Mahajyoti MPSC UPSC Competitive Exam Training 2024-25 - महाज्योती विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण ऑनलाईन अर्ज लिंक व संपूर्ण माहिती.

 Application Invited For Various Schemes for 2024-25 [MPSC State Services, MPSC Engineering Services, UPSC English (Delhi) & Marathi (Pune), Staff Selection Commission Combined Graduate Level (SSC-CGL) , IBPS Banking LIC Railway

महाज्योती द्वारे एमपीएससी यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे अर्ज करण्यासाठी लिंक.

https://mahajyoti.org.in/en/application-invited-for-various-schemes-for-2024-25-mpsc-state-services-mpsc-engineering-services-upsc-english-delhi-marathi-pune-staff-selection-commission-cgl-class-iii-level-ibps-ban-2/इतर मागासवर्ग प्रवर्गातील (ई.मा.व.) OBC विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण


पुणे, दि. २१ : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या स्वायत्त संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सन २०२४-२५ या वर्षातील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने ३ जूलैपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे. 


महाज्योतीमार्फत केंद्रीय नागरी सेवा परीक्षा, राज्यसेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा, बँकिंग, एलआयसी व रेल्वे परीक्षा आदी परीक्षांसाठी नामांकित प्रशिक्षण संस्थेत मोफत पूर्व प्रशिक्षण राबविले जाते. प्रशिक्षणाबाबतचे सर्व तपशील, निकष, अटी व शर्ती तसेच अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया याबाबतची माहिती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 


महाज्योतीमार्फत प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्यात विद्यावेतन तसेच  प्रशिक्षणासाठी रुजू होताना एकरकमी आकस्मिक निधीदेखील देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड प्रवेश परीक्षेद्वारे होणार आहे. 


राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील इच्छुक विद्यार्थ्यांनी  विहित कालावधीत अर्ज करावा. तसेच अधिक माहितीसाठी ०७१२-२८७०१२०/१२१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन महाज्योतीचे प्रकल्प व्यवस्थापक विकास गडपायले यांनी केले आहे.


महाज्योतीच्या विविध योजनांकरीता अर्ज करणेसाठी विद्यार्थ्यांकरिता सूचना उमेदवाराकडे कोणत्याही स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेच्या प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यापूर्वी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि इतर बाबी


1. उमेदवाराकडे वैध आणि कार्यरत ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.

3. उमेदवाराकडे अलीकडील पासपोर्ट साईज फोटी व स्वाक्षरी खालील साईज मध्ये स्कॅन केलेली असावी. पासपोर्ट साईज फोटो 50-100 KB (केवळ jpg, jpeg format मध्ये)

2. प्रोफाईल तयार करतांना उमेदवाराने वैध आणि कार्यरत मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. 

स्वाक्षरी 20-50 KB (केवळ jpg, jpeg format मध्ये)

PDF Format मध्ये,

10 वी गुणपत्रिका/प्रमाणपत्र

12 वी गुणपत्रिका/प्रमाणपत्र

ग्रॅज्युएशन गुणपत्रिका/प्रमाणपत्र

अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)

आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसाहित)

जात प्रमाणपत्र

वैध नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र

दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)

अनाथ प्रमाणपत्र (लागू असल्यास)


योजनांच्या लाभासाठी पात्रता :-

. विद्यार्थी हा नॉन क्रिमिलेयर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच 1 विशेष मागास प्रवर्गापैकी असावा.

2. वयोमर्यादा • केंद्रीय लोकसेवा आयोग (LIPSC) दिल्ली व पुणे, 21 ते 33 तसेच दिव्यांगाकरिता 40

• महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), 19 ते 41 तसेच दिव्यांगाकरिता 43. • स्टाफ सिलेक्शन कमिशन Combined Graduate Level (SSC-CGL) 18 ते 30 तसेच दिव्यांगाकरिता 40

• बँकिंग, रेल्वे, एल आय सी. 20 ते 28 तसेच दिव्यांगाकरिता 38 • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, 19 ते 40 तसेच दिव्यांगाकरिता 45

उमेदवारांनी कोणत्याही योजनेचा अर्ज भरण्यापूर्वी खालील सूचना लक्षपूर्वक वाचा.


