मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षणाचे काम करणाऱ्यांचे मानधन जमा होणार? प्रशासनाकडून ३१ मार्चचा मुहूर्त?

 मराठा समाजाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती तपासण्यासाठी २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी या काळात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. परंतु, सर्वेक्षण करणारे प्रगणक व पर्यवेक्षकांना मानधन देण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत होता.


प्रशासनाकडून मानधन देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, येत्या ३१ मार्चपर्यंत प्रगणकांचे मानधन बैंक खात्यावर टाकण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी सांगितले. गोखले इन्स्टिट्यूट या संस्थेकडून मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक प्रणालीच्या मागसलेपण सिद्ध करण्यासाठी युजर फ्रेंडली मोबाइल अॅप्लिकेशन प्रणालीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाच्या कामासाठी जिल्ह्यात ३ हजार ४० प्रगणक, १९४ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले.

फेब्रुवारी रोजी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सर्वेक्षण करण्यासाठी प्रगणक आणि सुपरवायझर यांना प्रति दिवस भत्ता आणि मानधन देण्याचे सांगण्यात आले होते. यासाठी सरकारकडून विशेष तरतूद करण्यात आली मात्र, सर्वेक्षण पूर्ण होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी अद्याप मानधनाचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले नव्हते. स्थानिक प्रशासनाने सर्वेक्षणात काम केलेले अधिकारी आणि कर्मचायांच्या मानधनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला होता. या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून, येत्या ३१ मार्चपर्यंत मानधन आणि भत्त्याचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


३१ मार्चपर्यंत पैसे मिळतील

मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी नेमण्यात आलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत बैंक खात्यात पैसे जमा होतील.

-सोहम वायाळ, निवासी उपजिल्हाधिकारी, जालना.


वरील बातमी जरी जालना जिल्ह्याची असली तरी इतर जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यास 31 मार्च पूर्वी मानधन मिळू शकते.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.