विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ दिनांक 18 व 19 नोव्हेंबर ला सार्वजनिक सुट्टी नाही शिक्षण आयुक्तांचे सुधारित आदेश! 16/11/2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान दिनांक व पूर्व तारखांना सुट्टी बाबत दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणायुक्तांनी सुधारित निर्देश निर्गमित केले आहे ते पुढील प्रमाणे.

संदर्भ : १. शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे पत्र क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र. ३३२/एसडी-४, दि. १४/११/२०२४

२. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्रमांक आशिका/प्राथ/१०६/निवडणूक सुट्टी/६८६०, दि. १६/११/२०२४

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये क्षेत्रिय स्तरावर दिनांक: १८/११/२०२४ व दिनांक: १९/११/२०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते.

२/- शासनाच्या संदर्भ क्रमांक १ मधील पत्रान्वये दिलेल्या सूचना अत्यंत स्पष्ट आहेत. याबाबतीत असे कळविण्यात येते की, दिनांक १८/११/२०२४ व दिनांक: १९/११/२०२४ रोजी शाळा सुरु राहतील. तसेच उक्त दिवशी कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.

३/- केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापतक यांनी त्यांचे अधिकारात सुट्टी जाहीर करावी व अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरु राहतील.

४/- केवळ उपरोक्त परिस्थितीतील विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांनी सुट्टी जाहीर करावी. तसेच ही सरसकट व सार्वजनिक सुट्टी नाही याची नोंद घ्यावी. तसेच कोणत्याही शाळा अनावश्यकरित्या बंद राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.


(सूरज मांढरे भा.प्र.से.)

आयुक्त शिक्षण

महाराष्ट्र राज्य, पुणे





विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ मतदान दिनांक व पूर्व तारखांना सुटीबाबत जिल्हाधिकारी, (सर्व जिल्हे); मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व); विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग) यांना आयुक्त, शिक्षण यांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 



 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८, १९ व २० नोव्हेंबर, २०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत  महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


संदर्भ :- आपले पत्र क्र. आशिका / प्राथ / १०६/ निवडणूक सुटी / ६८३१, दिनांक १३ नोव्हेंबर, २०२४.

महोदय,

उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८,१९ व २० नोव्हेंबर, २०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासन मान्यतेसाठी सादर केला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेणेबाबत आपण आपल्यास्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, ही विनंती.


आपला,

तुषार महाजन)

( उपसचिव, महाराष्ट्र शासन


राज्य शासनाने माननीय आयुक्त शिक्षण यांनी दिलेल्या पत्रानुसार शाळेतील शंभर टक्के निवडणूक कर्तव्यावर असतील तर मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.