राज्यामध्ये जिल्हा, तालुका, केंद्रस्तरावर सकारात्मक शिस्त या विषयावर शिक्षण परिषदेमध्ये विशेष सत्रे आयोजित करणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ :- मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव यांचे पत्र क्र. मंत्री / शालेय शिक्षण / जनरल / १११४१, दिनांक २६ नोव्हेंबर, २०२५
महोदय,
उपरोक्त विषयाच्या संदर्भाधीन पत्राची प्रत या पत्रासोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
२. संदर्भाधीन पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांवरील शारीरिक शिक्षेच्या घटना समोर येत असून समाजात याविषयी चिंता व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सुरक्षा आणि शिक्षक-विद्यार्थी नाते बळकट करण्यासाठी सकारात्मक शिस्त ही संकल्पना आवश्यक आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हे, तालुके अथवा केंद्रस्तरावरील शिक्षण परिषदांमध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 'सकारात्मक शिस्त' या विषयावर किमान ४५ मिनिटांचे विशेष सत्र आयोजित करण्यात यावे, असे मा. मंत्री महोदय (शालेय शिक्षण) यांचे निर्देश आहेत. या पत्रामध्ये मार्गदर्शन सत्रामध्ये भर द्यावयाचे नऊ मुद्दे नमूद करण्यात आले आहेत.
संदर्भाधीन पत्रासोबत अधिक माहितीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विकसित केलेल्या मुख्याध्यापक मार्गदर्शिका भाग दोन यामधील 'सकारात्मक शिस्त- एक आव्हान' हा लेख जोडण्यात आला असून, या लेखाचा आधार घेण्याबाबत कळविण्यात आले आहे.
सदर परिषदांचे संक्षिप्त अहवाल दोन दिवसांच्या आत शासनास सादर करण्यात यावेत. यामध्ये या विषयावर जिल्हानिहाय आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण परिषदांची संख्या, सहभागी एकूण शिक्षकांची संख्या, महत्वाची छायाचित्रे, वैशिष्ट्यपूर्ण बातम्या यांचा समावेश असावा.
३. संदर्भाधीन पत्रामधील सूचनांनुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी, ही विनंती.
सहपत्र : वरीलप्रमाणे.
Digitally signed by
TUSHAR VASANT MAHAJAN Date: 28-11-2025 16:34:06
आपला
(तुषार महाजन)
उपसचिव, महाराष्ट्र शासन
प्रत :-
१) शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२) शिक्षण संचालक (माध्य. व उच्च. माध्य.), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
३) मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
मंत्री
शालेय शिक्षण
यांचे कार्यालय महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई ४०००३२
www.maharashtra.gov.in
दिनांक: 26 NOV 2025
प्रति.
उप सचिव, (प्रशासन/प्रशिक्षण)
शालेय शिक्षण विभाग,
मंत्रालय, मुंबई.
विषय - राज्यामध्ये जिल्हा, तालुका, केंद्रस्तरावर सकारात्मक शिस्त या विषयावर शिक्षण परिषदेमध्ये विशेष सत्रे आयोजित करणे बाबत.
राज्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांवरील शारीरिक शिक्षेच्या घटना समोर येत असून समाजात याविषयी चिंता व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सुरक्षा आणि शिक्षक-विद्यार्थी नाते बळकट करण्यासाठी सकारात्मक शिस्त ही संकल्पना अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने, राज्यातील सर्व जिल्हे, तालुके, अथवा केंद्रस्तरावरील शिक्षण परिषदांमध्ये नोव्हेंबर च्या शेवटच्या आठवडयात किंवा डिसेंबर च्या पहिल्या आठवड्यात 'सकारात्मक शिस्त' या विषयावर किमान ४५ मिनिटांचे विशेष सत्र आयोजित करण्यात यावे, असे मा. मंत्री महोदय (शालेय शिक्षण) यांचे निर्देश आहेत, त्या अनुषंगाने तात्काळ आपले स्तरावरून सूचना निर्गमित करण्यात याव्यात. या मार्गदर्शन सत्रामध्ये पुढील मुद्यावर भर द्यावा :
१) शारीरिक शिक्षेबाबत शिक्षण अधिकार अधिनियमातील तरतुदी व शिक्षकांची जबाबदारी.
