भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा रद्द करणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी पुढील प्रमाणे शासन आदेश निर्गमित केला आहे.
भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा रद्द करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
शासन निर्णय क्र. विश्वको-२०२५/प्र.क्र.१२८/भाषा-२
मराठी भाषा विभाग
नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक : ३१ ऑगस्ट, २०२६
वाचा :-
१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. हिंभाप १९७६-२८, दि. १० जून, १९७६
२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. हिंभाप १०८०/१३१-वीस, दि. २५ मे, १९८१
३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. हिंभाप १०८१-३०५-वीस, दि. २१ जून, १९८२
४) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. हिंभाप-१०८२/१८९६/प्र-४१३/वीस, दि. २२ नोव्हेंबर, १९८२
५) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. हिंभाप-१०८३/१४४८/वीस, दि. १ डिसेंबर, १९८४
६) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. हिंभाप-१०८५/६८४/२०, दि. १९ नोव्हेंबर, १९८५
७) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. हिभाप-१०९२/१३०६/(प्र.क्र.१२९/९२)२०, दि. १६ नोव्हेंबर, १९९२
प्रस्तावना :-महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी तत्कालीन मुंबई सरकारने शासकीय प्रयोजनांसाठी हिंदी भाषेचा वापर करण्याच्या दृष्टीने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले होते. मात्र, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर, सर्व शासकीय प्रयोजनांकरिता मराठी भाषेचा वापर केला जात आहे. महाराष्ट्र राजभाषा अधिनियमातील तरतुदी आणि सद्यःस्थितीतील शासकीय कामकाजाचे स्वरूप विचारात घेता, हिंदी भाषा परीक्षा लागू ठेवणे संयुक्तिक नाही. शासनाच्या कामकाजात हिंदी भाषेचा वापर अत्यंत नगण्य असून, केंद्र सरकार व इतर राज्यांशी होणारा पत्रव्यवहार प्रामुख्याने इंग्रजी भाषेत केला जातो. ही वस्तुस्थिती विचारात घेता, भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय : भाषा संचालनालयाद्वारे घेण्यात येणारी (पुर्वीच्या एतदर्थ मंडळाद्वारे घेण्यात येणारी) हिंदी भाषा परीक्षा रद्द करण्यात येत आहे.
हिंदी भाषा परीक्षेसंदर्भात आतापर्यंत निर्गमित करण्यात आलेले संदर्भाधीन शासन निर्णय तसेच, तत्संबंधित निर्गमित इतर सर्व शासन निर्णय, परिपत्रके, आदेश, शासनपत्र या शासन निर्णयाद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहेत.
सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी हिंदी भाषा परीक्षेस स्थगिती दिल्याच्या दिनांकापासून, दिनांक ०७.०५.२०२६ पासून करण्यात येईल.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२६०८३११८२२४५२४३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
VAISHALI LAHU WAGHMARE
(वैशाली वाघमारे)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन
प्रत,
१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव
२. मा. सभापती महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
३. मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
४. मा. विरोधी पक्ष नेते, विधानपरिषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
५. सर्व सन्माननीय विधानपरिषद/विधानसभा सदस्य.
६. मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
७. मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास, गृह निर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
८. मा. उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन व राज्य उत्पादन शुल्क) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
९. सर्व मा. मंत्री / राज्यमंत्री, मंत्रालय, मुंबई यांचे खाजगी सचिव
१०. मा. मंत्री, मराठी भाषा यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
११. मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
१२. मा. अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग
१३. सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
१४. प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई (पत्राने),
१५. प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई (पत्राने).
१६. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई (पत्राने) १७. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानपरिषद / विधानसभा, विधानभवन, मुंबई.
१८. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने)
१९. महालेखापाल, (लेखापरीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई.
२०. महालेखापाल (लेखापरीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, मुंबई.
२१. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
२२. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
२४. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
२३. अध्यक्ष, नाषा सल्लागार समिती
२५. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई.
२६. सह सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
२७. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
२८. भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई
२९. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई
३०. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई.
३२. निवडनस्ती (भाषा-२)
३१. सर्व अवर सचिव/ कक्ष अधिकारी, मराठी भाषा विभाग, मंत्रालय
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.



0 टिप्पण्या