
उत्तर द्याहटवाShailashjadhav
उत्तर द्याहटवाAnmol datta uike
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाThank you🙏
हटवा