२) शिक्षेचे प्रकार व स्वरूप शारीरिक, शाब्दिक, भावनिक, मानसिक तसेच भीती दाखविण्याकरता केलेली कृती.
३) शिक्षेचे परिणाम - भीती, न्यूनगंड निर्माण होणे, अबोल होणे, अध्ययन गतीचा वेग मंदावणे, मुले भित्री किंवा आक्रमक होणे.
४) शिक्षेचा मनावर व मेंदूवर होणारा परिणाम यामध्ये डॉ. पॉल मॅक्लिन, मेंदू तज्ञ यांचा थिअरी ऑफ डाऊन शिफ्टिंग हा सिद्धांत कथन करणे. हा सिद्धांत पुढील प्रमाणे आहे.
" जेव्हा मूल वाचन, संभाषण आणि अभ्यास अशी काही बौध्दिक कामे करत असते, अशा वेळेला त्याला रागावले तर त्याला भीती वाटते. मग बुद्धीचे काम थांबवून भावनांचे काम सुरु होते. अशा वेळी शरीर हे भावनांचे काम करणाऱ्या क्षेत्राकडे रक्तपुरवठा सुरु करते. अशा वेळी जर अजून मोठी शिक्षा झाली तर शरीर स्वतःला वाचवण्याचे काम सुरू करते. परिणामी रक्तपुरवठा बचावात्मक काम करणाऱ्या क्षेत्राकडे वळतो आणि बौद्धिक काम करणारी क्षेत्रे या प्रसंगी पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही."
५) विविध शैक्षणिक विचारवंत व त्यांचे सकारात्मक शिस्तीविषयीचे विचार,
६) सकारात्मक शिस्त तत्त्वे व त्यांची अंमलबजावणी.
७) संवाद, सहकार्य व समुपदेशन यावर आधारित वर्ग व्यवस्थापन.
८) योग्य शिस्तीचे मार्ग, सकारात्मक शिस्तीचे विविध तंत्रे व उपक्रम.
९) अलीकडील घटनांचा संदर्भ घेऊन शिक्षकांची संवेदनशीलता वाढविणे.
अधिक माहितीसाठी सोबत जोडलेल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विकसित केलेल्या मुख्याध्यापक मार्गदर्शिका भाग दोन यामधील 'सकारात्मक शिस्त - एक आव्हान' या लेखाचा आधार घेण्यात यावा. सदर परिषदांचे संक्षिप्त अहवाल दोन दिवसांच्या आत प्रस्तुत कार्यालयास सादर करावा. यामध्ये या विषयावर जिल्हानिहाय आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण परिषदांची संख्या, सहभागी एकूण शिक्षकांची संख्या, महत्त्वाची छायाचित्रे, वैशिष्ट्यपूर्ण बातम्या यांचा समावेश असावा.
(महेश पवार)
खाजगी सचिव
सकारात्मक शिस्त: एक आव्हान :
आपल्या शाळेत शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आपण सारेजण प्रामाणिकपणे करीत आहोत. केवळ एक बंधनकारक असलेला कायदा म्हणून नव्हे, तर आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी दूरदृष्टी ठेवून आज करायची एक मोलाची गुंतवणूक म्हणून आपण या कायद्यांतील तरतुदींच्या अंमलबजावणीकडे पाहायला हवे. वास्तविक पाहता या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या मार्गात आपणासमोर अनेक आव्हाने आहेत. त्यातील शाळेत सकारात्मक शिस्तीचे वातावरण निर्माण करून ते टिकवण्याच्या आव्हानाचा विचार आपण या प्रकरणात करणार आहोत.
