पायलट प्रशिक्षण सुवर्ण संधी! सारथी, पुणे प्रायोजित महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेमार्फ़त ड्रोन पायलट प्रशिक्षण देणेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे अन्वये सारथी संचालक मंडळाच्या बैठकीतील मान्य ठरावानुसार राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजातील शेतकरी / युवक/युवती यांना सारथी संस्थेच्या खर्चाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेमार्फ़त मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानुसार शेतकरी / युवक/युवती यांचेकडून दि. ३१.०३.२०२४ अखेर सायंकाळी ५.०० पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.


जाहिरातीसाठीचे आवश्यक निकष, अटी शर्ती सारथी पुणे संस्थेच्या पुढील संकेतस्थळावर पहा. लिंक : https://sarthi-maharashtragov.in/> सूचना फलक > ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना सन २०२३- २४> माहिती अर्ज > पहावे. तसेच, महत्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी यांचे संकेतस्थळ 

www.mpkv.ac.in

ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख : ३१.०३.२०२४

कागदपत्रे हार्ड कॉपी सारथी संस्थेस पाठविण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज सादर केले नंतर १५ दिवसाचे आत

सदर विषयी भविष्यात कोणतीही माहिती / सूचना उपरोक्त लिंक वरच दिली जाईल. इच्छुक उमेदवारांनी सारथीच्या उपरोक्त संकेतस्थळावर सूचनाफ़लक पहावे.


श्री अशोक काकडे. (भा.प्र.से.)

व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे




अर्ज लिंक

Click Here


सारथीचे लक्षित गटातील सदस्यांना ड्रोन ऑपरेट करणेसाठी राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत डीजीसीए मान्य प्रशिक्षण केंद्रामार्फत रिमोट पायलट प्रशिक्षण कार्यक्रम सन २०२३-२४

कृषीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढविणेकरिता केंद्र व राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहनात्मक अनुदान देत आहे. ड्रोनव्दारे विविध खरिप, रब्बी, फळपिके तसेच भाजीपाला पिकावर किटकनाशकाची फवारणी सुलभरित्या करता येते. मात्र, योग्यरित्या ड्रोन चालवू (ऑपरेट करु) शकतील, असे प्रशिक्षित मनुष्यबळ देखील पुरेशा प्रमाणात आज उपलब्ध नाही. शेती क्षेत्रातील लक्षित गटातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

सारथीकडे ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी निधीची तरतूद असून अशी प्रशिक्षणे महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहूरी अंतर्ग स्थापित झालेल्या रिमोट पायलट प्रशिक्षण केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेली आहेत. सदर केंद्राने सारथी संस्थेशी सामजस्य करार करुन लक्षित गटातील युवकांसाठी/ सदस्यांकरिता अशी प्रशिक्षणे देण्यास सहमती दर्शविलेली आहे.

याकरिता ७ दिवसाचे प्रशिक्षण असून या मध्ये ५ दिवस ड्रोन पायलटींग व २ दिवस फवारणी करणेचे प्रशिक्षण व अनुभव याचा समावेश आहे. प्रत्येक महिन्यामध्ये सदर केंद्रावर ७ दिवसाच्या १० प्रशिक्षणार्थीच्या ४ बॅचेस घेण्यास संबधित केंद्राने मान्यता दर्शिवलेली आहे.

योजनेचा उद्देश : सारथी लक्षित गटातील सदस्यांकरिता महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत DGCA मान्यता प्राप्त आरपीटीओ केंद्रामध्ये ड्रोन पायलट प्रशिक्षण देणे.


प्रशिक्षणासाठी पात्रता निकष :

१. प्रशिक्षणार्थी लाभार्थीचे वय १८ ते ४० वर्षे असावे.

२. लाभार्थी कृषी पदवीधर अथवा कृषी पदविका धारक असावा. मात्र असे लाभार्थी अर्ज न आल्यास अन्य विषयांचे पदवीधरांचा विचार करण्यात येईल.

३. मागील ३ वर्षाचे वार्षीक उत्पन्न हे र. रु. ८.०० लाखापेक्षा जास्त नसावे अथवा सक्षम प्राधिका-यांचे आर्थिक दुर्बल प्रमाणपत्र (EWS) असावे.

४. प्रशिक्षणार्थी लाभार्थीकडे वैध पासपोर्ट असावा.

५. वैद्यकीय योग्यता (फिटनेस) प्रमाणपत्र असावे

६. शेतकरी कुटुंबातील सदस्यास प्राधान्य दिले जाईल.

अर्ज प्रक्रिया : प्रशिक्षणासाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज 

https://sarthi-maharashtragov.in/

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ड्रोन प्रशिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी यांच्याकडे देखील रितसर ऑनलाईन अर्ज करावा.

प्रशिक्षण कालावधी : एकूण ७ दिवस

प्रशिक्षणार्थी निवड : सारथी मार्फत प्राप्त अर्जापैकी प्रति सप्ताह १० या प्रमाणे दरमहा ४० प्रशिक्षणार्थीना सन २०२३- २४ व २०२४-२५ मध्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. प्रथम टप्यात प्रत्येक जिल्ह्यातून १० प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षणे देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणाचे ठिकाण : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी कॅम्पस


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9834314384 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.