Updated STARS Block Level Training 2023-24 Timetable - अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन तालुकस्तरीय प्रशिक्षण सुधारित वेळापत्रक

 STARS प्रकल्प सन २०२३-२४ अंतर्गत अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे प्रशिक्षण शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा, आदिवासी विभागाच्या शाळा, सामाजिक न्याय विभागाच्या शाळेतील इयत्ता १ ते ८ च्या सर्व शिक्षकांना द्यायचे आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण ०५ दिवस असून विभागस्तर प्रशिक्षण दि. २८ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२३ या कालावधीत सुरु आहे. सदर प्रशिक्षणाच्या आयोजनाची जबाबदारी जिल्हा डायट प्राचार्य यांची राहील.


विभागस्तर प्रशिक्षणानंतर तालुकास्तर प्रशिक्षण हे अनिवासी स्वरूपाचे एकूण ०५ दिवसांचे असेल. सदर प्रशिक्षणामध्ये शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा (जि.प..म.न.पा./न.पा./न.प.), आदिवासी विभागाच्या शाळा, सामाजिक न्याय विभागाच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वी ला शिकविणा-या सर्व शिक्षकांचा समावेश असेल. इयत्ता १ ली ते ५ वी ला शिकविणा-या सर्व शिक्षकांसाठी तालुकास्तर प्रशिक्षणाच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत.

१. पहिला टप्पा दि. १२ ते १६ डिसेंबर २०२३

२. दुसरा टप्पा दि. दि. १९ ते २३ डिसेंबर २०२३

३. तिसरा टप्पा दि. २६ ते ३० डिसेंबर २०२३

इयत्ता ६ वी ते ८ वी ला शिकविणा-या सर्व शिक्षकांसाठी तालुकास्तर प्रशिक्षणाच्या संभाव्य तारखा पुढीलप्रमाणे आहेत.


१. पहिला टप्पा दि. ०२ ते ०६ जानेवारी २०२४

२. दुसरा टप्पा दि.०९ ते १३ जानेवारी २०२४

सदर तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रती प्रशिक्षणार्थी प्रती दिन रक्कम रु. ५००/- प्रमाणे निधीच्या मर्यादेत खर्च करावा.

खर्चाच्या बाबी व निकष खालील प्रमाणे

१. प्रवास भत्ता (TA)- नियमानुसार

२. मानधन - रु. ५०० प्रती दिन (फक्त तज्ज्ञ मार्गदर्शकांसाठी)

३. प्रशिक्षण वर्ग/Hall

४. इंटरनेट सुविधा

५. भोजन व्यवस्था

६. स्टेशनरी व किरकोळ खर्च रु. ५०/- प्रती प्रशिक्षणार्थी


टीप - एकूण ५ दिवसांच्या खर्चापैकी १ दिवसाचा भोजन व मानधन खर्च सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षणाच्या निधीमधून करावा. उर्वरित सर्व खर्च अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणासाठी प्राप्त निधीमधून करावा.


(अप्रैल येडगे मा.प्र.से.) संचालक


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे





वरील परिपत्रक PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील Download वर click करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9834314384 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.