PM-Poshan Offline Bills Update - प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांच्या ऑफलाईन देयकांच्या माहिती बाबत शिक्षण संचालक यांचे परिपत्रक

 प्राथमिक शिक्षण संचालनालयातील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना स्वतंत्र कक्षातून दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांच्या ऑफलाईन देयकांच्या माहिती बाबत  पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. सदर लाभाची दैनंदिन माहिती राज्यामधील प्रत्येक जिल्हयातील शाळांनी शासनाने सरल प्रणालीअंतर्गत विकसित केलेल्या एम.डी.एम पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. तथापि अनेक शाळांना विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणामुळे विहित वेळेत दैनंदिन उपस्थितीची माहिती भरता आलेली नसल्यामुळे अशा शाळांना एमडीएम पोर्टलमार्फत जनरेट करण्यात आलेल्या ऑनलाईन देयकांचा लाभ मिळालेला नाही.


त्यानुषंगाने सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना निर्देशित करण्यात येते की, सदर योजनेंतर्गत काही शाळांनी विहित • वेळेत ऑनलाईन माहिती भरलेली नसल्यामुळे, अशा शाळांनी आहार शिजवून देखील संबंधित शाळांना अनुदान मिळालेले नाही, अशा शाळांची माहिती खालील विहित नमुन्यामध्ये संचानालयास दि. ०८.०४.२०२४ पर्यंत विनाविलंब सादर करण्यात यावी. सदर माहिती सादर करतांना प्रस्तुत संस्थांना देय रक्कम नियमानुसार देय असलेबाबतचे प्रमाणपत्र व कोणत्याही देयकाची दुबार अदायगी होत नसलेबाबतचे प्रमाणपत्र देखील सोबत सादर करण्यात यावे. सदर बाबत विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी.


(शरद गोसावी) 

शिक्षण संचालक (प्राथमिक)

प्रत माहितीस्तव सादर : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.