Free Education For Girls Update - महाराष्ट्रात मुलींना उच्च शिक्षण मोफत घोषणेच पुढे काय?

 बऱ्याच जणांकडून मुलींना मोफत शिक्षणाबाबत शासन आदेश किंवा अधिसूचना बाबत चौकशी किंवा मागणी होत आहे. परंतु तशी फक्त घोषणा करण्यात आली आहे कोणताही शासन आदेश किंवा अधिसूचना किंवा अधिकृत आदेश याबाबत शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला.


चंद्रकांत पाटील यांनी केली होती घोषणा : अद्याप अध्यादेश नसल्याने संभ्रम. 


राज्यातील पारंपरिक शिक्षणाबरोबर अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, डिप्लोमा, आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींचे १०० टक्के शुल्क राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी केली होती. निर्णयाची अंमलबजावणी २०२४-२५ या चालू या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. सध्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून, प्रवेश प्रक्रियाही सुरू आहे. मात्र, सरकारने याबाबतचा अध्यादेश अद्यापही काढला नसल्याने विद्यार्थिनी व पालकांमध्ये संभ्रमावस्था आहे.

सध्या महाविद्यालयात प्रवेश घेतानाच अनेक पालक या घोषणेचा आधार देत शुल्क भरण्यास नकार देत असल्याने महाविद्यालय प्रशासन व पालकांमध्ये वादावादी होत आहेत. त्यामुळे मुलींच्या मोफत शिक्षणाचा अध्यादेश सरकार कधी काढणार, असा सवाल राज्यभरातून उपस्थित होत आहे. बारावीनंतर पुढे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींचे प्रमाण अगदी नगण्य आहे. ते प्रमाण वाढावे व मुलींनाही उच्च शिक्षण घेता यावे यासाठी राज्य सरकारने बारावीनंतर पुढे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींचे १०० टक्के शुल्क राज्य सरकार भरेल, अशी घोषणा केली होती. या निर्णयाचा राज्यातील २० लाख मुलींना लाभ होणार आहे.

कोणत्या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू

सध्या पदविका अभियांत्रिकी, डी. एड., पारंपरिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विद्यार्थिनी महाविद्यालयात प्रवेश घेण्यास गेल्या की सरकारच्या या घोषणेची आठवण संबंधितांना करून देत आहेत. मात्र, महाविद्यालयाकडे यासंबंधी काहीच माहिती उपलब्ध नसल्याने प्रशासन शुल्क भरल्याशिवाय प्रवेश देत नसल्याने विद्यार्थिनी व पालकांची अडचण झाली आहे.

आधी शुल्क, नंतर परतावा !

 विद्यार्थिनींना प्रवेश घेताना सुरुवातीला महाविद्यालयाच्या नियमानुसार असेल ते शुल्क भरावे लागेल. सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी केल्यानंतर त्यांना ते शुल्क परत मिळणार असल्याचे एका प्राध्यापकाने सांगितले.

अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी यासह जवळपास ६४२ विविध व्यावसायिक कोर्सेसचे शुल्क सरकार भरणार असून, या निर्णयामुळे पालकांवरचा आर्थिक भारही हलका होण्यास मदत होणार आहे. 

चालू शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या वाढणार आहे.

बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेश घेतानाच शुल्क मागितले जात असल्याने विद्यार्थिनी व पालक सरकारच्या या घोषणेची आठवण करून देत आहेत.




महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.