भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी निमित्त "जनजाती गौरव पंधरवडा व "जनजाती गौरव दिवस" साजरा करण्याबाबत.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी निमित्त दिनांक ०१ ते १५ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीमध्ये "जनजाती गौरव पंधरवडा व दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी "जनजाती गौरव दिवस" साजरा करण्याबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.


संदर्भ: १. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे अ. शा. पत्र क्र. १५-७/२०२५-.IS.७. दिनांक २८ ऑक्टोबर, २०२५.

२. मा. मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक २९ ऑक्टोबर, २०२५ रोजी प्राप्त पत्र. ३. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्रमांकः संकीर्ण-२०२५/प्र.क्र.४४४/एस.डी.४. दिनांक २९ ऑक्टोबर, २०२५.

उपरोक्त विषयी संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी निमित्त दिनांक ०१ ते १५ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीमध्ये "जनजाती गौरव पंधरवडा" व दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी "जनजाती गौरव दिवस साजरा करण्याबाबत संदर्भ क्र. १,२ व ३ च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे. (सोबत प्रत संलग्न)

शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिलनी यांच्या संदर्भ क्र.१ येथील पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, भारत सरकारने १५ नोव्हेंबर हा दिवस, देशाचे आदर्श स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस, सर्व आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यासाठी आणि स्वातंत्र्यलढ्यात आणि सांस्कृतिक वारसामध्ये त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांची प्रशंसा करण्यासाठी जनजाती गौरव दिवस म्हणून घोषित केला आहे. दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती आहे.

३. आदिवासी व्यवहार मंत्रालयाने (Ministry of Tribal Affairs) दिनांक २४.१०.२०२५ च्या पत्राद्वारे कळवले आहे की, दिनांक ०१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२५ हा कालावधी शाळांमध्ये जनजाती गौरव पंधरवडा म्हणून साजरा करावा. जनजाती गौरव दिवस (JJGD) २०२५ आणि भारतीय समाज आणि वारसामध्ये आदिवासी समुदायांचे योगदान साजरे करण्यासाठी, ०१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्य/केंद्रशासित प्रदेशांमधील शाळांद्वारे हाती घेता येणाऱ्या उपक्रमांची एक उदाहरणात्मक यादी जोडली आहे (परिशिष्ट-१). राज्ये/केंद्रशासित प्रदेश सूचक यादीतील उपक्रम समाविष्ट करु शकतात आणि खालील व्यापक विषयांना समाविष्ट करण्यासाठी या उपक्रमांना आणखी व्यापक स्वरुप देऊ शकतात :-

सामाजिक आर्थिक विकास आणि जागरुकता,

शिक्षण आणि कौशल्य विकास,

उपजीविका आणि निरोगीपणा.

कला, संस्कृती आणि वारसा.

पायाभूत सुविधांचा विकास.

प्रशासन आणि संस्थात्मक बळकटीकरण.

या संदर्भात प्रत्येक राज्य केंद्रशासित प्रदेश संघटनेकडून एक नोडल अधिकारी नियुक्त करावा आणि (is7section@gmail.com) या ई-मेलवर शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाल कळविण्यात यावे असे सदर पत्रात नमूद केले आहे. या नोडल अधिकाऱ्यांना दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ ते १५ नोव्हेंबर २०२५ या जनजाती गौरव दिवस कालावधीमध्ये कार्यक्रमांच्या आयोजनाचे समन्वय करावे लागेल. त्यांनी सदर कार्यक्रमाचे फोटोज आणि व्हिडियोज आणि कार्यक्रमांचे तपशील या बाबी विहित पोर्टलवर (https://adiprasaran.tribal.gov.in/tigd/home.aspx.) अपलोड करण्याची कार्यवाही करावी.

४. मा. मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य यांनी देखील त्यांच्या संदर्भ क्र.२ येथील पत्रान्वये भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शालेय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी "जनजाती गौरव दिन" सर्वत्र उत्साहात साजरा करण्याबाबत सविस्तर सूचना देण्याची विनंती केलेली आहे.

५ प्रस्तुत प्रकरणी शिक्षण मंत्रालयाच्च्या संदर्भ क्र.१ येथील पत्रामधील सूचनांनुसार दिनांक ०१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर, २०२५ हा कालावधी शाळांमध्ये 'जनजाती गौरव पंधरवडा' म्हणून व दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी 'जनजाती गौरव दिवस' साजरा करण्यात यावा.

उपरोक्त प्रमाणे दिनांक ०१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर, २०२५ हा कालावधी शाळांमध्ये 'जनजाती गौरव पंधरवडा' म्हणून साजरा करण्याबाबत व दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी 'जनजाती गौरव दिवस साजरा करण्याबाबत आपल्या अधिनस्त कार्यालयांना/शाळांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करण्यात यावा.


