स्पर्धा- शिक्षक, विद्यार्थी आणि पालक

 नमस्कार मित्रांनो,

(खूप दिवसानंतर ब्लॉगवर पोस्ट टाकतोय यासाठी आपण सर्वांची माफी मागतो.)

मित्रहो आपल्याला आठवत असेल अभ्यासक्रमात एक गांधीजींच्या जीवनातील प्रसंग आपण सर्वांनी वाचलेला आहे. की एक आई आपल्या मुलाला गांधिजीकडे घेऊन येते आणि सांगते की हा खुप साखर खातो तूम्ही याला साखर न खाण्याबाबत समजाऊन सांगा तेंव्हा गांधीजी त्या आईला काही दिवसांनी परत येण्याचे सांगतात. जेंव्हा काही दिवसांनी परत ती आई आपल्या मुलाला घेऊन येते तेंव्हा गांधीजी त्या मुलाला सांगतात की 'हे बघ बाळ जास्त साखर खाणे ही चांगली गोष्ट नाही तू साखर खात जाऊ नको' आता यात काही विशेष गांधीजींनी सांगितलेले नसते. त्यामुळे ती आई न रहाऊन गांधीजींना विचारते की हे तर तूम्ही याला त्याच दिवशी सांगू शकत होते. मग आम्हाला नंतर का बोलाविले. त्यावर गांधीजी त्या आईला सांगतात की मी देखील तेंव्हा साखर खात होतो जर मी स्वतः साखर खात असेल तर मला तुमच्या मुलाला साखर न खाण्याचा सल्ला देण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. मी गेल्या काही दिवसांपासून साखर खाणे बंद केले त्यामुळे आज मी त्याला साखर न खाण्याचा सल्ला देत आहे.

   आपण विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना नुसते सांगतो की खूप स्पर्धा आहे जीवनात यशस्वी व्ह्यायचे असेल तर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हा.

    आणि आपणच स्वतः शिक्षक आणि पालक म्हणून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याचे टाळतो. शिक्षणतज्ञांच्या मतानुसार "मूल/विद्यार्थी तेच करतो/शिकतो जे तूम्ही करतात ते नाही जे तुम्ही त्याला सांगतात" विद्यार्थी हे तुमच्या कृतीतून शिकतात नव्हे तर ते तुमचं अनुकरण करतात. मग जर आपण आपल्या भावी पिढी बद्दल विचार करत असू तर नक्कीच शिक्षक आणि पालक यांच्यात योग्य वर्तन बदल होणे गरजेचे आहे.

    आत्ताच ऑगस्ट महिन्यात आयोजीत एका बहुराष्ट्रीय कंपनीने आयोजीत केलेल्या स्पर्धेत घेतलेला सहभाग असो की यवतमाळ जिल्ह्यात असतांना आगोदर विद्यार्थ्यांची भाषा मी स्वतः त्यांना आगोदर शिकून दाखवली त्यांच्याशी बोलून दाखवली आणि त्यानंतरच त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषा शिकण्यास प्रवृत्त करणे असो या कृती मागील उद्देश हाच होता की विदर्थ्यांना आगोदर करून दाखवणे आणि नंतर त्यांना ते करण्यास प्रवृत्त करणे. जर मी स्वतः धूम्रपान करत असेल तर मला विद्यार्थ्यानां धूम्रपान करु नका हे सांगण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे माझे स्पष्ट मत आहे. बाकी आपण सुज्ञ आहात.

धन्यवाद!🙏

Post a Comment

14 Comments

  1. खूपच छान विचार

    ReplyDelete
  2. Good assessment pradip sir. Thanku🙏

    ReplyDelete
  3. सर तुम्ही शिक्षणावर छान लिहिता.. सातत्याने लिहित चला...आपले अभिनंदन.. जरूर भेटू या.. नरेंद्र लांजेवार बुलडाणा

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you!
      नक्कीच भेटूया..
      याआगोदर आपले फोनवर बोलणे झाले आहे!

      Delete
  4. लिहीत रहा सर

    ReplyDelete