2017 ची शिक्षक भरती यादी वैयक्तिक लाॅगीनला लागली आहे.सामुहीक यादी अद्याप नाही.
https://mahateacherrecruitment.org.in/
दिनांक : २९/११/२०२३
नियुक्ती प्राधिकारी यांचेसाठी सूचना सन २०१९ मधील शिक्षक पद भरतीच्या वेळी अपात्र, गैरहजर, रुजू न होणे इत्यादी कारणास्तव रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या निवडीच्या शिफारशीबाबत.
१. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०१७ नुसार पवित्र पोर्टलमार्फत यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांकरिता मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थातील मुलाखतीसह पदभरतीसाठीची कार्यवाही करण्यात आलेली आहे.
२. सन २०१९ मधील शिक्षक पदभरतीच्या वेळी अपात्र, गैरहजर, रुजू न होणे इत्यादी कारणास्तव रिक्त राहिलेल्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले होते. स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारांतर्गत गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे.
३. पुणे महानगरपालिका माध्यमिक विभाग २ पदे व बृहन्मुंबई महानगरपालिका प्राथमिक विभाग - ६ पदे (इ. ६ वी ते इ ८ वी गटातील इंग्रजी माध्यमाची इंग्रजी भाषा विषयाची) यासाठी संबंधित व्यवस्थापनाने कळविल्यानुसार पदभरतीसाठी शिफारस करण्यात आलेली नाही.
४. शासन पत्र दिनांक १२/०६/२०२३ नुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या पदांसाठी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदभरतीसाठी शिफारस झालेली नाही.
५. व्यवस्थापनांना लॉगीन केल्यानंतर General Merit List हा मेनू दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर General Merit List/Postwise and Subjectwise Merit list/ categorywise Merit list वर क्लिक केल्यानंतर जाहिरातीनुसार निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची यादी दिसेल. General Merit List अंतर्गत शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांची यादी दिसेल.
६. व्यवस्थापनांना शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांची स्व प्रमाणपत्र (Self Certified Copy) लॉगीन वर View Self Certified Copy यावर क्लिक केल्यानंतर सबंधित उमेदवारांचा परीक्षा क्रमांक (SED_TAIT_XXXXXXX) नोंद केल्यानंतर submit यावर क्लिक करून स्व प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.
७. उमेदवाराच्या स्व-प्रमाणपत्रामध्ये उमेदवाराने नमूद केलेल्या माहितीच्या आधारे सबंधित उमेदवाराची निवडीसाठी शिफारस झालेली आहे. पवित्र पोर्टल मार्फत उमेदवारांच्या पात्रतेबाबत कोणतीही तपासणी/पडताळणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारास नियुक्ती आदेश देण्यापूर्वी उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेला दावा हा शिफारस केलेल्या पदासाठी योग्य असल्याची पडताळणी मूळ कागदपत्रे व पात्रता विषयक तरतुदीनुसार करावी. यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे पत्र क्रमांक ५३०९ दिनांक ०९/०८/२०१९ मध्ये दिलेल्या सूचना नुसार कार्यवाही करावी.
८. व्यवस्थापनांना काही अडचणी आल्यास edupavitra@gmail.com या email वर संपर्क साधता येईल.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments