Pm-Poshan Update - MDM स्वंयपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाज वेळे बाबत नवीन शासन आदेश

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षणाधिकारी प्राथ. जिल्हा परिषद, बुलढाणा यांना दिनांक:- ०३ ऑक्टोंबर, २०२४ रोजी स्वंयपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

संदर्भ:-१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. शापोआ/२०२२ /प्र.क्र.१३०/एस.डी-३ दि.१८, डिसेंबर २०२३.

२) शासनाचे समक्रमांकाचे पत्र दि. १९ डिसेंबर, २०२३.


प्रधानमंत्री पोषण शक्ती योजेनेंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी राज्यातील शाळामध्ये मानधन तत्वावर स्वंयपाकी तथा मदतनीस कार्यरत आहेत. सदर स्वंयपाकी तथा मदतनीस यांची नियुक्ती शाळा व्यवस्थापन समितीव्दारे केली जाते. स्वंयपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत सुधारित शासन निर्णय दि.१८ डिसेंबर, २०२३ रोजी निर्गमित केला आहे. तसेच, स्वंयपाकी तथा मदतनीस यांचे दैनंदिन कामकाजाची मर्यादा चार तास करण्यात येवून त्यांचे कामकाज संपल्यानंतर त्यांना विनाकारण शाळेत न थांबवण्याचे निर्देश संदर्भाधिन दि.१९ डिसेंबर, २०२३ रोजीच्या पत्रान्वये देण्यात आलेले आहे. तथापि, बुलढाणा जिल्ह्यातील काही शाळांकडून शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन केले जात नसल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार संघटना यांनी शासनास केली आहे.

तदृनुषंगाने आपणास निर्देर्शित करण्यात येते की, स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत संदर्भाधिन शासन निर्णय व शासन पत्रान्वये दिलेल्या सूचना सर्व शाळांच्या पुनश्चः निदर्शनास आणाव्यात. तसेच, सदर सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर शासनाच्या प्रचलित नियमानुसार कारवाई करावी.


(प्रमोद पाटील)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन





 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत शालेय शिक्षण विभागाने दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

संदर्भ :- शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन निर्णय क्र. शापोआ/२०२२/प्र.क्र.१३०/ एसडी-३ दि.१८/१२/२०२३.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाज निश्चित करण्याबाबत तसेच, संबंधित स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाजाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी त्यांना बाजू मांडण्याची संधी देण्याबाबत व गटशिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने पुढील कार्यवाही करण्याबाबत संदर्भाधिन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तथापि, सदर शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी शासनास स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनाद्वारे शासनास प्राप्त होत आहेत.

त्यानुषंगाने आपणास पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.

1. प्रस्तुत योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना संदर्भाधिन दि.१८ डिसेंबर, २०२३ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कामकाजा व्यतिरिक्त कोणतेही अन्य काम न देण्याबाबत सर्व शाळांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे.

॥. स्वयंपाकी तथा मदतनीस यांना शाळा व्यवस्थापन समितीमार्फत परस्पर कामावरुन कमी केले जात असल्याच्या तक्रारी शासनास प्राप्त होत आहेत. त्यानुषंगाने संबंधितांच्या कामकाजाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास त्याच्यावर कारवाई करण्यापूर्वी संदर्भाधिन शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी तहनंतर गटशिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने पुढील उचित कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना आपल्या स्तरावरुन सूचित करण्यात यावे.

III. स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत संदर्भाधिन दि.१८ डिसेंबर, २०२३ मधील नमूद तरतूदीनुसार कार्यवाही न करणाऱ्यांवर शासनाच्या प्रचलित नियमानुसार कारवाई करण्यात यावी.


(प्रमोद पाटील)

सचिव, महाराष्ट्र शासन


प्रतः- शिक्षण संचालक (प्राथ.), महाराष्ट्र राज्य, पुणे

स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत संदर्भाधिन दि.१८ डिसेंबर, २०२३ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदी परिपत्रकाव्दारे सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरुन अवगत करावेत.





प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे 08 JAN 2024 प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाज वेळेबाबत पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहे. 

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यातील इ १ ली ते ८ वी तील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत शाळास्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याकरीता स्वयंपाकी तथा मदतनीस यांची नियुक्ती शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात येत असते. स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाजाबाबत शासनाने दि. १८ डिसेंबर, २०२३ रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. शाळास्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना वितरीत करण्याचे व त्याअनुषंगीक सर्व कामकाज संपल्यानंतरही शाळेमध्ये विनाकारण स्वयंपाकी तथा मदतनीस यांना थांबविण्यात येत असलेबाबत तक्रार स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे विविध संघटनांनी संचालनालय तसेच शासनाकडे केलेल्या आहेत. प्रस्तुत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने व शासनाने त्यासंदर्भात निर्गमित केलेल्या संदर्भिय परिपत्रकान्वये सर्व जिल्ह्यांना खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे दैनंदिन कामकाजाची मर्यादा ४ तास करण्यात येत आहे. सदर चार तासामध्ये स्वयंपाकी तथा मदतनीस यांनी त्यांना दि. १८ डिसेंबर, २०२३ रोजी सुधारित शासन निर्णयनुसार विहित करुन देण्यात आलेली सर्व कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. तद्नंतर त्यांचे कामकाज संपल्यानंतर त्यांना विनाकारण शाळेमध्ये थांबवून ठेवण्यात येवू नये.

वरील प्रमाणे सूचना आपल्या जिल्ह्यांतील सर्व शाळा व प्रमुखांना लेखी स्वरुपात निर्गमित करण्यात याव्यात.


शरद गोसावी

शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे



संपूर्ण परिपत्रक शासन निर्णय PDF Download👇

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.