भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक २० एप्रिल. २०२४. च्या पत्रान्वये निवडणूकीच्या दिवशी तसेच त्यालगतच्या आधीच्या व नंतरच्या दिवशी भारत निवडणूक आयोगाला मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सहीने पाठवावयाच्या प्रमाणपत्राचे मसूदे आयोगाने उपलब्ध करुन दिले आहे व त्याप्रमाणे आयोगास अहवाल पाठवावयाचे आहेत. त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकरिता हस्त पुस्तिका २०२३ मधील परिच्छेद १३.६५ येथे नमूद केल्याप्रमाणे मतदानाच्या दिवशी दुपारी १.०० वाजता, संध्याकाळी ७.०० वाजता व दुसऱ्या दिवशी सकाळी ७.०० वाजता जोडपत्र २९ (Annexure-29) मध्ये सविस्तर अहवाल पाठवावयाचा आहे. त्या व्यतिरिक्त मतदानाच्या दिवशी प्रत्येक २ तासाने मतदानाची एकत्रित (Cumulative) टक्केवारी दर्शविणारा अहवाल सर्व लोकसभा मतदार संघाकडून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास प्राप्त होणे आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त, ईव्हिएम-व्हिव्हिपॅट संदर्भातील अहवाल सुद्धा विहित विवरणपत्रात विहित वेळेत सादर करणे आवश्यक आहे. सबब, खालील वेळापत्रकाप्रमाणे संबंधित निवडणूक अधिकारी यांच्या सहीने अहवाल पाठविण्यात यावेत.
वरील प्रमाणे अहवाल सर्व संबंधित मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सहोने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास विहित वेळेत पाठविणे आवश्यक आहे. या अनुषंगाने आपले लक्ष भारत निवडणूक आयोगाच्या • निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकरिता हस्त पुस्तिका -
२०२३" मधील परिच्छेद १३.६५.२ कडे वेधण्यात येत आहे. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेले अहवाल विहित वेळेत सादर करणे हे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे सांविधानिक कर्तव्य असून त्यामध्ये हलगर्जीपणा केल्यास आयोगाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाते.
आपला,
(म.रा.पारकर)
उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी,
महाराष्ट्र राज्य
संपूर्ण परिपत्रक PDF Download व नमूना अहवाल
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments