PM Poshan Update - राज्यातील जाहिर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणेबाबत शिक्षण संचालकांचे नवीन आदेश सूचना

 प्राथमिक शिक्षण संचालनालय या कार्यालयातील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना स्वतंत्र कक्षातून निर्गमित दिनांक 30 एप्रिल 2024 रोजीच्या शिक्षण संचालकांच्या नवीन आदेशानुसार राज्यातील जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागांमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणे बाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.


शासनाने सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील ४० तालुक्यांमध्ये संदर्भिय शासन निर्णयानुसार दुष्काळ घोषित केलेला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती घोषित केलेल्या भागाकरीता शासनाने विविध सवलती लागू केलेल्या आहेत. त्यानुसार दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यातील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना (पीएम-पोषण योजना) दिर्घ सुट्टीच्या कालावधीत देखील राबविण्याचे निर्देश संदर्भिय पत्रान्वये आपणांस दिले आहेत. सदर दिर्घकालीन सुट्टीच्या कालावधीमध्ये योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपणांस खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.


१. दिर्घ सुट्टी माहे मे व जून २०२४ कालावधीकरीता शासकीय सुट्टया वगळून इतर कार्यदिन विचारात घेऊन कार्यवाही करावी.


२. दिर्घ सुट्टी कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना शाळास्तरावर शिजविलेला आहार उपलब्ध करुन देणेकरीता मुख्याध्यापक/शिक्षक (किमान १ जण) शाळेत उपस्थित राहील. याबाबत आपल्या स्तरावरुन सूचना देण्यात याव्यात.


३. सद्यस्थितीत राज्यामध्ये तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ हा सकाळ सत्रामध्ये (सकाळी ०९:३० वाजेपर्यंत) देण्यात यावा. तद्नंतर विद्यार्थ्यांना घरी पाठवावे.


४. शाळा प्रशासनाने आहार शिजविणेकरीता स्वयंपाकी/मदतनीस यांना तशा सूचना द्याव्यात.


५. शाळास्तरावर आहार शिजवून दिलेल्या कालावधीकरीता स्वयंपाकी/मदतनीस मानधन अदा करण्यात येणार आहे.


६. विद्यार्थी शाळेत उपस्थित राहून लाभ घेत असतील तर त्याची माहिती (विद्यार्थ्यांनी आहार घेतलेबाबतची माहिती) दैनंदिनरित्या ऑनलाईन पोर्टलवर भरली जाईल याची दक्षता घेण्यात यावी.


७. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आहार उपलब्ध करुन देण्याकरीता आपल्या स्तरावरुन क्षेत्रीय यंत्रणेस आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात.


८. ४० दुष्काळग्रस्त घोषित तालुक्यातील विद्यार्थी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत, याबाबत दक्षता घ्यावी.


(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे


प्रति,

शिक्षणाधिकारी (प्राथमिक),

जिल्हा परिषद, नंदुरबार, धुळे, जळगांव, बुलढाणा, जालना, छ. संभाजीनगर, नाशिक, पुणे, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सांगली.



वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


दुष्काळग्रस्त व सदृश्य तालुक्यांची यादी पुढीलप्रमाणे.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.