(डॉ. महेश पालकर) 

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक : २९ ऑक्टोबर, २०२५ रोजी आयुक्त (शिक्षण),शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी निमित्त दिनांक ०१ ते १५ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीमध्ये 'जनजाती गौरव पंधरवडा' व दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी 'जनजाती गौरव दिवस' साजरा करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.

संदर्भ :

- १) शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे अ. शा. पत्र क्र. 15-7/2025-IS.7 दिनांक २८ ऑक्टोबर, २०२५

२) मा. मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक २९ ऑक्टोबर, २०२५ रोजी प्राप्त पत्र.


महोदय,

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भाधीन पत्रांची प्रती त्यासोबतच्या सहपत्रांच्या प्रर्तीसह या पत्रासोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

२. शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या संदर्भ क्र. १ येथील पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, भारत सरकारने १५ नोव्हेंबर हा दिवस, देशाचे आदर्श स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस, सर्व आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यासाठी आणि स्वातंत्र्यलढ्यात आणि सांस्कृतिक वारसामध्ये त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांची प्रशंसा करण्यासाठी जनजाती गौरव दिवस म्हणून घोषित केला आहे. दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती आहे.

आदिवासी व्यवहार मंत्रालयाने (Ministry of Tribal Affairs) दिनांक २४.१०.२०२५ च्या पत्राद्वारे कळवले आहे की, दिनांक ०१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२५ हा कालावधी शाळांमध्ये जनजाती गौरव पंधरवडा म्हणून साजरा करावा. जनजाती गौरव दिवस (JJGD) २०२५ आणि भारतीय समाज आणि वाससामध्ये आदिवासी समुदायांचे योगदान साजरे करण्यासाठी, ०१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्य /केंद्रशासित प्रदेशांमधील शाळांद्वारे हाती घेता येणाऱ्या उपक्रमांची एक उदाहरणात्मक यादी जोडली आहे (परिशिष्ट-१). राज्ये / केंद्रशासित प्रदेश सूचक यादीतील उपक्रम समाविष्ट करू शकतात आणि खालील व्यापक विषयांना समाविष्ट करण्यासाठी या उपक्रमांना आणखी व्यापक स्वरूप देऊ शकतात :-

सामाजिक-आर्थिक विकास आणि जागरूकता

शिक्षण आणि कौशल्य विकास

उपजीविका आणि उद्योजकता

आरोग्य आणि निरोगीपणा

कला, संस्कृती आणि वारसा

पायाभूत सुविधांचा विकास

प्रशासन आणि संस्थात्मक बळकटीकरण

या संदर्भात, प्रत्येक राज्य / केंद्रशासित प्रदेश / संघटनेकडून एक नोडल अधिकारी नियुक्त करावा आणि is7section@gmail.com या ई-मेलवर शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाला कळविण्यात यावे. या नोडल अधिकाऱ्यांना दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ ते १५ नोव्हेंबर २०२५ या जनजाती गौरव दिवस कालावधीमध्ये कार्यक्रमांच्या आयोजनाचे समन्वय करावे लागेल. त्यांनी सदर कार्यक्रमाचे फोटोज आणि व्हिडियोज आणि कार्यक्रमांचे तपशील या बाबी विहित पोर्टलवर अपलोड करण्याची कार्यवाही करावी.

४. मा. मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य यांनी देखील त्यांच्या संदर्भ क्र. २ येथील पत्रान्वये भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शालेय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी जनजाती गौरव दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्याबाबत सविस्तर सूचना देण्याची विनंती केलेली आहे.

५. प्रस्तुत प्रकरणी शिक्षण मंत्रालयाच्या संदर्भ क्र. १ येथील पत्रामधील सूचनांनुसार दिनांक ०१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर, २०२५ हा कालावधी शाळांमध्ये 'जनजाती गौरव पंधरवडा' म्हणून व दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी 'जनजाती गौरव दिवस' साजरा करण्यासंदर्भात शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. शासनाकडून

करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्याच्या नियुक्तीबाबत शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांना आपल्यास्तरावरून कळविण्यात यावे. तसेच दिनांक ०१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर, २०२५ हा कालावधी शाळांमध्ये 'जनजाती गौरव पंधरवडा' म्हणून साजरा करण्याबाबत व दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी 'जनजाती गौरव दिवस' साजरा करण्याबाबत आपल्यास्तरावरून आवश्यक त्या सूचना परिपत्रकाद्वारे संबंधितां. मनना देण्यात याव्यात, ही विनंती..

सहपत्र : वरीलप्रमाणे.


आपला,

Digitally signed by Aniruddha Avinash Kulkarni

Date: 2025.10.29 18:39:44 +05'30'

(अ.अ. कुलकर्णी)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

१. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

३. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहिती तथा आवश्यक त्या

२. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे

कार्यवाहीस्तव अग्रेषित,

४. मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव यांना माहितीस्तव अग्रेषित.

५. मा. राज्यमंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव यांना माहितीस्तव अग्रेषित.

६. निवडनस्ती (एस.डी. ४)

 संदर्भित सर्व परिपत्रकासोबत संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.