Udise Plus 2024-25 Update - शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये UDISE + प्रणालीमध्ये माहिती संकलित करण्याबाबत शिक्षण विभागाचा शासन आजचा आदेश

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये यु डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती संकलित करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ अन्वये स्थानिक प्राधिकरण यांचेमार्फत माहितीचे संकलन आणि माहिती व्यवस्थापन करणे अनिवार्य आहे. आरटीई कायद्यांतर्गत माहिती संकलन आणि शाळांना युनिक यु-डायस कोड देण्यासाठी UDISE + यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.


३. संदर्भाधीन पत्रान्वये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी UDISE + प्रणालीमध्ये माहिती भरण्यासाठी राज्यांना दि.०१.०४.२०२४ पासून पोर्टल उघडण्यात येणार आहे. तसेच दि.३१.०७.२०२४ पर्यंत राज्यांनी माहिती भरुन दि.३०.०९.२०२४ पर्यंत अंतिम प्रमाणपत्रता (Final Certification) पूर्ण करणे अपेक्षित आहे.


४. नवीन शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांची नावनोंदणी व एकूण नोंदणी दर (Gross Enrollment Ratio) १०० टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग (NIOS) मध्ये नावनोंदणी केलेल्या १४-ते १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी डाटा कॅप्चर फ़ॉरमॅट (Data Capture Format) यंत्रणा विकसित केली असून त्यासंबंधी माहिती NIOS यांचेमार्फत संकलित करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त अनौपचारिकरित्या शिक्षण देणा-या संस्था (UDISE कोडशिवाय) (उदा. खाजगी पूर्व प्राथमिक शाळा, शासनाची मान्यता नसणा-या शाळा तसेच स्वतंत्र कौशल्य केंद्रे) मधील विद्याथ्यर्थ्यांच्या नोंदणी व उक्त संस्था यांच्या संदर्भातील माहिती संकलित करण्यासाठी डाटा कॅप्चर फ़ॉरमॅट BRC/CRC मध्ये व्यवस्था करण्यात आली असून त्यासंबंधी दि. २३.०३.२०२३ रोजीच्या पत्रान्वये सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि ब-याच राज्यांकडून सदर व्यवस्थेचा वापर करण्यात येत नसल्याबाबत आढळून आले आहे. तसेच ब-याच राज्यांनी UDISE २०२३-२४ मधील माहिती अद्यापि संकलित केली नसून Data Duplication व Drop Box Issue यासंदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. सदर प्रकरणी तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.


५. केंद्र शासनाच्या उपरोक्त पत्राच्या अनुषंगाने, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये UDISE + प्रणालीवर माहितीचे संकलन योग्यरित्या करून Data Duplication व Drop Box Issue संदर्भातील कार्यवाही तातडीने करावी. UDISE + प्रणालीमध्ये माहितीचे वेळेत संकलन न झाल्यास आरटीई कायद्याचे उलंघन होत असल्याने सदर प्रकरणी कालमर्यादेत कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरुन संदर्भाधीन पत्रात नमूद केल्याप्रमाणे संबंधितांना सूचना देण्यात याव्यात, हि विनंती.


आपला,

(तुषार महाजन)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.


प्रति,

१. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे

२. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नी रोड, मुंबई. .

३. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे. 

४. शिक्षण संचालक (माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.