शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 चा निकाल कधी लागणार?

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या दिनांक 9 जानेवारी 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 तालुकास्तर व जिल्हास्तर मूल्यमापनासाठी पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत. 


शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ मध्ये भाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी समाप्त झाली आहे. याअंतर्गत राज्यातील ३६ जिल्ह्यातून एकूण १८,२२० व्हिडीओ प्राप्त झाले आहेत. या व्हिडीओंचे तालुका व जिल्हास्तर मुल्यांकन होणे गरजेचे आहे


उपरोक्त नुसार प्राप्त व्हिडीओंचे तालुकास्तर मूल्यमापन सुरु असून याबाबत दिनांक ०९/०१/२०२४ पासून तालुकावार प्रत्येक गटातील गटनिहाय / विषयनिहाय प्रथम तीन व्हिडीओ जिल्हा स्तर मूल्यांकनकामी सबमिट करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 चा निकाल कधी लागणार याबाबत शिक्षक मित्रांकडून चौकशी होत आहे त्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या परिपत्रकानुसार स्पष्ट होते दिनांक 15 जानेवारी 2023 पर्यंत तालुका स्तरीय स्पर्धेचे निकाल लागतील. 

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तालुकास्तरावर निवड झाल्यानंतर दिनांक 20 जानेवारी पर्यंत जिल्हास्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे निकाल लागतील. 

व 25 फेब्रुवारी पर्यंत राज्यस्तरीय मूल्यमापन पूर्ण होऊन राज्याचा निकाल जाहीर होऊन दहा मार्च 2024 पर्यंत राज्यस्तरीय शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 चा निकाल व पुरस्कार वितरण करण्यात येईल. वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

2 Comments

  1. शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धचा निकाल अजुन जाहीर केला नाही

    ReplyDelete
    Replies
    1. आचारसंहिता असल्यामुळे चार जून च्या नंतर

      Delete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.