1. उमेदवारांनी सामायिक प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावरील दिलेल्या लिंकवर जावे, 

2.लिंक उघडल्यावर त्यावरील 'New Registration' या Tab वर क्लिक करावे.

3. त्यातील Profile मध्ये नमूद केलेली माहीती भरावी. यामध्ये काही माहिती ही लाल रंगाच्या चिन्हाने दर्शविली असल्याने ती माहिती उमेदवारांना भरणे बंधनकारक आहे.


4. Profile मधील संपूर्ण माहिती भरल्यावर जो मोबाइल क्रमांक आपण नोंदविला असेल त्यावर तुमचा Registration Number आणि Password येईल. सदरचा Registration Number आणि Password संपूर्ण Application Form भरेपर्यंत सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. जर चुकून तुमचा Registration Number आणि Password चा मोबाईलवरील आलेला मेसेज delete झाल्यास आपणास पुन्हा नव्याने Registration ची प्रक्रिया करावी लागेल, 5. उमेदवाराला Application Form मधील दिलेली माहिती पूर्ण भरायची आहे त्याशिवाय आपली त्या योजनेसाठीची नोंदणी वैध मानली जाणार नाही.

6. सामायिक प्रवेश परीक्षेच्या नोंदणी अर्जामध्ये एकूण ५ पायऱ्या दिलेल्या आहेत. बात.

1. Profile, 2. Basic, 3. Qualification, 4. Documents, 5. Preview

7. अर्जातील पहिली Profile पायरी पूर्ण करून झाल्यावर पुन्हा नव्याने Login केल्यावर पायरी दुसरी Basic Details चौमाहिती भरायची आहे. सदर माहिती भरून झाल्यावर validate your details ची Tab तपासून त्यानंतर save & next करून पुढे जावे,

8. त्यानंतर पायरी तिसरी शैक्षणिक माहिती भरावी. सदर माहिती भरून झाल्यावर validate your details ची Tab तपासून त्यानंतर save & next करून पुढे जावे.

9. शैक्षणिक माहिती भरून झाल्यावर चौथी पायरी भरतांना उमेदवारांनी आपली शैक्षणिक तसेच इतर कागदपत्राच्या स्कैन कॉपी अर्जात नमूद केलेल्या size मध्ये तयार करून ठेवाव्यात. प्रत्येक कागदपत्राची size खालील प्रमाणे असेल.


Scanned latest Photograph of the Candidate-only JPG and JPEG, Size between 50 to 100 KB.

Scanned Signature of the Candidate-only JPG and JPEG, Size between 20 to 50 KB. Scanned copy of Candidate 10th marks sheet/certificate only PDF Document, Size should be between 100 KB to 300KB.

Scanned copy of Candidate Intermediate or 10+2 marks

sheet/certificate-only PDF Document, Size should be between 100 KB to 300кв. Scanned copy of Candidate Graduation marksheet/certificate-only PDF Document, Size should be between 100 KB to 300KB.

Domicile Certificate only PDF Document, Size should be between 100 KB to 300KB. Aadhar Card (Front/Back) only PDF Document, Size should be between 100 KB to 300KB front & back side Mandatory (should be Merge in one PDF)

Caste Certificate-only PDF Document, Size should be between 100 KB to 300кв. Caste Validity Certificate only PDF Document, Size should be between 100 KB to 300KB.

Size should be between 100 KB to 300KB (if applicable)

Income Certificate (Given by Tahsildar) only PDF Document, Size should be between 100 KB to 300KB. (Income Certificate of Last 3 years-Mandatory) Person with Disabilities (PWD) Certificate (दिव्यांग प्रमाणपत्र) only PDF Document,

Orphan Certificate (अनाथ प्रमाणपत्र) only PDF Document, Size should be between 100 KB to 300KB (if applicable)


10. उपरोक्त दिलेल्या size मधील कागदपत्रे जोडल्यानंतर save & next बटन दाबल्यावर आपण Uploaded केलेली कागदपत्रे बरोबर आहेत ना असे विचारले जाते. त्यातील Ok बटन दाबल्यावर आपला संपूर्ण भरलेला अर्ज येतो,


