क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले - त्यांचे विषयी अधिक माहिती

 क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले

यांना विनम्र अभिवादन!


महात्मा जोतिबा फुले त्यांचा मुलगा यशवंत सोबत.

काही लोक जशी परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारून आपले जीवन जगतात परंतू काही लोक सर्व गोष्टी आपल्या बुद्धीच्या कसोटीवर पडताळून घेतात जे जे अयोग्य आणि अनिष्ट आहे त्याला कडाडून विरोध करतात आणि समाजासाठी मानव जातीच्या कल्याणासाठी योग्य गोष्टींची सुरवात करतात यापैकी एक दाम्पत्य ज्यांनी महाराष्ट्राच्या भूमीवर जन्म घेतला आणि बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली करून सर्वांना शिक्षण हा मूलभूत हक्क असल्याची जाणीव करून दिली.

फक्तं पुरुषांनीच शिक्षण घेतलं तर तरीही अर्धा समाज शिक्षणापासून वंचित राहील याची जाणीव त्यांना होती त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना स्वतः घरी शिकविले आणि त्यांच्या मदतीने मुलींसाठी महाराष्ट्रात पहिली शाळा सुरू केली.

त्यांच्या विचारांची बैठक एवढी प्रगल्भ होती की त्यांना मरण्यासाठी आलेले मारेकरी देखील त्यांचे अनुयायी बनले.

बहुजन लोकांनी स्वतः हून त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली.

अशा या क्रिंतीसुर्यास विनम्र अभिवादन!🙏


Post a Comment

2 Comments

  1. Incredible thoughts of Krantisurya Mahatma Phule.🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👏👏we must have implement it.

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.