थेट न्यायालयात याचिका दाखल केल्यास संबंधित जिल्हा परिषद कर्मचारी प्रशासकिय कारवाईस पात्र ठरेल!

 जिल्हा परिषद पुणे च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक 15 मार्च 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार न्यायालयीन याचिका दाखल करण्यासाठी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.


परिपत्रक :-


पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील सर्व कर्मचारी (स्थायी अस्थायी) शासन व जिल्हा परिषदेच्या विरुध्द मे. न्यायालयामध्ये परस्पर याचिका दाखल करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणांची संख्या वाढत आहे.


महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ६ (१) मध्ये नमूद केलेनुसार जिल्हा परिषद कर्मचारी त्याला निकट दुय्यम असलेल्या प्राधिकरणाखेरीज अन्य कोणत्याही वरिष्ठ प्राधिकरणाशी कोणताही थेट पत्रव्यवहार करणार नाही.


महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग यांचेकडील परिपत्रक संकिर्ण ५०१७/प्र.क्र.४१६/आस्था-९, दिनांक ५/१०/२०१७ नुसार महाराष्ट्र जिल्हा परिषदा पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील विहित अधिकारानुसार, महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा १९६७ नुसार सेवेच्या विहित अटी शर्ती मधील रजा, सेवानिवृत्ती, निवृत्तीवेतन, प्रवासभत्ता, शिक्षा, वेतनवाढ, ज्येष्ठता, पदोन्नती या सर्व बाबी संदर्भात निर्णय घेण्यास नियुक्ती प्राधिकारी सक्षम आहेत. तसेच मानीव दिनांक देण्याबाबतचे अधिकार मा. विभागीय आयुक्तांना प्रदान आहेत. मा. विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अखत्यारीतील बाबीविषयी थेट न्यायालयात जाणे ही बाब सर्व थैव अयोग्य असून नियमोचित नाही.


उपरोक्त नमूद बाबींवर नियुक्ती प्राधिकारी यांनी दिलेला निर्णय अमान्य असलेस मा. विभागीय आयुक्तांकडे दाद मागता येईल. मा. विभागीय आयुक्त यांचे निर्णयाने समाधान न झालेस राज्य शासनाकडे अर्ज करता येईल व राज्य शासनाकडे दाद मागूनही अपिलार्थी शंकित असलेस न्यायालयात दाद मागता येईल. त्याचप्रमाणे विहित प्रचलित प्रशासकिय कार्यपध्दतीचा अवलंब केल्याशिवाय न्यायालयात याचिका दाखल करता येणार नाही.

सबब यापुढे न्यायालयात याचिका दाखल करताना उपरोक्त विहित कार्यपध्दतीचा अवलंब करणेत यावा. थेट न्यायालयात याचिका दाखल केलेस संबंधित कर्मचारी महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६४ मधील तरतुदीनुसार प्रशासकिय कारवाईस पात्र ठरेल.


रमेश चव्हाण (भा.प्र.से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद, पुणे



वरील परिपत्रक जरी जिल्हा परिषद पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे असले तरी अशा पद्धतीचे परिपत्रक त्यामध्ये दिलेल्या संदर्भित नियमानुसार इतर जिल्हा परिषदांचे देखील निघू शकते किंवा त्यानुसार कार्यवाही देखील होऊ शकते.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.