11. त्यानंतर अर्जाच्या शेवटी एक Declaration दिलेले आहे ते वाचून त्याला सहमती म्हणून । Agree येथील चौकटीवर क्लिक करून खाली दिलेल्या I confirm that this is my signature येथील चौकटीवर क्लिक करून त्याखाली दिलेल्या Final Submit या बटनावर क्लिक करावे. यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला विचारले जाते की, तुम्ही सदर अर्ज Submit करण्यास तयार आहात का? तेथील % बटनावर क्लिक करून आपला अर्ज Submit करावा, जेथे photo आलेला आहे त्याखाली दिलेल्या चौकटीवर सुद्धा क्लिक करणे आवश्यक आहे. त्यानंतरच Final Submit केल्यावर पुन्हा एक सूचना येईल की, एकदा तुम्ही Final Submit केले की, त्यानंतर तुम्हाला अर्जात कोणताही बदल/दुरुस्ती करता येणार नाही. जर आपण यासाठी सहमत असाल तर आपण OK बटन क्लिक करावे आणि जर आपणास काही दुरुस्ती करावयाच्या असतील तर आपण Cancel


या बटनावर क्लिक करून आपल्या अर्जातील दुरुस्ती/बदल करून त्यानंतरच Final Submit करावे.


12. यानंतर आपण आपला अर्ज प्रिंट करून घ्यावा किंवा तो आपल्याकडे Save करून ठेवावा. उमेदवारांच्या कागदपत्रे तपासणीच्या वेळेस उमेदवाराला सदर अर्ज इतर मूळ कागदपत्रासोबत सादर करावा लागेल. सदर अर्ज आपल्याला कोणत्याही कार्यालयाकडून कोणत्याही कारणास्तव पुन्हा प्राप्त करून दिला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.


13. स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराने प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळा अर्ज भरावा.


14. अर्जामध्ये पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी हे CET परीक्षेस बसण्यापूर्वी तपासले जाईल जर त्यामधील माहिती किंवा फोटो जुळत नसल्यास अशा उमेदवारांना CET परीक्षेस बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.


स्कॅनींग आणि दस्तऐवज अपलोड करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे :


ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने त्याचे छायाचित्र आणि स्वाक्षरीची स्कॅन केलेली (डिजिटल) प्रतिमा खाली दिलेल्या वैशिष्ट्घानुसार असणे आवश्यक आहे.


• छायाचित्र (photo):

छायाचित्र (Photo) अलीकडील पासपोर्ट शैलीचे रंगीत चित्र असणे आवश्यक आहे.

हलक्या रंगाच्या, शक्यतो पांढऱ्या, पार्श्वभूमीवर काढलेले चित्र रंगीत (Colored Photo) असल्याची खात्री करा.

तुमच्या फोटोमध्ये 'रेड-आय' नसल्याचे सुनिश्चित करा.

जर तुम्ही चष्मा घालत असाल तर त्यात कोणतेही प्रतिबिंब दिसत नाही आणि तुमचे डोळे स्पष्टपणे दिसू शकतोल याची खात्री करा.

डोक्यावर टोपी किंवा डोळ्यावर गडद चष्मा स्वीकार्य नाहीत.

कोणत्याही वस्तू किंवा कपड्याने तुमचा चेहरा झाकलेला फोटो नसावा.

अर्जामध्ये फोटोच्या ठिकाणी फोटो अपलोड न केल्यास परीक्षेसाठी प्रवेश नाकारला जाईल. यासाठी उमेदवार स्वतः जबाबदार राहील.

प्रवेश अर्जात फोटो आणि स्वाक्षरी योग्यरीत्या अपलोड केली नसेल तर उमेदवाराला परीक्षेला बसू दिले जाणार नाही.

पासपोर्ट साईज फोटो-50-100 KB (केवळ jpg, jpeg format मध्ये) असावा.


स्वाक्षरी प्रतिमा (Signature):

अर्जदाराने पांढऱ्या कागदावर निळ्या काळ्या शाईच्या बॉल पेनाने सही करावी.

अर्जदाराने त्याच्या डाव्या अंगठ्याचा उसा काळ्या किवा निळ्या शाईने पांढऱ्या कागदावर लावावा, स्वाक्षरी अर्जदाराने केलेली असावी.

