इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत सुधारणा करणेबाबत.

 इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत सुधारणा करणेबाबत दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी चा शासन निर्णय पुढीलप्रमाणे. 


शुद्धीपत्रक:-

इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या मुला/मुलींना अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई देण्याबाबत राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास संदर्भ क्र.३ च्या शासन निर्णयान्वये मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तसेच, या योजनेंतर्गत प्रस्ताव निकाली काढण्यासाठी संदर्भ क्र.४ च्या शासन निर्णयान्वये जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली आली आहे. संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयामध्ये परि.७, ८, ९ (४), ९ (५) व ९ (६) मध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयातील परि.७ खालीलप्रमाणे वाचण्यात यावा.


२. या योजनेतील प्रस्ताव निकाली काढण्यासाठी खालीलप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात समिती गठीत करण्यात येत आहे.

3 संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयातील परि.८ खालीलप्रमाणे वाचण्यात यावा.

वरील समिती समोर इयत्ता १ ली ते १२ वी मध्ये शिकणाऱ्या मुला/मुलींकरीता प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (योजना), (सर्व)/शिक्षण निरीक्षण, (योजना), बृहन्मुंबई यांची राहील.

संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयातील परि.९(१) खालीलप्रमाणे वाचण्यात यावा.

पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव ३ प्रतीत (विवरणपत्र-अ) संबंधित मुख्याध्यापकांमार्फत इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या मुला/मुलींकरीता शिक्षणाधिकारी, (योजना) / शिक्षण निरीक्षक, (योजना), बृहन्मुंबई यांच्या कडे दाखल करावा. सदर अर्जाची छाननी शिक्षणाधिकारी, (योजना)/शिक्षण निरीक्षक, (योजना), बृहन्मुंबई यांनी करावी आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीपुढे बैठकीच्या वेळी सादर करावी.


संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयातील परि. ९ (४) खालीलप्रमाणे वाचण्यात यावा.


समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावांची रक्कम संबंधित शिक्षणाधिकारी, (योजना) /शिक्षण निरीक्षक, (योजना), बृहन्मुंबई यांनी संबंधित संस्थेच्या मुख्याध्यापकांमार्फत एकाच हफ्त्यात धनादेशाद्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये ७ दिवसात जमा करावे. संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयातील परि. ९ (५) खालीलप्रमाणे वाचण्यात यावा.


या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (योजना), (सर्व)/शिक्षण निरीक्षक, (योजना), बृहन्मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी (DDO) म्हणून घोषित करण्यात येत आहे.

संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयातील परि.९ (६) खालीलप्रमाणे वाचण्यात यावा.

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची सर्व जबाबदारी शिक्षण संचालक (योजना), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांची राहील. शिक्षण संचालक (योजना) यांनी ह्या योजनेची योग्य ती प्रसिद्धी करावी, वेळोवेळी सर्व संबंधितांचा आढावा घ्यावा व दर महिन्याला शासनाला सविस्तर अहवाल सादर करावा. सदरचे शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर


3. उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४०२०६१६२०२८१४२१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(तुषार वसंतराव महाजन)

उप सचिव, महाराष्ट्र शासन


वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.