OTT TTMS Portal 2025 Updates - आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली बाबत आज शेवटची संधी! महत्वपूर्ण अपडेट्स!

जिल्हांतर्गत बदली 2024-25 बाबत महत्त्वपूर्ण.


बदली यादी / प्रोफाईलमधील चुकीच्या माहितीमध्ये बदल करण्याची सुविधा सुरु झालेली आहे.

* Phase 1 मधील प्रोफाईलमधील माहिती दुरुस्तीचे काम गटशिक्षणाधिकारी लॉगिन वरुन दि.21.04.2025 पर्यंत सुरु राहणार आहे.

* सर्व शिक्षकांनी स्वतःचे बदली प्रोफाईल तपासून, Personal Details किंवा Employment Details मध्ये काही चुका असतील तर दुरुस्तीसाठी पुराव्यासह गटशिक्षणाधिकारी कार्यालयात अर्ज करावेत.

* प्रोफाईलमधील माहिती दुरुस्तीसाठी 21 एप्रिलपर्यंत शेवटची संधी आहे. 22 एप्रिल रोजी Phase 1 बंद होणार आहे. त्यानंतर प्रोफाईलमध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येणार नाही.

Online Teacher Transfer Portal

https://ott.mahardd.com/



बदली 2025 महत्त्वाचे

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांना कळविण्यात येते की, दिनांक 18 एप्रिल 2025 ते 21 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये शिक्षकांच्या प्रोफाइल डाटा मधील माहिती मध्ये जर दुरुस्ती असेल तर ती दुरुस्त करण्याची सुविधा ही गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगिनला उपलब्ध झालेली आहे. एक वेळा बदली प्रक्रीयेला सुरुवात झाली की कोणत्याही लॉगीनमधून सदर माहिती दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही.


 📌यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या याद्यांमध्ये आपले नाव असणे / नसणे याबाबत  तपासून घ्यावे.

प्रत्येक शिक्षकांनी प्रोफाईल डाटा मधील सर्व माहिती स्वतःचे लॉगीन मधून Submit व Accept केलेली आहे. त्यामुळे 

💥जर चुकीच्या माहिती मुळे आपली बदली झाली किंवा बदलीमधून सूट मिळवल्यास असे शिक्षक प्रशासकीय कारवाईस पात्र ठरतील.💥


🚨बदलीपात्र शिक्षकांची यादी🚨

यामध्ये ज्या शिक्षकांचा सध्याच्या क्षेत्रात 10 वर्ष सेवा व सध्याच्या शाळेत 5 वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे यांचा समावेश होतो. या करिता current Area joining date व Current School joining date या दिनांकाचा उपयोग होतो. त्याकरिता प्रत्येकाने आपल्या या दोन्ही दिनांक तपासून बरोबर असल्याची खात्री करावी.

🚨Entitled List ( बदली अधिकार पात्र शिक्षक )🚨

यामध्ये ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सेवा 3 वर्ष पूर्ण झाली असे शिक्षक येतील. 

💥यामध्ये ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की, या यादीमधील शिक्षकांची current Ared joining date ही , ती शाळा अवघड क्षेत्र म्हणून घोषित झाल्याची दिनांक किंवा त्या शाळेवर रूजू झाल्याची दिनांक यापैकी जी नंतरची असेल ती असायला हवी. जि प बुलडाणा अंतर्गत सदर यादीमधील 72 शिक्षकांपैकी बऱ्याच शिक्षकांची ही दिनांक चुकलेली आहे.💥


🚨 Difficult Area List ( Random Round करिता पात्र शिक्षकांची यादी )🚨


या यादीमध्ये ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात सलग 10 वर्ष सेवा पूर्ण झालेली असेल मग शाळेवर 5 वर्ष पूर्ण झालेले नसले तरीही व बदलीपात्र यादीमध्ये नाव नसले तरीही त्यांचे नाव सदर यादीमध्ये येईलच.


त्यामुळे प्रत्येक शिक्षकांनी याद्या तपासून घ्याव्या व आपल्या current Area joining date व Current School joining date तपासून घ्याव्या.


माहितीस्तव 


जिल्हा बदली नियंत्रण कक्ष

जिल्हा परिषद 


आज 19 एप्रिल रोजी अद्याप रोस्टर पब्लिश झाले नाही.

🛑 रोस्टर पूर्ण झालेले जिल्हे 🛑

1) लातूर
2) गोंदिया
3) अमरावती
4) अहिल्यानगर
5) छत्रपती संभाजी नगर
6) कोल्हापूर
7) गडचिरोली
8) अकोला
9) धुळे
10) सिंधुदुर्ग
11) रत्नागिरी, 
12) भंडारा
13) पालघर 
14) नंदुरबार 
15) 
16) 
17)
18)
19)
20)

वरील जिल्ह्याचे रोस्टर पूर्ण झाले आहेत...
ज्या जिल्ह्याचे रोस्टर पूर्ण झाले आहेत पण वरील यादीत नाव नाही असे जिल्हे जोडा.. फक्त माहितीसाठी 🙏


आज 14 एप्रिल रोजी अद्याप रोस्टर पब्लिश झाले नाही.




सर्व जिल्हा परिषद यांना दिनांक 12 एप्रिल 2025 पर्यंत बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर अपलोड करण्यासाठी मुदतवाढ! 

13 एप्रिल 2025 रोजी होणार रोस्टर पब्लिश.. 

तर 14 एप्रिल 2025 रोजी राज्यातील शिक्षकांना रोज तर पाहण्यासाठी उपलब्ध होणार.. 