- मुलांबद्दल बहुतांशाने मालकी हक्काची भावना मनात ठेवूनच आपण त्यांना 'शिस्त व वळण' लावण्याचा प्रयत्न करीत असतो. 'शिस्त' ही अंतिमतः सर्वांच्या भल्यासाठीच असते. त्यामुळे प्रसंगी रागावून, प्रसंगी दोन चापट्या मारून आपण मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न सामान्यतः करीत असतो. आपल्या दृष्टीने मुलाचे वरचेवर अधिक बेशिस्त होत चाललेले वर्तन, शिक्षण हक्क कायदयातील शारीरिक व मानसिक शिक्षा न करण्याबाबतची तरतूद आंणि मुलांच्या मनातील परीक्षेतील पास-नापासाची नष्ट झालेली भीती या साऱ्यांमुळे शाळेतील शिस्तीचा प्रश्न कसा हाताळायचा हे आव्हान आपल्या सर्वांपुढे आहे. मुलांमध्ये स्वयंशिस्त असावी ही आदर्श परिस्थिती आहे. यावर कोणाचेच दुमत असणार नाही. मात्र, ती 'कशी आणावी' या प्रश्नाची परिस्थितीनुसार असंख्य उत्तरे असू शकतात. मुलांमध्ये स्वयंशिस्त आणण्यासाठीच्या आपल्याला दिसलेल्या समजलेल्या वेगवेगळ्या पद्धती वापरून बघण्याची सवय व मानसिकता आपल्या शाळेतील शिक्षकांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी मुख्याध्यापक म्हणून आपण स्वतः याबाबत जागरूक राहणे, आपल्या वर्गात जाणीवपूर्वक काही प्रयोग करून बघणे आवश्यक आहे. हे करण्यापूर्वी शिस्त आणि बेशिस्त या संदर्भातल्या आपल्या संकल्पनाही तपासून, सुधारून घेण्याचा प्रयत्न करूयाः
'शिस्त' म्हणजे काय ?
कुटुंबात, शाळेत, ऑफिसमध्ये, सार्वजनिक ठिकाणी, सगळ्यांना आनंदाने वःसहकार्याने काम करता यावे जगता यावे म्हणून सामाईक नियमांची चौकट म्हणजे शिस्त!
शिस्त ही गोष्ट ज्याची त्याला आतून वाटावी लागते. बाहेरून देता येत नाही. स्वयंप्रेरणेतूनच यावी लागतेः शिक्षा आणि आमिष या दोन गोष्टी बाह्य प्रेरणा आहेत. त्याने कदाचित तात्पुरता परिणाम साधेलही पण भविष्यात नुकसानच होईल.
बेशिस्त का घडते?
बेशिस्तीचे मुख्य कारण 'नाउमेद' होणे. बेशिस्त वागणारे मूल हे 'धिक्कारले गेलेले मूल" असते. प्रत्येक व्यक्त्तीला तो ज्या गटात (घरात, शाळेत, कामाच्या जागी, मित्रांत) असेल तिथे पुढील दोन गोष्टी मिळणे फार आवश्यक असते,
- १) आपलेपणाची भावना (Sense of belonging)...
हा माझा गट आहे नि मी याचा आहे..
२) गटात मला असणारे महत्त्व (Sense of significance) या गटात मला महत्त्व आहे. मी इथे असायला हवा आहे.
जेव्हा या दोन गोष्टी मिळत नाहीत. तेव्हा मूल / व्यक्ती नाउमेद होते आणि त्यांच्या मनात खालील धारणा तयार होतात.
१) लक्ष वेधून घेणे तुमचे माझ्याकडे लक्ष असेल तरच (attention seeking) मी तुमचा, तुम्ही माझे.
२) सत्ताः माझ्या हातात हवी-मी बॉस (लीडर) असेल तरच गट माझा.
३) त्रास देणे (revange). मला गटात स्थान मिळत नसेल तर मग मी त्रास देऊन स्थान निर्माण करेन.
४) मला जमणारच नाही माघार घेणे, सोडून देणे.
'मूल नाउमेद करणाऱ्या प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेत असते' असे जर बेशिस्तीकडे पाहिले तर आपल्याच दृष्टिकोनात आमूलाग्र बदल, घडतो.
सकारात्मक शिस्तीची मूलतत्त्वे
मुलावर प्रेम, त्याची काळजी, आस्था मोठ्यांच्या मनात असणे ही पूर्वअट आहे.
१) मूल समजावून घेणे.
निरीक्षण, संवाद, माहिती मिळवणे या साधनांच्या माध्यमातून.
२) उभयपक्षी आदर/सहृदयता आणि ठामपणा (Mutual respect kind and firm) मुलांच्या भावनांची. दखल घेणे ही मुलांच्या प्रती सहृदयता होय.
