वेतन महत्त्वाचे - माहे जानेवारी 2024 चे वेतन देयके 7 वा वेतन आयोग फरक 4 था हप्तासहीत सुधारीत करून सादर करणेबाबत

वेतन महत्त्वाचे


माहे जानेवारी 2024 चे वेतन देयके 7 वा वेतन आयोग फरक 4 था हप्तासहीत सुधारीत  करून सादर करणेबाबत.


 - 1) या कार्यालयाचे पत्र क्रमांक बुजिप/शिप्रा/शालार्थ/ 367  दिनांक 16.01.2024

 2) मा. शिक्षण उपसंचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य पुणे यांचे ज्ञापन क्रमांक 21 अंदाज/2023- 24 /वेतन अनु./201/00848  दिनांक 29.01.2024

                

      उपरोक्त संदर्भ क्रमांक 01 चे या कार्यालयाचे पत्रान्वये आपले पंचायत समिती अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांचे जानेवारी 2024 चे नियमीत वेतन देयक आपण या कार्यालयास दिनांक 25 जानेवारी 2024 पर्यंत दिलेल्या विहीत मुदतीमध्ये सादर केलेले आहे.

तद्नंतर उपरोक्त संदर्भ क्रमांक 03 चे अनुदान वितरण आदेशान्वये नियमीत वेतनासोबतच  7 वा वेतन आयोग फरक 4 था करिता अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

त्यानुषंगाने आपणास कळविण्यात येते की , आपण यापुर्वी सादर केलेली माहे जानेवारी 2024 ची प्राथमिक शिक्षकांची (लेखाशिर्ष - 22020173) ची देयके जिल्हा स्तरावरून रीजेक्ट करण्यात आलेली आहेत.


जानेवारी 2024 चे सुधारीत देयक करतांना प्रथम जिल्हा स्तरावरून रिजेक्ट करण्यात आलेले देयक Delete करावे. व परत जानेवारी 2024 चे Bill Generate करावे. देयकामध्ये आपोआप 4 था हप्ता लागून येईल.

माहे जानेवारी 2024 चे वेतनासोबत कार्यरत शिक्षक कर्मचारी यांचा 7 वा वेतन आयोग फरकाचा 4 था हप्ता व ज्या शिक्षकांचा 3 रा हप्ता प्रलंबीत असेल त्यांचा शालार्थ प्रणालीमधून अदा करावयाचा आहे.


ज्या शिक्षकांचे वेतन Broken Period मधून काढण्यात आलेले आहे त्यांचे बाबतीत देयकामध्ये 4 था हप्ता आलेला आहे किंवा नाही याची खात्री करूनच देयक Forward करावे.

तसेच यापुर्वी संदर्भ क्रमांक 1 चे पत्रान्वये देण्यात आलेल्या इतर सुचना प्रमाणेच कार्यवाही करावी.


याबाबत जिल्हा समन्वयक यांनी तयार केलेले User Manual चा उपयोग करावा.   

एक वेळची विशेष बाब म्हणून खालीलवेळापत्रकाप्रमाणेच देयके सादर करावे.

जानेवारी 2024 चे देयक सादर करावयाचे सुधारीत वेळापत्रक

DDO-1 (मुख्याध्यापक) यांनी DDO-2  कडे देयक फॉरवर्ड करणे 31 जानेवारी 2024

गटशिक्षणाधिकारी यांनी Hard Copy प्रतिस्वाक्षरीस्तव पंचायत समिती स.ले.अ. यांना सादर करणे 01 फेब्रुवारी 2024

DDO-2 ने शालार्थ प्रणालीतून देयक DDO-3 कडे फॉरवर्ड करणे 02 फेब्रुवारी 2024

गटशिक्षणाधिकारी यांनी Hard Copy लेखा शाखा शिक्षण विभाग (प्राथमिक) येथे सादर करणे 05 फेब्रुवारी 2024     

  उपरोक्तप्रमाणे 02 फेब्रुवारी 2024 ला सायंकाळी 05.00 वाजेपर्यंतच ऑनलाईन देयके जिल्हा कार्यालयास सादर करावे. तसेच देयकांचे हार्ड कॉपी 05 फेब्रुवारी 2024 ला सादर कराव्या. देयकांचे हार्ड कॉपी सादर करतांना त्यासोबत 7 वा वेतन आयोग फरकाचे विवरणपत्र तसेच वेतन निशिचीती पडताळणी करून घेणेबाबतचे हमीपत्र सोबत सादर करावे. 05 फेब्रुवारी 2024 ला  ज्यांची स्वाक्षरीसह देयके व प्रमाणपत्र आणि 7 वा वेतन आयोग विवरण पत्र जिल्हा स्तरावर प्राप्त होतील केवळ त्यांचीच देयके संकलीत करण्यात येतील. अनुदान कमी असल्याने प्रथम देयक सादर करणाऱ्या पंचायत समितीस प्राधान्य देण्यात येईल.तसेच विलंबाने प्राप्त होणाऱ्या पं.समिती चे वेतनास विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत DDO- 1 व DDO- 2 यांची राहील.


मा.शिक्षणाधिकारी (प्राथ)

जिल्हा परीषद 

यांचे आदेशान्वये


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.