मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात स्वच्छता मॉनिटर उपक्रमा अंतर्गत समाज माध्यमांमध्ये नेमक्या कशा प्रकारच्या पोस्ट कराव्या? #स्वच्छतामॉनिटर #LetsChange #SwachhtaMonitor

 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 2024 स्पर्धेअंतर्गत एकूण शंभर गुणांपैकी दहा गुण हे स्वच्छता मॉनिटर टप्पा क्रमांक दोन या उपक्रमासाठी आहे सदर उपक्रमांतर्गत शाळा स्वच्छता मॉनिटर पोर्टलवर नोंदणीसाठी दोन गुण आहेत या अगोदर आपण स्वच्छता मॉनिटर पोर्टलवर शाळेची नोंदणी कशी करायची हे पाहिले आहे पुन्हा पाहण्यासाठी

 येथे क्लिक करा


यानंतर दररोज दैनंदिन शैक्षणिक कामकाजामध्ये स्वच्छता मॉनिटर उपक्रमा अंतर्गत कार्यप्रणालीचे नियोजन व अंमलबजावणी यासाठी चार गुण देण्यात आले आहे. 



महत्त्वाचे त्यानंतरचे चार गुण हे समाज माध्यमांवर विद्यार्थ्यांनी स्वच्छता मॉनिटर म्हणून जर कुणी अस्वच्छता पसरवत असेल तर त्यांना थांबवून झालेली चूक सुधारायला सांगितल्याबाबत तीस सेकंदांची चित्रफित म्हणजेच व्हिडिओ स्वच्छता मॉनिटर पोर्टलवर रजिस्टर केल्यानंतर आलेल्या संदेशातील चौकटीतील मजकूर कॉपी करून तो आपल्या शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या नावासह फेसबुक इंस्टाग्राम twitter यासारख्या समाज माध्यमांवर पोस्ट करायचा आहे. 

बऱ्याच आपल्या शिक्षक बांधवांच्या फेसबुक या समाज माध्यमावरील व्हिडिओ पाहता त्यातील काहीच व्हिडिओ हे सदर उपक्रमा अनुसरून आहे किंवा त्याला गुण मिळतील परंतु अनेक जणांची व्हिडिओ हे उपक्रमास अनुसरून नाही त्यामुळे त्यांचे गुणांकन होणे शक्य नाही. योग्य व्हिडिओ व समाज माध्यमांवरील पोस्ट पुढील प्रमाणे असावी. 

सर्वप्रथम स्वच्छता मॉनिटर म्हणजे असा व्यक्ती की जो जर कुणी कुठेही परिसर अस्वच्छ करत असेल तर त्याला थांबवून चूक दुरुस्त करायला लावेल. 

उदाहरणार्थ एखादा व्यक्ती नको त्या ठिकाणी कचरा टाकत असेल तर विद्यार्थी त्याला तिथे कचरा टाकण्या पासून थांबवतील व त्याला योग्य ठिकाणी कचरा टाकायला लावतील. आता प्रत्यक्ष या गोष्टीचा व्हिडिओ बनवून तो समाज माध्यमांवर टाकायचा नाही तर विद्यार्थ्यांनी केलेल्या कृतीचे वर्णन सांगणारा तीस सेकंदाचा व्हिडिओ योग्य मजकुरासह समाज माध्यमांवर पोस्ट करायचा आहे. 

सदर व्हिडिओ मध्ये विद्यार्थ्यांनी काय केले याची नेमके अचूक वर्णन असावे फाटपसारा टाळावा किंवा स्वच्छतेचे महत्व किंवा स्वतः स्वच्छता केली किंवा नाट्यीकरण नसाव.

फेसबुक हे जवळपास सर्वजण वापरत असलेले समाज माध्यम आहे या समाज माध्यमांवर आपण सदर व्हिडिओ टाकू शकतो परंतु असे करत असताना योग्य मजकूर असावा

उदाहरणार्थ. 

विद्यार्थ्याचे नाव व वर्ग

#27040211401 #Z_P_School_Warkhed #स्वच्छतामॉनिटर चा #LetsChange च्या #SardarPatelbaazi करण्याचा अनुभव. #महाराष्ट्र मध्ये जो घाण करेल, त्याला #SwachhtaMonitor थांबवून केलेली चूक सुधारायला सांगणार.

Stop Careless Spitting And Littering In #Maharashtra; Or You Will Be Stopped And Asked To Rectify Your Mistake.

उद्दिष्ट: कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त #महाराष्ट्र

#माझीशाळासुंदरशाळा #BuldhanaSwachhtaMonitor #स्वच्छतामॉनिटर


वरील प्रमाणे वर्णन म्हणजेच मजकूर असावा वरील मजकुरात विद्यार्थ्यांची नाव शाळेचा यु-डायस नंबर शाळेचे नाव व जिल्ह्याचे नाव हे आपापल्या शाळेनुसार बदलावे लागेल. 

फेसबुक वर पोस्ट टाकत असताना आपल्या पोस्ट ची प्रायव्हसी ही पब्लिक म्हणजेच सर्वांसाठी खुली असावी यासाठी फेसबुकच्या सेटिंग्स मध्ये जाऊन प्रायव्हसी सेटिंग अंतर्गत पोस्ट या विभागात पब्लिक यावर क्लिक करावे. 


फेसबुक प्रमाणेच इतर समाज माध्यमांवर देखील वरील प्रमाणे मजकुरासह योग्य असा व्हिडिओ आपण पोस्ट करू शकता. 

स्वस्वच्छता मॉनिटर म्हणजे.. 

स्वतः स्वच्छता करणारा व्यक्ती नव्हे तर इतरांना परिसर अस्वच्छ करताना पाहिल्यानंतर त्याला थांबवणारा व्यक्ती होय. 


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.