बदली पोर्टलवर आजचे.नवीन वेळापत्रक पुढीलप्रमाणे



सकाळची स्थिती👇

आज दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी बदली पोर्टल वर लॉगिन केल्यास रोस्टर पब्लिश ही ॲक्शन पूर्ण झाल्याची दिसते. रोस्टर पाहण्यासाठी ची कृती देखील पूर्ण झाल्याची दिसते.

परंतु या पुढील वेळापत्रक पोर्टलवर अद्याप दिलेले नाही.

परंतु जेव्हा आपण रोस्टर टॅब वर क्लिक करून मिडीयम निवडतो तेव्हा मात्र आपल्याला रोस्टर नॉट पब्लिश असा मेसेज दिसतो.

अर्थात दिनांकानुसार जरी डॅशबोर्डवर सर्व कृती पूर्ण झालेल्या दिसतात मात्र त्या अद्याप पूर्ण झालेल्या नाही.

त्यामुळे रोस्टर पब्लिश होण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

आज दिनांक सहा एप्रिल 2025 रोजी जर सर्व जिल्हा परिषदेचे अपलोड होऊन पब्लिक झाले तर ते उद्या आपल्याला पाहायला मिळू शकतात.

परंतु आज रविवार असल्यामुळे तसे होण्याची शक्यता कमी आहे.

म्हणजेच सर्व जिल्हा परिषदांना बिंदू नामावली पब्लिश करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

जोपर्यंत सर्व जिल्ह्यांचे रोस्टर बदली पोर्टलवर पब्लिश होत नाही तोपर्यंत अंतर जिल्हा बदली साठी शिक्षकांना अर्ज करण्यास सुरुवात होणार नाही.

जर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया लांबली तर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया देखील लांबणीवर पडू शकते.

जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया ही आंतरजिल्हा बदली प्रक्रियेनंतर सुरू होईल.

अर्थात वरील सर्व बदली पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर मिळालेल्या माहितीवरून दिलेला अंदाज आहे. सर्व गोष्टी अशाच होतील हे निश्चित नाही! 


लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्ड वरील वेळापत्रक पुढीलप्रमाणे.


अधिकृत पत्र किंवा माहिती मिळाल्यास आपणास लगेच कळवण्यात येईल त्यासाठी नियमित भेट द्या pradipjadhao.com या आमच्या संकेतस्थळाला! 


जिल्हा परिषद शिक्षक ऑनलाईन बदली अपडेट 2025.

शिक्षक ऑनलाईन बदली पोर्टलवर दुसरा टप्पा आंतर जिल्हा बदली सुरू करण्यात आला आहे. जिल्हा परिषदांना बिंदू नामावली अद्यावत करून ती अपलोड करण्यासाठी दिनांक 29 मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती ती आता वाढवून दिनांक 3 मार्च पर्यंत आता जिल्हा परिषदा बिंदू नमावली म्हणजेच रोस्टर अपलोड करू शकणार आहे.

तर रोस्टर प्रसिद्ध करण्यासाठी चार मार्च 2025 ची मुदत वाढवून देण्यात आली आहे.

आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षक बांधव हे त्या त्या जिल्हा परिषदांचे रोस्टर म्हणजेच बिंदुमनामावली दिनांक पाच मार्च २०२५ रोजी पाहू शकणार आहे. 


अर्थात वरील प्रक्रिया दिलेल्या वेळेत पूर्ण झाली तरच पुढील टप्पा म्हणजेच आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षक बांधवांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. 

वरील प्रक्रिया वेळेत न झाल्यास पुन्हा मुदतवाढ मिळू शकते. 


जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रियेसाठी पोर्टलवर लॉगिन कसे करावे.


आपल्या मोबाईल मधून गुगल एप्लीकेशन ओपन करून गुगल वर, TTMS किंवा Ott mhardd असे सर्च करा. व आलेल्या पहिल्याच सजेशन वर क्लिक करून बदली पोर्टल वर जा. 



अथवा आपल्याकडे असलेल्या पुढील लिंक वर क्लिक करून बदली पोर्टलवर जा.. 


पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये पहिल्याच रकान्यात तुमचा पोर्टलवर नोंद असलेला मोबाईल क्रमांक नोंदवा. 


मोबाईल क्रमांक नोंदवल्यानंतर त्याखाली Enter सिक्स डिजिट ओटीपी च्या च्या उजव्या बाजूला आलेल्या SEND OTP या निळ्या अक्षरांवर क्लिक करा तुमच्या मोबाईलवर एक सहा अंकी ओटीपी प्राप्त होईल तो अचूक नोंदवा.



त्यानंतर Captcha या रकान्यात त्याखाली दिलेल्या अंक व अक्षर समूह जसाच्या तसा नोंदवा जर तो अचूक नोंदवला व ओटीपी देखील अचूक असला तरच


खालील स्क्रीन शॉट मध्ये दिल्याप्रमाणे LOGIN हे बटन निळे होते त्यावर क्लिक करा.


खालील प्रमाणे स्क्रीन ओपन झाल्यास व तुमचे नाव दिसल्यास तुमचे लॉगिन यशस्वी झाले.


आपण बदली प्रक्रियेसाठी आवश्यक पुढील प्रक्रिया करा.

ववरील स्क्रीन शॉट मधील डाव्या बाजूच्या पांढऱ्या रंगाच्या आडव्या तीन रेषांवर क्लिक केल्यास पोर्टल वरील सर्व मेनू ओपन होतात.


बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.