The Second Thought - दुसरा विचार - एक चिंतन

 The Second Thought - दुसरा विचार - एक चिंतन

     चार मित्र एका मित्राच्या घरी गप्पा मारत बसले होते. एका मित्राच्या मुलाचा पहिला वाढदिवस जवळ आला होता त्यामुळे त्याचा वाढदिवस कसा साजरा करावा यावर चर्चा सुरू झाली. पहिला विचार समोर आला 'वाढदिवस हा धूमधडाक्यात साजरा झाला पाहिजे अरे एकुलता एक मुलगा आहे तुला!' आता धुमधडक्यात म्हणजे काय हे वेगळं सांगायची गरज नाही.

    तेवढ्यात एका विचारी मित्राने दुसरा विचार मांडला "त्यापेक्षा अस करतो का जवळच एक अनाथाश्रम आहे. आपण तूझ्या मुलाचा वाढदिवस तिथे साजरा करूया."

   मोहन त्याची गाडी घेऊन बाहेरगावी काहीतरी कामासाठी जात होता. आरामात सर्व नियम पाळून आपल्या बाजूने तो त्यांची गाडी चालवत होता. तेवढ्यात एक भरधाव गाडी त्याला कट मारून गेली अर्थात पहिला विचार 'काय काम असतं यांना किंवा दोन चार शिव्या तर नक्कीच'. आणि दुसरा विचार "गाडीत एखादा गंभीर रुग्ण तर नसेल ना?"

    रोहित बारावीत नापास झाला तो खूप प्रयत्न करायचा की अभ्यास करावा परंतु विज्ञान शाखा त्याला समजण्यास जड गेली परिणामी तो परीक्षेत अपयशी ठरला त्याचे सर्व मित्र पास झाले आजूबाजूचे शेजारी पास झाले आणि हा एकटाच नापास झाला त्याच्या डोक्यातील पहिला विचार 'आपण काही कामाचे नाही मला जगण्याचा काही हक्क नाही आत्महत्या करणे हा एकच विचार' पण थोडा विचार केला तर दुसरा विचार "आईवडिलांचे काय? त्यांना काय वाटेल?" 

    आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असे अनेक प्रसंग येतात ज्यावेळी आपली मनात लगेच जे विचार येतात. एखाद्या घटनेवर जेव्हा आपण लगेच प्रतिक्रिया देतो ती बहुदा खूप विचार करून दिलेली नसते. ती जसे आपल्या प्रतिक्षिप्त क्रिया असतात त्या प्रमाणे ती असते. सर्वसामान्य माणूस त्यावरच थांबून त्यावर क्रिया करतो. पण असामान्य व्यक्ती डोकं शांत ठेवून त्यावर पुन्हा विचार करतात आणि मग दुसऱ्या विचारावर कृती करतात. आणि जे दुसऱ्या विचारावर कृती करतात त्यांच्या जीवनात ते यशस्वी होतात. समाजात ते आपलं वेगळं स्थान निर्माण करतात. जर न्यूटन ने पडलेले सफरचंद खाऊन टाकले असते आणि घरी गेला असता तर नक्कीच गुरुत्वाकर्षण शक्ती चा शोध लागला नसता. जर अब्राहम लिंकन यांनी निराश होऊन प्रयत्न सोडले असते तर ते एक दिवस अमेरिके सारख्या बलाढ्य राष्ट्राचे राष्ट्रपती होऊच शकले नसते. अशा बऱ्याच गोष्टींना हे लागू पडते.

     तर चला आजपासून, या दिवाळीपासून संकल्प करूया आणि the second thought वर विचार करून योग्य कृती करूया!

धन्यवाद!

     


          

मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना
अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना।
कोणती ना जात ज्यांची, कोणता ना धर्म ज्यांना,
दुःख ओले दोन अश्रू, माणसांचे माणसांना।।

_या विंदांच्या काव्य ओळींप्रमाणे सर्वांची दिवाळी तेजोमय होवो...अंधारात असलेल्यांना उजेडाची तिरीप लाभो..हीच सदिच्छा.._

शुभ दीपावली

आपलाच

प्रदिप जाधव
🙏🙏🙏🙏🙏
Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.