नवोदय प्रवेश परीक्षा - जाहीर आवाहन - सुवर्ण संधी - संपूर्ण माहिती

 **जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, इयत्ता पाचवी प्रवेशासाठी सुवर्ण - संधी**


अर्ज करण्यासाठी येथे👉 Click करा

घरीच मोबाईल वरुन अर्ज कसा करायचा हे पाहण्यासाठी

👉 येथ Click करा 🙏


वर दिलेल्या लिंक वर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी यासाठी ऑनलाइन फॉर्म उपलब्ध आहेत. कृपया ज्यांचे पाल्य इयत्ता पाचवी मध्ये शिकत आहेत त्यांनी आपल्या पाल्यांना या स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी करून भविष्य उज्वल करण्याची एक संधी उपलब्ध करून द्यावी. 

घरीच आपल्या मोबाईल वरुन अर्ज कसा करावा यासाठी पहा👇आज शिक्षण ही प्राथमिक गरज आहे. 14 वर्ष वयापर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण सुविधा उपलब्ध असतानाही शिक्षण घेण्यासाठी  प्रायव्हेट, पब्लिक स्कूल, कॉन्व्हेंटस हे भरमसाठ फी घेतात. असे असले तरी दर्जेदार शिक्षणाची हमी मात्र मिळेलच असे नाही. जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश झाल्यानंतर  शिक्षण विषयक साहित्य, गणवेश (युनिफॉर्म, ट्रॅक सूट, जोडे, चप्पल) होस्टेलमध्ये राहण्याची सुविधा, जेवण, संपूर्ण शैक्षणिक साहित्य, पुस्तके - वह्या,  स्टेशनरी साहित्य, डेली युज मटेरियल(साबण, टूथपेस्ट यासारखे), खेळाचे साहित्य व मुलांना लागणा-या सर्व सुख सुविधांचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार (नवोदय विद्यालय समिती) उचलते.  


नवोदय विद्यालय हे CBSE अभ्यासक्रम असलेली अद्ययावत इमारत, छात्रावास, भव्य क्रीडांगण आणि विस्तीर्ण शालेय परिसर असलेली, आरोग्यदायी, शैक्षणिक वातावरण असलेली भूमी (गुरुकुल)आहे. 


जवाहर नवोदय विद्यालय ही संपूर्ण भारतात सर सर्वोच्च रिझल्ट देणारी संस्था ही "शिक्षणाचा मानदंड" ( Brand Name In Education) प्राप्त संस्था आहे. त्यामुळे येथे शिक्षण घेणे हे अभिमानास्पद आणि भूषणावह बाब आहे. 


येथून शिक्षण प्राप्त केलेले असंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उच्चपदस्थ अधिकारी आहेत. ते देशाचा गौरव वाढवीत आहेत. देशाचे नेतृत्व जगभरात करीत आहेत. अशीच आकाश - भरारी आपले पाल्य घेतील ही आशाच नाही तर विश्वास आहे. तेव्हा......


आपल्या पाल्यास आणि या परिसरातील होतकरू, गरीब, मागास वर्गीय अथवा कोणत्याही गटात बसणाऱ्या इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना कृपया आपल्या माध्यमातून ही माहिती कृपया सांगा.🙏 


नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची माहिती सर्वांना द्या. हे एक पवित्र कार्य आहे. आपण  मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सर्वांगीण विकासात सहकार्य करून योगदान द्याल  ही विनंती. असे करणे हे महान देश कार्य करण्यासारखे आहे. 


आम्ही म्हणजेच जवाहर नवोदय विद्यालय, हे आपल्या पाल्याच्या इयत्ता सहावी पासून बारावी पर्यंतच्या शिक्षण, राहणे, खाणे आणि सर्वांगीण विकास यासाठी अविरत 1986 पासून झटत असून शिक्षणाचे पवित्र कार्य यासाठी प्रतिबदध आहोत, यापुढेही कायम हे कार्य आम्ही करूच पण त्यासाठी आपले सहकार्य अपक्षित आहे.


भारतभरातील सर्व राज्यांमधील प्रत्येक जिल्ह्यांमधून इयत्ता पाचवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही निवड - चाचणी परीक्षा दरवर्षी नित्यनेमाने घेण्यात येते. तरी सर्व पालकांनी, या गोष्टीची दखल घेऊन, आपल्या पाल्यांना एक सुवर्णसंधी उपलब्ध करून द्यावी.  अशी आमची जवाहर नवोदय विद्यालय या संस्थेतर्फे आणि नवोदय विद्यालय समितीतर्फे आपणास 🙏जोडून विनंती. 


नवोदय विद्यालयाचे आजी आणि माजी विद्यार्थी, पालक बंधू-भगिनी,  प्राथमिक शाळांचे शिक्षक, शिक्षिका आणि ग्रामस्थांना आम्ही जाहीर आवाहन करतो की, त्यांनी या परीक्षेकरिता आपल्या परिसरातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना या निवड चाचणी परीक्षेसाठी फॉर्म भरण्यास प्रेरित करावे. आपणा सर्वांकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. आपले सहकार्य वेळोवेळी लाभत आले यापुढेही असेच लाभेल ही अशा आणि दृढ विश्वास आहे. कारण आजचा विद्यार्थी उद्याची आशा आहे. देशाचे भविष्य आहे.


ता. क.....

चाचणी प्रवेश परीक्षेकरता फॉर्म भरण्याची अंतिम तिथी 31/11/2021 असून ती पुढे ढकलली गेल्यास सूचित केले जाईल.


Post a Comment

0 Comments