बदली अपडेट २०२४ - विषय शिक्षक/प्राथमिक शिक्षकांचे विनंती बदली करीता कार्यालयाचे ई-मेलवर अर्ज सादर करण्यास सुचना जि प चंद्रपूर

शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-2023/ प्र.क्र.174/टिएनटी-1/ दिनांक 21.06.2023

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, संदर्भीय शा.नि. अन्वये जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पुर्वीपासुन कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छूक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाव्दारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी. समुपदेशनापूर्वी संभाव्य भरण्यात येणारी नविन पदे विचारात घ्यावी व शाळास्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता घ्यावी. असे नमुद आहे.

जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षक / विषय शिक्षक यांना अवघड क्षेत्रामधून सोप्या क्षेत्रामध्ये, सोप्या क्षेत्रामधून अवघड क्षेत्रामध्ये, पती-पत्नी एकत्रिकरण अंतर्गत बदली घेण्यास इच्छुक शिक्षकांनी दिनांक 04.03.2024 ला सायंकाळी 9.00 वाजेपर्यंत या कार्यालयाचे ई-मेलवर, eoprichandrapur24@gmail.com पाठविण्याबाबत आपले स्तरावरुन सुचना दयाव्यात. तसेच जे शिक्षक ज्या तालुक्यात कार्यरत आहेत त्यांना त्याच तालुक्यात बदली घेता येणार नाही.
याची नोंद घ्यावी.

सहपत्र :- तालुकानिहाय रिक्त पदाची यादी.

शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद, चंद्रपूर

 

वरील पत्र जरी जि प चंद्रपूर चे असले तरी संदर्भ असलेला आदेशा नुसार इतर जि प मधे देखिल नवीन शिक्षकांना नियुक्त करण्या पूर्वी कार्यरत शिक्षकांच्या बदल्या होऊ शकतात. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.