मुलांना तुमच्याशी आदराने वागायला शिकवणे हा ठामपणा.
३) मुलांच्या प्रती आपल्याला असलेले प्रेम आणि आस्था मुलांना बोलून दाखवायला हवी.
४) दोन्ही बाजूंकडचा राग. शांत होण्याकरिता 'सकारात्मक वेळ' घ्यावा. (काही वेळ थांबून भल्याच्या दिशेने विचार करावा.)
५) मुलांना जमेल, ते करतील, चांगले यागायची स्वयंप्रेरणा त्यांच्यात रुजेल हा ठाम विश्वास मनात बाळगू या.
६) मुलाचे वर्तन चुकीचे आहे म्हणून ते मूल वाईट असे ठरवू नये. वर्तन बदलू शकते.
७) मुलांच्या चुकांकडे त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी शिकायची संधी म्हणून, पाहू या.
८) प्रश्नांची सकारात्मक उत्तरे शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये मुलांचा सहभाग घेणे आवश्यक आहे.
चुकांचे परिमार्जन :
वरील मूलतत्त्वे ध्यानात घेऊन घडलेल्या प्रसंगात आपली काही चूक आहे का हे बघायला हवे.
चूक असेल तर ती नक्की काय ते शोधू या. त्यानंतर चूक स्वीकारणे, माफी मागणे आणि पुढे काय करायचे हे मुलांबरोबरच्या संवादातून ठरवू या. यामुळे राग, सूड, बंड या चक्रातून मूल बाहेर पडायला मदत होईल.
मुलांचे सहकार्य मिळविण्याच्या चार पायन्या:
१) मुलाला समजून घ्या. त्याच्या भावनांबद्दल जे समजलेय ते त्याच्याशी बोला. आपले म्हणणे बरोबर आहे ना हे त्याच्याशी बोलून तपासता येईल. :
२) मला तुझे म्हणणे - भावना समजताहेत, मी तुझ्या बरोबर आहे अशी सहभावना व्यक्त करू. (याचा अर्थ असा नाही की त्याचे वागणे बोलणे आपल्याला मान्य आहे.) अशा वेळी आपल्या आयुष्यातलों या भावनेशी साधर्म्य असलेला एखादा प्रसंग सांगितला तर छान मदत होते.
३) पहिल्या दोन पायऱ्यांवरचे काम मनापासून आणि मैत्र भावनेतून झाले असेल तर आता घडलेल्या घटनेसंदर्भात तुमचा दृष्टिकोन सांगायला हरकत नाही. या बोलण्यात कुंठेही दोष देणे, आरोप करणे हे घडायला नको. E
४) या टप्प्यावर काय घडले, काय नुकसान झाले इथून पुढे जाणे आवश्यक आहे.
आता उपायांच्या दिशेवर लक्ष केंद्रित करू. प्रथम मुलाला काय वाटते ते ऐकून घेऊ. त्याला जर वाट्
दिसत नसेल तर आपण मदत करू या. पण कुठल्याही परिस्थितीत आपण उपाय लादायला नको. त्याच्याकडून उपाय पुढे आले तरच त्याचे पालन होण्याची शक्यता आहे.
वेशिस्त वर्तन : बेशिस्त वर्तनाचे पुढील तीन प्रकार असू शकतात.
१) ज्या वर्तनामुळे मुलाला स्वतःलाच तोटा भोगावा लागणार आहे.
उदा. डबा विसरणे, अभ्यास न करणे. हया चुकांचा परिणाम मुलांनी भोगल्याखेरीज त्यांच्यात सुधारणा
होणार नाही. इथे आपण त्याबद्दल एकदा सांगणे योग्य पण मागे लागणे, पुन्हा पुन्हा आठवण करून देणे नकोच. हे त्याच्यावर सोडले तरच लक्षात राहणार आहे.
२) ज्या वर्तनातून मुलाला धोका आहे. पण त्याला ते. समजत नाही.
उदा. रस्त्यावर खेळायला जाणे, या परिस्थितीत
अ) परिणामांची कल्पना देणे
دید 10 मात्र आपण हजर नसू तर? परत तो धोका संभवतोच; म्हणून या संदर्भातले शिक्षण देणे भाग आहे.
ब) तरी जर ऐकत नसेल तर ते करू न देणे हे आपल्या हातात आहे..
३) ज्या वर्तनामुळे इतरांना त्रास होतो. मुलाला हा त्रास समजत नाही किंवा समजून घ्यायला तो 'राजी नाही.
नुकसानीची भरपाई
सकारात्मक शिस्तीच्या सर्व पायऱ्या वापरून झाल्यानंतर आपल्याला मुलासह त्या गटाबरोबरच्या चर्चेतून भरपाई ठरवावी लागेल. ठरवताना 4R & 1 H ही मार्गदर्शक मूल्ये लक्षात ठेवावीत.
৭) (Related - Related to behaviour) भरपाई ही संबंधित व्यक्तींबरोबरच्या वर्तनाशी संबंधित हवी.
२) (Respectable) सर्वांचा आदर राखणारी. भरपाईमध्ये दोषारोप, शरम-दुःख देणारी वक्तव्ये नको.
३) (Resonable) - संबंधितांसाठी न्याय्य असावी. चुकीच्या मानाने अव्वाच्या सव्वा भरपाई नको, तसेच पाठीशी घालणारीही नको.
४) (Revealed in advance) - मुलांशी बोलूनच ती ठरवावी. मुलाने स्वतः त्या भरपाईची निवड केली. असेल तर फारच छान.
1 H = Helpful ही भरपाई विकासात मदत ठरायला हवी.
बर्तन समस्या सोडविण्याची पद्धत
१) माहिती मिळवणे. मूल असे का वागले?
२) स्वतः रागातून बाहेर येणे.
३) मुलाशी वैयक्तिक संवाद-सहकार्य मिळवण्याच्या दिशेने.
४) स्वतःच्या चुकीची कबुली.
५) मुलाबरोबर/संबंधित गटाबरोबर समस्या निवारण पर्यायांचा शोध.
६) भरपाईचे पर्याय समोर येणे,
७) संबंधित निवड आणि उत्तराची दिशा ठरणे.
८) भरपाईचे टप्पे ठरवणे.
९) शक्य आहे तिथे मदत करणे, प्रोत्साहन देणे, विश्वास टाकणे, प्रयत्नांची दखल घेणे.
१०) त्त्या मार्गातले अडथळे दूर करणे,
११) तज्ज्ञांचे सहकार्य घेणे.
१२) जे ठरले असेल त्याचा आढावा घेण्याची पद्धत ठरविणे.
या सगळ्या गोष्टी करून बघायच्या असे ठरविताना एक गोष्ट लक्षात ठेवू या की 'सगळ्यांना' स्वयंशिस्तीच्या वाटेवर नेणे ही गोष्ट लगेच घडणारी, सोपी नाही. ही एक प्रक्रिया आहे. ज्यातून योग्य मार्गावरून जाणे आपल्यालाही शिकावे लागणार आहे. मात्र आपल्या शाळेत असे स्वयंशिस्तीचे किंवा सकारात्मक शिस्तमय ातावरण असेल तर, एकत्र काम करणे सर्वांसाठीच आनंदाचे होते यावर आपला ठाम विश्वास हवा. तरच आपण आपल्या शिक्षक सहकाऱ्यांनाही सकारात्मक शिस्तीचे महत्त्व पटवून देऊ शकू. त्यामुळे शिक्षण हक्क काव्दाच्या अंमलबजावणीतील या आव्हानाला आपण यशस्वीरीत्या सामोरे जाऊ शकू आणि आपल्या शाळेत खऱ्या अर्थाने अध्ययनासाठी पोषक असलेले आनंददायी वातावरण निर्माण होईल.
शांततेचे वकील बना : मुलांना सांगा की, एका देशात शांततेसंबंधीचे कायदे बनवायचे काम शांततेचे वकील म्हणून तुमच्याकडे आले आहे. प्रत्येकाला तो ती सुचवू इच्छितो अशा सर्वांत महत्त्वाच्या ५ कायट्यांची यादी करण्यास सांगा. दुसऱ्यांनी सुचविलेले कोणते कायदे तुम्ही तुमच्या यादीत घ्याल हे विचारा. कोणते कायदे तुम्ही घेणार नाही? का? हे विचारा.
- राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा- २००५
संपूर्ण आदेश व माहिती पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


0 Comments