परीक्षेच्या वेळी स्वाक्षरी केलेल्या उपस्थिती पत्रकावर किंवा हॉल तिकिटावर अर्जदाराची स्वाक्षरो नसल्यास किंवा ती अपलोड केलेल्या स्वाक्षरीशी न जुळल्यास अर्जदारास अपात्र घोषित केले जाईल. स्वाक्षरी - 20- 50KB (केवळ jpg, jpeg format मध्ये) असावी.


उमेदवारासाठी ऑनलाईन अर्जाबाबत सर्वसाधारण सूचना :

ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर, उमेदवारांने त्याची प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे.

उमेदवाराने ऑनलाइन अर्जामध्ये उमेदवाराचे नाव, प्रवर्ग, जन्मतारोख, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, परीक्षा केंद्र इ. सर्व तपशील नमूद केले आहेत ते अंतिम मानले जातील आणि सबमिट केल्यानंतर कोणतेही बदल/फेरफार करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

उमेदवारांने ऑनलाइन अर्ज अत्यंत सावधगिरीने भरावा कारण यासंबंधी उमेदवाराशी कोणताही पत्रव्यवहार केला जात नाही. 

अर्जातील तपशील/माहिती चुकीची अथवा अर्धवट ठेवल्यास सादर केल्यास होणाऱ्या कोणत्याही परिणामांसाठी विभाग/कार्यालय/संबंधित जवाबदार राहणार नाही.

इंटरनेट/वेबसाइट सव्र्व्हरवर जास्त भार असल्यामुळे डिस्कनेक्शन/अक्षमता/वेबसाइटवर लॉग इन करण्यात अयशस्वी होण्याची शक्यता टाळण्यासाठी विहित वेळेत अर्ज सादर करावा जर विहित वेळेत अर्ज सादर न झाल्यास / सादर करू शकत नसल्याची कोणतीही जबाबदारी विभाग/कार्यालय/संबंधित संस्था यांची राहणार नाही.

अर्जदाराने त्याच्या/तिच्या अर्जात सादर केलेली कोणतीही माहिती उमेदवारावर वैयक्तिकरित्या बंधनकारक असेल आणि त्यासाठी तो/ती जबाबदार असेल.

उमेदवाराने अर्जात भरलेली माहिती तपशील प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर खोटे बनावटी असल्याचे आढळल्यास तो/ती कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

अर्ज भरतांना उमेदवारांनी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी. कागदपत्रांची पडताळणी न करता ऑनलाईन चाचणीसाठी प्रवेश पूर्णपणे तात्पुरता असेल.

विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन प्राप्त कागदपत्रांची पडताळणी न करता चाळणी परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांची निवड झाल्यास निवड केलेल्या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल, त्यात त्रुटी आढळल्यास त्या विद्यायांची निवड रद्द करण्यात येईल, याची विद्याथ्यांनी नोंद घ्यावी. उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर करण्यासाठी एकापेक्षा जास्त योजनांकरीता अर्ज सादर करण्यासाठी नोंदणी करतेवेळी प्राप्त झालेल्या Login ID व password चा वापर करून New Application या टॅबद्वारे दुसऱ्या योजनेकरीता फोर्म भरावा. परंतु परीक्षा दिनांक यांच्यात CLASH झाल्यास CET च्या तारखेला कोणताही बदल दिला जाणार नाही.

उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षेची तारीख महत्त्वाचे अपडेट तसेच त्यासंबंधित वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचना/माहितीसाठी नियमित अंतराने संबधित संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. विद्यार्थाने अर्ज करतेवेळी पहिल्यांदा निवडलेल्या परीक्षेकरीता जिल्ह्याचे प्राधान्य प्रत्येक योजनांच्या प्रवेश परीक्षेकरीता कायम स्वरूपी गृहीत धरल्या जाईल. त्यात कोणत्याही प्रकारचे बदल करता येणार नाही.

अर्ज भरतांना तांत्रिक अडचणी उद्भवल्यास,

खालील संपर्क क्रमांकावर किंवा दिलेल्या ईमेलवर अडचण/समस्या सोडविण्याबाबत संपर्क साधावा. ईमेलच्या तक्रारीसोबत नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि जन्मतारीख नमूद करणे अनिवार्य आहे.


संपर्क क्रमांक : 07122870120/07122870121

ईमेल आय डी mahajyotihelpdesk@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा.

संस्थेचे संकेतस्थळ (website): www.mahajyoti.org.in


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.